✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले

ग — गणेशा, Mon, 12/13/2010 - 23:55
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/15843#comment-267071 बरेच दिवस लिखन बंद आहे, येथील अनेक कविंच्या कविता वाचुन मन प्रसन्न होते.. त्यांचे पाहुनच जुन्या कविता देत होतो.. स्पुर्ती ती त्यांचीच, विशेष करुन प्रकाशजींच्या कविता आणि प्रतिसाद कायम लिखानाला खुणावत होत्या. आज "ज्ञानराम" यांच्या कवितेमुळे खुप दिवसानी काही तरी लिहिले आहे .. आपल्याला आवडल्यास आनंद द्विगुनीत होयील्च .. ----- भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे ना दिशा, ना आकार ना झंकार माहित घुंगुपाणी विसावलेले मिटलेल्या ओठांत सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त ना दिशा, ना आकार ना झंकार माहित भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले ------ शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
2257 वाचन

💬 प्रतिसाद (5)

घुंगुपाणी विसावलेले मिटलेल्या

गणेशा
Mon, 12/13/2010 - 23:57 नवीन
घुंगुपाणी विसावलेले मिटलेल्या ओठांत हि ओळ घुंगुरपाणी विसावले मिटलेल्या ओठांत अशी वाचावी ही विनती
  • Log in or register to post comments

मित्रा -शुभ सकाळ . सोनेरी

प्रकाश१११
Tue, 12/14/2010 - 07:23 नवीन
मित्रा -शुभ सकाळ . सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे खूप छान आणि मस्त . मन लावून लिहिलेस .आवडले. माझी छान सकाळ तुझ्या कवितेत हरवून गेली. धन्यवाद नि आभार.!!
  • Log in or register to post comments

मनाला भावले

ज्ञानराम
Tue, 12/14/2010 - 09:47 नवीन
"कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त" .......... मनाला भावले.....शब्द रचना छान आहे.... लिहित राहा...
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

संजयशिवाजीरावगडगे
Tue, 12/14/2010 - 20:06 नवीन
आवडली मनापासुन............!
  • Log in or register to post comments

अतिशय हळुवार काव्य.. मझा आ

स्पा
Tue, 12/14/2010 - 20:09 नवीन
अतिशय हळुवार काव्य.. मझा आ गया
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा