बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १

Primary tabs

भानस's picture
भानस in पाककृती
10 Dec 2010 - 11:59 pm

जिन्नस

* पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या
* ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
* सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर
* दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर.
* दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे )
* सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल.

मार्गदर्शन
दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत. साधारण १०/१२ तासांनंतर चांगले मोड आलेले वाल पाण्यात ( शक्यतो कोमट पाणी घ्यावे ) भिजत घालावेत. जेणेकरून वालाचे साल चटकन सुटेल. हे सोललेले वाल म्हणजेच डाळिंब्या.
कढईत तेल घालून चांगले गरम झाले की मोहरी, हिंग व हळदीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग किंचित जास्तच घालावा. ( फोडणी चांगली सणसणीत झाली पाहिजे ) त्यावर लागलीच सोललेल्या डाळिंब्या टाकून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतावे. डाळिंब्या फोडणीस टाकल्या की त्यांचा पंचेंद्रियांना खवळवणारा सुगंध सुटतो. :) या नुसत्या वासानेच डाळिंब्या सोलताना घेतलेल्या कष्टांचे चीज होते. फोडणी सगळ्या डाळिंब्यांना लागली की दोन-तीन भांडी पाणी घालून ढवळून झाकण ठेवावे.

एकीकडे ओले खोबरे/ भाजून घेतलेले सुके खोबरे ( आवड किंवा उपलब्धतेनुसार जे घेतले असेल ते- ), हिरव्या मिरच्या, आले व भाजून घेतलेले जिरे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. साधारण दहा मिनिटे चांगली वाफ आली की झाकण काढून डाळिंब्या ढवळून पाणी कमी झाल्यासारखे वाटल्यास पुन्हा भांडभर पाणी घालून मध्यम आचेवरच अजून पंधरा मिनिटे ठेवून एक चांगली उकळी काढावी. आता जवळपास डाळिंब्या शिजत आल्या असतील. झाकण काढून त्यात वाटलेले खोबरे, जिरे, मिरच्या व आले, लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ व आमसुले घालून मिश्रण ढवळून पुन्हा सात-आठ मिनिटे शिजवावे. नंतर साखर व आवश्यकता वाटल्यास अर्धे भांडे पाणी घालून तीन-चार मिनिटे शिजवून आचेवरून उतरवावे. अत्यंत चविष्ट लागणारी उसळ. वाढताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे. सोबत पोह्याचा भाजका ( किंचित जळका ) किंवा तांदुळाचा तळलेला पापड, गरम गरम तांदुळाची भाकरी व सोलकढी असेल तर.... बेत एकदम फक्कडच जमेल. ब्रह्मानंदीच....... :)

बिरडे

टीपा
डाळिंब्यांची उसळ जितकी पातळ वा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घालावे. आवडत असल्यास लसूण घालावा. मसाला वाटतानाच त्याबरोबर लसणीच्या पाच-सहा पाकळ्या वाटाव्यात. आमसुलाऐवजी चिंचही वापरता येईल. (आमसुले आवडत नसल्यास किंवा ऍलर्जी असल्यास तसे करावे परंतु या उसळीसाठी आमसुले जास्त छान. ) डाळिंब्या शिजायलाही हव्यात पण शक्यतो मोडताही नयेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने ढवळाव्यात. वाफ आणताना झाकणावर पाणी ठेवल्यास डाळिंब्या शिजण्यास मदत होते. साखर आवडत असल्यास घालावी. लाल तिखट अजिबात न घालता फक्त हिरवाच रंग हवा असेल तर हिरव्या मिरच्या जरा जास्त घालाव्यात.

अवांतर : डाळिंब्यांची उसळ विविध पध्दतीने करता येते. प्रकार-२ टाकतेच पाठोपाठ. शिवाय डाळिंबी भातही अप्रतिम लागतो. :)

प्रतिक्रिया

विलासराव's picture

11 Dec 2010 - 12:05 am | विलासराव

माझी आवडती उसळ.

मस्तानी's picture

11 Dec 2010 - 1:31 am | मस्तानी

वालाच्या भाताची पाक्रु लवकरात लवकर टाका please !

