आघात
नवीन वर्षातील चित्रपटांची सुरवात सुरवात यंदा (बरेच वर्षांनी) मराठी चित्रपट पहाण्याने झाली. काल विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" पाहिला. एका शब्दात सांगायचे तर चित्रपट "आवडला".
टिपः यापुढे चित्रपटाची सुरवात दिली आहे. अंशतः रसभंग होऊ शकतो
चित्रपट सुरू होतो तो डॉक्टरांच्या प्रतिज्ञा/शपथ ऐकत. कुठल्याही प्रकारच्या नमनात वेळ न घालवता मुळ विषय वेग घेतो. एक २२ वर्षांची मुलगी जिचे लग्न महिन्याभरावर आले आहे तिच्या ओटीपोटात एक गाठ डिटेक्ट झाली आहे. पुण्यातले प्रतिथयश व नामवंत डॉक्टर खुराणा (विक्रम गोखले) सांगतात की एका ऑपरेशनने ती गाठ काढावी लागेल, व तपासावी लागेल, जर गाठ कँन्सरची निघाली तर मग इतर उपचार करावे लागतील. ह्या पेशंटच्या आठमुठेपणासोबत डॉ. देखमुख (मुक्ता बर्वे) ही एक एम एस करण्यासाठी असलेली सिनीयर रेसिडंन्ट डॉक्टर आपल्या समोर येते. ती पेशंटशी गोड, प्रसंगी स्पष्ट बोलून आवश्यक ती माहिती मिळवते, मात्र पेशंट कंसेट फॉर्म वर सही करण्यास नकार देते. ह्या मुलीचा (पेशंटचा) भाऊ अॅपेंडिक्सच्या साध्या ऑपरेशनमधे गेला असल्याने ती ऑपरेशनला घाबरत असते. डॉ. देखमुखचा सायकॅट्रीस्ट प्रियकर तीची समजूत काढतो आणि ती ऑपरेशनला तयार होते.
ऐन ऑपरेशनमधे ओव्हरी (मराठी?) "बॉर्डरलाईन" असल्याचे पॅथोऑजिस्ट सांगतात. एक ओव्हरी बॉर्डलाईन असली तरी दुसर्या ऑवरीबद्दल काहिच रोपोर्ट नसतो. तरीही डॉक्टर खुराणा ती ओव्हरी काढण्याचा निर्णय घेतात व हे करण्यस डॉ. देखमुख नकार देते. नुसता नकार देऊन थांबत नाही तर पेशंटच्या परगानगीविना तिच्या मातृत्त्वाचा हक्क हिराऊन घेऊ शकत नाही अशी विधायक भुमिका मांडते. खुराणा एका रेसिडन्टने शिकवलेल्या शहाणपणाने संतप्त होऊन दुसर्या रेसिडन्टकडून ओव्हरी काढून घेतात.
आणि इथे सुरू होतो डॉ. खुराणा आणि डॉ.देखमुख यांच्यातील लढा. या लढ्याची ही कहाणी म्हणजे का चित्रपट आघात. ह्या लढयाचे पुढे काय होते? डॉ. देखमुख इन्फॉर्म्ड उपचार करण्याच्या आग्रहावर ठाम रहाते का? दोन्ही ओव्हरी काढल्याने प्रधान हिला (पेशंट) कशाकशाला सामोरे जावे लागते? या लढ्यात खुराणांचा कोणता इतिहास समोर येतो? हॉस्पिटल्सचे आर्थिक घटक "योग्य" उपचरांच्या आड कसे येतात? या लढ्याचा शेवट कसा होतो? वगैरे अनेक गोष्टीसाठी चित्रपट पहाण्यासारखा आहे.
सशक्त - फ्रेश कथा आणि विक्रम गोखले व मुक्ता बर्वे या दोघांचाही अभिनय ह्या चित्रपटाच्या सर्वात जमेच्या बाजू. उत्तम ध्वनी, स्पष्ट संवाद, प्रेक्षकाला समजतील अश्या भाषेत समजावलेले वैद्यकीय शब्द/रोग/प्रक्रिया, योग्य संकलन वगैरे गोष्टींमुळे २ तास ५ मिनिटे लांबीचा हा चित्रपट उठावदार झाला आहे. गाण्याची गैरहजेरी ही देखील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब. अर्थपूर्ण गाणी चालली असती (पण असेही वाटते की त्यामुळे चित्रपट जरा संथ झाला असता). टु द पॉइंट असलेला हा प्रभावशाली चित्रपट जरूर बघा अशी शिफारस.
