मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साँदेश

गणपा · · पाककृती
इंग्रजी नववर्षाच्या सर्व आंतरजालिय स्नेह्यांना शुभेच्छा !!! म्हटलं या वर्षाची सुरवात एखाद्या गोड पाककृतीनं करावी. त्यात आज बाबांचा वाढदिवसही आहे. म्हणुन ही पाककृती खास त्यांच्यासाठी. साहित्यः प्रमाण साधारण १० साँदेशसाठी. दिड लिटर दुध. १ वाटी पीठी साखर २-३ मोठे चमचे व्हिनेगर / लिंबाचा रस / दह्याचं पाणी (यापैकी काहीही एक) केशर,पिस्ता /पाकातली चेरी/अननस/आंबा (जे हाताशी असेल ते) कृती: सर्वप्रथम दुध एका मोठ्या कढईत/भांड्यात तापवुन घ्या. एक उकळी आली की आच मंद करुन, त्यात व्हिनेगर/ लिंबाचा रस / दह्याचं पाणी घालुन दुध फाडा. कलथ्यान ढवळत रहा. पनीर तयार होतान दिसेल. चाळणीवर स्वच्छ कापड आंथरुन घ्या. फाटलेल दुध या चाळणीत टाकुन त्यावर लगेच बर्फाच गार पाणी टाकुन पनीर धुवुन घ्या. थंड पाण्यामुळे पनीर मऊ होतं. वाटल्यास वरुन वजन ठेउन पनीर मधल सगळ पाणी काढुन टाकाव. पनीर हाताने कणिक तिंबतात तस तिंबुन घ्याव. (बोटांना पनीरचे छोटे छोटे गोळे लागता कामा नये.) यासाठी खुप मेहेनत घावी लागते. श्रम वाचवायचे असल्यास १/२ मिनिट मिक्सर मध्ये फिरवल तरी चालेल. पण जास्त फिरवल तर पार लोळागोळा होईल. तेव्हा जरा जपुन. :) मग त्यात पिठीसाखर घालुन नीट मळुन घ्याव. किंचीत पाणी आहे अस जाणवल्यास कढई मंद आचेवर ठेउन तयार पनीरचा गोळा त्यात थोडावेळ परतावा. मिश्रण थोडं गार झाल्यावर हातावर पेढे वळुन किंवा साचे असल्यास साच्यात टाकुन आकार द्यावा. मध्ये बोटाने थोडा दाब देउन खड्डा करावा. त्यात केशर मिश्रीत दुधाचं बोट लावुन वरुन सजावटीचे जिन्नस टाकावे.

वाचने 12871 वाचनखूण प्रतिक्रिया 45

नंदन 06/01/2011 - 04:41
झक्कास पाकृ, गणपाभौ. पीजे वॉर्निंग सुरू> 'संदेसे आते है, हम तडपाते है' हे गाणं आठवलं ;) पीजे वॉर्निंग समाप्त>

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदनने शुद्धलेखनात केलेली चुक पाहुन साँदेश दसपट गोड लागला! >) गणपाशेट, तुमच्या पाकृने नंदनला शुद्धलेखन विसरवले ह्यापेक्षा मोठी पावती मिळणे अशक्य हो!

In reply to by विकास

छोटा डॉन 06/01/2011 - 10:09
>>कधी येऊ? प्रिसाईजली एवढेच विचारतो :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अवलिया 06/01/2011 - 12:33
>>कधी येऊ? एक्जॅक्टली एवढेच विचारतो :)

बेसनलाडू 06/01/2011 - 07:03
(खवय्या)बेसनलाडू

पंगा 06/01/2011 - 09:55
(आता याची मांसाहारी/मत्स्याहारी आवृत्ती कधी येणार म्हणे? किंवा, कशी आली नाही अजून?)

लवंगी 06/01/2011 - 08:33
एकट्याने मटकावले का सगळे?

मी_ओंकार 06/01/2011 - 10:11
साँदेश हा खास बंगाली प्रकार. तिथला रशगुल्ला जितका सगळ्यांना माहीत आहे तितका हा माहीत नाही. एकदम अशा खास गोष्टीला हात घालून तो यशस्वी पार पाडल्याबद्दल अभिनंदन गणपाभौ. - ओंकार.