भानस's picture

11 Dec 2010 - 1:52 am | भानस

मस्तानी, विलासराव प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

डाळींब्या कितीही चांगल्या भिजल्या असू दे त्या सोलताना उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख दुखते.;)
पाकृ छान, पुढच्या भागाची वाट बघते. फोटू कुठे आहे?

हो ते नख दुखतेच.. आणि कितीही पोट भरलेलं असलं तरी डाळींब्यांची उसळ म्हंटलं की तोंडाला पाणी सुटतेच.
पाकृ. भन्नाट.
कधी एकदा करते असे झाले आहे.

भानस's picture

11 Dec 2010 - 1:49 am | भानस

रेवती, मला तर दिसतोय गं. डा़ळिंब्या सोलताना चांगल्या पाच सहा तास पाण्यात ( गरम पाणी घ्यावे सुरवातीला ) ठेवाव्यात. स्वतःहूनच उमलून येतात. ताटात थोड्या थोड्या घेऊन उरलेल्या कोमट पाण्यातच ठेवून सोलाव्या. फार काही करावेच लागत नाही या पध्दतीने. ( तरीही हे फार कंटाळवाणे काम आहेच म्हणून घरातल्या सगळ्यांना सामील करून घ्यावे यात. ;) )

धन्यवाद.

प्राजु's picture

11 Dec 2010 - 1:54 am | प्राजु

मलाही फोटो नाही दिसत आहे.. :(

भानस's picture

11 Dec 2010 - 2:06 am | भानस

असे का होतेय गं...

उपास's picture

11 Dec 2010 - 1:41 am | उपास

डाळींब्यांचे बिरडे.. मस्तच.. बाहेर सोललेल्या डाळींब्या विकत मिळण्याईतके सुदैवी असाल तर मौजाही मौजा! ;)

भानस's picture

11 Dec 2010 - 1:50 am | भानस

इथे स्वतः मेल्याशिवाय... :)
आभार.

रेवती's picture

11 Dec 2010 - 1:56 am | रेवती

अगदी अगदी!
स्वत: मेल्याशिवाय....

उपास's picture

11 Dec 2010 - 7:53 am | उपास

अगदी इतकुश्या बिरड्यासाठीही तासन तास डाळींब्या सोलत बसावे लागत असल्यानेच मी असं म्हटलं.. आपल्यात नाय बा तेवढा पेशन्स.. बायकोला मस्का हाच एकमेव उपाय नाहीतर दोघांनी तिकडे गेल्यावर लाड करुन घ्यायचे ;)
- (तद्दन आळशी) उपास

विलासराव's picture

11 Dec 2010 - 9:51 am | विलासराव

बाजुच्या तांबे हॉटेलमधे हि उसळ मिळते. थोडक्यात आम्हाला मेल्याशिवायही स्वर्ग दिसतो.
फक्त जरा गोडसर असते गुजराती टाईप.
तुम्ही बनवलेली भाजी एवढी छान दिसतेय की बस्स. खायला बोलवाल तरी माझी काहीच हरकत नाही.

निवेदिता-ताई's picture

11 Dec 2010 - 10:17 am | निवेदिता-ताई

हा हा हा .............अगदी बरोबर..............स्वत: मेल्याशिवाय....???????????????

बेसनलाडू's picture

11 Dec 2010 - 1:56 am | बेसनलाडू

फोटो पाहून जीभ खवळली. बायकोकडे या उसळीसाठी कटकट करावी लागणारसे दिसते (दोष भानसताईंचा!)
(खवय्या)बेसनलाडू

काही प्रश्न- वाल आणि डाळिंब्यांत (असल्यास) काय फरक? कडवे वाल नि साधे वाल यांत (असल्यास) काय फरक)? की सगळे (इकडून तिकडून) सारखेच? :)
(जिज्ञासू)बेसनलाडू

भानस's picture

11 Dec 2010 - 2:04 am | भानस

फरक नाही.( निदान माझ्या माहितीनुसार ) मात्र कडवे वाल व गोडे वाल यांच्या चवीत खूप फरक आहे. कडवे ते कडवेच. फोडणीत पडलेच की कधी एकदा घास तोंडात जातोय असे होऊन जाते... :) कडवे नसलेच तर ( जिव्हेचे चोचले अनावर झाले म्हणून... नाईलाजाने ) गोडे वाल करायचे अन समाधान मानायचे झालं. शिवाय मायदेशीही बरेच वेळा कडवे वाल सहजी ( प्रत्येक किराणावाल्याकडे किंवा सर्रास मॉल्स मध्येही ) मिळत नाहीत तर देशाबाहेर तर विचारूच नका.