माझ्या चांदण्या: ४ १/२
प्रतिक्रिया
पुढे काय झाले?
धन्यु
मुक्ता बर्वे ही एक महा मुर्ख
साडेचार चंद्र ? () () () () |)
बघावा लागेल हा चित्रपट.
ह्या चित्रपटाविषयी वाचले आहे.
चांगला रिव्यू
दिग्दर्शन
वाचले होते आता बघावा
हा सिनेमा पाहून महागुरू काही
"आघात" लवकरच पाहायचा आहेच,
चांगले
ऋषिकेश - परीक्षणासाठी अनेक
हा हा हा
कालच एका मैत्रिणीने तुनळीवरची
मत
गोखलेंची मुलाखत
मलातरी त्यांचे बरेचसे बोलणे
- मला हे पूर्ण मान्य आहे की आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे. कलाकारांना, दिग्दर्शकांना त्यांची निर्मिती लोकांपुढे आणायला मिडियाची मदत घ्यावी लागते. त्यातच नाताळच्या आठवड्यात ५ नविन मराठी चित्रपट एकदम प्रदर्शित झाले, मला वाटते आघात सोडुन. त्यामुळे स्पर्धा अजुन वाढली, प्रेक्षक नक्कीच दुभागले गेले असणार. फक्त गोखले थोडेजरी विनयी असले असते त्यांच्या टोनमध्ये तर सुसह्य झाले असते.
- मुलाखत घेणा-याचं शिक्षण, त्याला डिग्री घेताना किती मार्क मिळाले ९८%, ९९% का, हे विचारुन त्याला अडचणीत आणल्यासारखे वाटले. त्याने जो प्रश्न यावेळेस विचारला त्यांच्या बॅरिस्टर नाटकाबद्दल, तो भलतीकडेच नेला असे वाटले.
- एकही गाणं नसणं हा माझ्यामते काही प्लस होऊ शकत नाही , तसेच जर कथेची गरज नसेल तर गाणं असायलाच पाहीजे असही नाही. त्यांचा एकंदर अविर्भाव याबाबतीत असा होता की आजकाल प्रत्येक मराठी चित्रपटात फक्त आयटम साँगच असतात. खरतरं गेल्या ३-४ वर्षांत बरीच वेगळ्या प्रकारची गाणी येऊन गेली /लिहीली गेली.
- शेवटच्या भागात त्यांनी प्रत्येक कलाकाराबद्दल/सहकलाकराबद्दलही 'काय काम केले आहे त्याने/तिने' ही टिपण्णी केली आहे. म्हणजे मला वाटले की सगळेच नटसम्राट झाले की काय. असे असु शकते की एखाद्या चित्रपटाची भट्टी खूप चांगली जमुन येते, सगळ्यांचीच कामं सुरेख होतात, दिग्दर्शन, नेपथ्य सगळे जागच्या-जागी असते. पण हे मला वाटते प्रेक्षकांकडुन आले पाहीजे. तुम्हीच तुमचे सारखे-सारखे कौतुक करुन काय फायदा. (मागे कोणीतरी महागुरुंबद्दल म्हंटले होते की हे म्हणजे गणपतीनेच स्वत:ची आरास करुन मग मखरात जाउन बसल्यासारखे आहे, तसेच काहीसे हे ही.)
- आता त्यांच्या लायब्ररीबद्दल - मला खरतरं चांगले वाटले की त्यांच्याकडे चांगला संग्रह आहे. पण पुढे जाऊन असे म्हणणे की भारतात असा कोणाकडे आहे का माहीती नाही - अपवाद बच्चन, कदाचित शाहरुख आणि आमिर. मला 'माहीती नाही' हे शब्द इथे महत्वाचे वाटतात. माहीती नाही तर असे बोलणे घमेंडीपणाचे नाही का?
असो. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे ही माझी स्वतःची मते झाली आहेत, तुम्हाला किंवा आणि कोणाला ती पटतीलच असे नाही आणि तसा आग्रहही नाही. तसेच त्यांच्या ब-याचशा बोलण्यात तथ्य आहे, जसे की तेच तेच चित्रपट परत परत करणे (हा सचिन+महेश कोठारेला शालजोडीतला आहे का :)) आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या चित्रपटाचे जे कौतुक केले आहे ते आजकालच्या सगळ्या नाही तरी ब-याच चित्रपटांना लागु होईल.चित्रपट बघावा लागेल.
मलाही हा सिनेमा बघायचा
छान परिक्षण. सिनेमा नक्की
उत्तम
+१
छान परिक्षण आहे... चित्रपट
ऋ मस्त ओळख करुन दिली आहेस.
+१