नगरीनिरंजन 06/01/2011 - 11:24
अरे!! कुठे फेडाल ही पापे? एकतर इथे बंगाली हलवाई मिळणे दुरापास्त. इतकं खावसं वाटतंय की आता झक मारून करणे आले.

कुसुमिता१२३ 06/01/2011 - 12:31
मस्तच! करुन बघेन एकदा!

इन्द्र्राज पवार 06/01/2011 - 12:43
"गणपाभाऊ....मला तुमचा पाहुणा होण्यासाठी काय केले पाहिजे...?" तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा...!! इन्द्रा

पर्नल नेने मराठे 06/01/2011 - 12:49
तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा...!! गणपा तु आम्हा बायका कम मुलिंना उगाच कॉम्प्लेक्स देत जाउ नकोस ..याद राख.

सिद्धार्थ ४ 06/01/2011 - 12:49
एक नबर...... And happy B'day to Uncle

झील 06/01/2011 - 13:12
काय बोलणार शब्दाच नाही. नक्की करुन बघाणार.

स्वाती दिनेश 06/01/2011 - 14:22
मस्तच रे, एकंदरीतच बंगाली मिठाई करण्याच्या वाटेला मी फार क्वचित जाते, :) कारण ती फसेल असे सारखे वाटत असते,आता मात्र तुझ्या साँदेशांनी पार लालचावले आहे.. तुला स्टँडिग ओवेशन! स्वाती
आई-वडिलांना आपल्याच मुलाने स्वतःच्या हाताने बनवून गोडाधोडाचा 'साँदेश' नैवेद्य म्हणून द्यावा याहूनही मोठी मानवंदना नाही ! पाकृ नेहमीप्रमाणेच Too Shweet to appreciate :-) तुमच्या बाबांना माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्मिता. 06/01/2011 - 15:43
साँदेश आवडले. कृतीसुद्धा आम्हा पामरांना जमेल अशी सोपी वाटतेय.

कवितानागेश 06/01/2011 - 16:03
मागे एकदा माझे रसगुल्ले फसले आणि पाकात फसफसून हसले. त्यानंतर मी बंगाल्यांच्या वाटेला गेले नव्हते. ही कृती खूपच सोप्पी आहे. नक्की करुन बघेन. धन्यवाद.

मेघवेडा 06/01/2011 - 17:30
तेज्यायला सुटी अख्खी इथंच देशात फिरून वाया घालवली.. नायजेरियाला गेलो पायजे होतो! :D सॉल्लेट रे गणाभौ! तुझ्या बाबांना शुभेच्छा!

मितान 06/01/2011 - 18:34
रसगुल्ले फसले की मी संदेश करते. पण तुझ्याएवढ्या शिस्तीत नाही. त्यामुळे ते कधी कोरडे होतात नि फुटतात तर कधी वाटीत घेऊन खाण्याइतके सैल ! आज माझं डोकं न चालवता तुझ्या पद्धतीने करून बघते :) फोटो बघुन पटकन हात पुढे होतोय !!

आजानुकर्ण 06/01/2011 - 18:39
मस्तच गणपाशेठ!

चित्रा 06/01/2011 - 19:03
लग्नानंतर आपल्या सुनेला स्वैपाकाचा आळस आहे, आणि सून नवर्‍याघरी नवर्‍याच्या अनुपस्थितीत फारच वेळ फुकट दवडते आहे, हे पाहून आमच्या सासुबाईंनी मला स्वखर्चाने एका बंगाली मिठाया आणि इंडियन चायनीज शिकवणार्‍या बाईंच्या शिकवणीला धाडले होते त्याची आठवण झाली. बहुतेक दुपारची ब्याद घरातून घालवून देत असाव्यात. ते शिकवणीच्या रेसिप्यांचे कागद अजूनही नीट ठेवून दिले आहेत. अधनंमधनं आवरताना लागतात हाताला. :) पण गणपाभौ, तुमच्या उत्साहाला सलाम. वडिलांना वाढदिवसाच्या आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

ज्योति प्रकाश 06/01/2011 - 21:13
गणपाभौ सोप्पी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या वडिलाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्छा.

ऋषिकेश 07/01/2011 - 10:35
अरेच्या साँदेश इतका सोप आसतो होय! उगाच दुकानात्रून आणायचो.. आता घरीच करून बघतो. धन्यु! (गणपाची पाकृ वाचून नववर्षाचा संकल्प मोडला आहे :) )