बायकोला डाळिंब्या सोलायला मदतही करा बरं का... ( निदान थोडा दोष हलका होईल... ;) ) धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

5 Nov 2013 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

कडवे वाल चवीस (गोड्यावालापेक्षा) किंचित कडसर असतात.

वाल भिजवून सोलले की सोललेल्या वालांना डाळींब्या किंवा बिरड्या म्हणतात.

आम्ही उसळीत साखरे ऐवजी गुळ घालतो. शिवाय भरपूर कोथिंबीर.
उसळीत फोडणी करताना त्यात ओवा जरूर घालावा. वाल वातकारक असल्याने वात प्रकृतीच्या व्यक्तीला बाधू शकतात. ओवा वात हारक आहे. वात विरहित पचनास मदत करतो.

उसळ कमी पातळ केली तर, नुसते कच्चे तेल घालून, 'मधल्यावेळचे खाणे' म्हणूनही अप्रतिम लागते.

चिंतामणी's picture

11 Dec 2010 - 8:29 am | चिंतामणी

फोटो पाहून जीभ खवळली. बायकोकडे या उसळीसाठी कटकट करावी लागणारसे दिसते

मला एकट्यालाच जास्त आवडत असल्याने योग यायला वेळ लागतो. :(

मी केव्हाही बिरडं खाण्यासाठी ते सोलून द्यायला तयार असतो. चला ह्या वीकांतासाठी आणखी एक भर टाकतो..

- (बिरडेवाला) पिंगू

मदनबाण's picture

11 Dec 2010 - 6:21 am | मदनबाण

हा...जिभवर लगेच चव निर्माण झाली बघा. :)
फोटु बी लयं झ्याक काढला हाय... :)

अविनाशकुलकर्णी's picture

11 Dec 2010 - 9:25 am | अविनाशकुलकर्णी

काहि वेळा डाळिंब्या व्यवस्थित शिजत नाहित..टचटचित रहातात..त्यावर काहि उपाय?....

भानस's picture

11 Dec 2010 - 9:55 pm | भानस

डाळिंब्या फोडणीत घातल्या की व्यवस्थित हलवून दोन भांडी पाणी घालावे. आंच मध्यम ठेवून वरती झाकण ठेवून त्या झाकणावरही पाणी घालावे. साधारण दहा ते बारा मिनिटांनी झाकणावरचे पाणीही डाळिंब्यावर टाकून पुन्हा हलवून अजून एक वाफ आणावी. जोवर डाळिंब्या बोटचेप्या होत नाहीत तोवर मीठ, गूळ्/साखर व अमसूल यातले काहीही घालू नये. कमी शिजलेल्या डाळिंब्या गूळ/साखरेने ताठरून जातात. नंतर शिजत नाहीत.

फोटोपाहुन जीव गेला. सजावट मस्तच.

रेसीपी मस्त आहे पण फोटो दिसत नाही..

काय करू.??????

भानस's picture

11 Dec 2010 - 10:04 pm | भानस

काय गडबड आहे मला कळत नाही. :(
चिंतामणी, पिंगू, -Nile, कौशी व मदनबाण धन्यवाद. :)

प्रियाकूल's picture

23 Feb 2013 - 7:43 pm | प्रियाकूल

ह्याला आव्रिकै असहि म्हन्तात का?

प्रियाकूल, मी तरी हा शब्द ऐकला नाहीये.

रश्मि दाते's picture

23 Feb 2013 - 10:32 pm | रश्मि दाते

फोटो दिसत नाहीये

भानस's picture

5 Nov 2013 - 7:30 am | भानस

मला फोटो दिसतोय नीट. आता यावर काय बरे उपाय करावा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2013 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

वालाचे बिरडे म्हणजे जीव की प्राण... आठवड्यातून एकदातरी हवेच... आणि होतेच !

फोटो बाकी जीवघेणा आहे... पण आत्ताच बिरडे खाऊन मिपावर चक्कर मारायला आलोय म्हणूनच जगलोवाचलो आहे :)

भानस's picture

5 Nov 2013 - 7:32 am | भानस

इस्पीकचा एक्का, धन्यवाद! बिरडे असे नुसते म्हटले तरिही लगेच जठराग्नी खवळायला लागतो. :)

अविनाशकुलकर्णी's picture

23 Feb 2013 - 10:53 pm | अविनाशकुलकर्णी

पुण्याला आपटे रोडवर आशा डायनिंग होल आहे तिथे कायम बिरड्याची उसळ असते...
मस्त बनवतात ..
रेसिपी आवडली ...

भानस's picture

5 Nov 2013 - 7:33 am | भानस

अविनाश कुलकर्णी.:)

स्वाती दिनेश's picture

23 Feb 2013 - 11:00 pm | स्वाती दिनेश

पाकृ छान!फोटू का दिसत नाहीये?
(प्रत्येक घरच्या उसळीची पध्दत आणि त्याबरोबरच चव वेगळी..)
स्वाती

पाकृ छान आहे आणि फोटो सुद्धा मस्त.. पण वाल कडु असतात थोडे चवीला.... त्यामुळे जास्त आवडत नाहीत.

भानस's picture

5 Nov 2013 - 7:34 am | भानस

अनेक आभार्स! वालाचा कडवटपणा मोडण्यासाठी गूळ/साखर घालावी. :)

अनन्न्या's picture

27 Feb 2013 - 7:45 pm | अनन्न्या

मस्त दिसतेय उसळ!! मी यात कांदा घालते.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2013 - 10:40 am | अत्रुप्त आत्मा

फोटू मस्त आलाय. :-)

भानस's picture

5 Nov 2013 - 7:35 am | भानस

अत्रुप्त आत्मा, आभार्स!

त्रिवेणी's picture

28 Feb 2013 - 11:13 am | त्रिवेणी

मलाही फोटो दिसत नाही. plz परत एकदा फोटो पोस्ट करा ना?
डाळिंब्यांची उसळ पहिल्यांदा केली तेव्हा सालासहीतच केली होती. नंतर कळले की साल काढायचे असते.

भानस's picture

5 Nov 2013 - 7:37 am | भानस

मला फोटो दिसतोय. आशा आहे तुम्हालाही दिसेल.

सालासहीत.:D

पियुशा's picture

28 Feb 2013 - 11:59 am | पियुशा

ओइंग !!! मलाही दिसत नाहिये फोटु. मुळात हा प्रकार कधी पाहिला नाही, खाणे तर दुरच म्हणुन निदान फोटु पाहुन तरी समाधान मानले असते तेदेखील नै नशिबात आमच्या ;)

भानस's picture

5 Nov 2013 - 7:38 am | भानस

फोटो दिसतोय. तुम्ही पुन्हा एकदा पाहाल का? :)

धन्यवाद!

कच्ची कैरी's picture

4 Mar 2013 - 12:19 pm | कच्ची कैरी

मी हि उसळ एकदाच खाल्ली आहे फार आवडली होती मला पण ते सोलण्याच्या धाकात कधी करून पाहीली नाही
http://mejwani.in/

भानस's picture

5 Nov 2013 - 7:40 am | भानस

मग तीच चव आठवत सोलायला घ्या. कधी कढईत फोडणीला पडतील कळणारही नाही. :)

धन्यवाद!

आवडली सगळ्यांना,धन्यवाद.

भानस's picture

5 Nov 2013 - 7:41 am | भानस

रश्मि, वा! आवडली सगळ्यांना हे वाचून खूप मस्त वाटले. धन्यवाद! :)

हे भारतात ऑनलाईन मिळत नाहीत.
लोक हजार प्रकारचा राजमा विकतात पण वाल नाही.