बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १
जिन्नस
* पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या
* ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
* सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर
* दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर.
* दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे )
* सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल.
मार्गदर्शन
दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत. साधारण १०/१२ तासांनंतर चांगले मोड आलेले वाल पाण्यात ( शक्यतो कोमट पाणी घ्यावे ) भिजत घालावेत. जेणेकरून वालाचे साल चटकन सुटेल. हे सोललेले वाल म्हणजेच डाळिंब्या.
कढईत तेल घालून चांगले गरम झाले की मोहरी, हिंग व हळदीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग किंचित जास्तच घालावा. ( फोडणी चांगली सणसणीत झाली पाहिजे ) त्यावर लागलीच सोललेल्या डाळिंब्या टाकून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतावे. डाळिंब्या फोडणीस टाकल्या की त्यांचा पंचेंद्रियांना खवळवणारा सुगंध सुटतो. :) या नुसत्या वासानेच डाळिंब्या सोलताना घेतलेल्या कष्टांचे चीज होते. फोडणी सगळ्या डाळिंब्यांना लागली की दोन-तीन भांडी पाणी घालून ढवळून झाकण ठेवावे.
एकीकडे ओले खोबरे/ भाजून घेतलेले सुके खोबरे ( आवड किंवा उपलब्धतेनुसार जे घेतले असेल ते- ), हिरव्या मिरच्या, आले व भाजून घेतलेले जिरे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. साधारण दहा मिनिटे चांगली वाफ आली की झाकण काढून डाळिंब्या ढवळून पाणी कमी झाल्यासारखे वाटल्यास पुन्हा भांडभर पाणी घालून मध्यम आचेवरच अजून पंधरा मिनिटे ठेवून एक चांगली उकळी काढावी. आता जवळपास डाळिंब्या शिजत आल्या असतील. झाकण काढून त्यात वाटलेले खोबरे, जिरे, मिरच्या व आले, लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ व आमसुले घालून मिश्रण ढवळून पुन्हा सात-आठ मिनिटे शिजवावे. नंतर साखर व आवश्यकता वाटल्यास अर्धे भांडे पाणी घालून तीन-चार मिनिटे शिजवून आचेवरून उतरवावे. अत्यंत चविष्ट लागणारी उसळ. वाढताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे. सोबत पोह्याचा भाजका ( किंचित जळका ) किंवा तांदुळाचा तळलेला पापड, गरम गरम तांदुळाची भाकरी व सोलकढी असेल तर.... बेत एकदम फक्कडच जमेल. ब्रह्मानंदीच....... :)
टीपा
डाळिंब्यांची उसळ जितकी पातळ वा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घालावे. आवडत असल्यास लसूण घालावा. मसाला वाटतानाच त्याबरोबर लसणीच्या पाच-सहा पाकळ्या वाटाव्यात. आमसुलाऐवजी चिंचही वापरता येईल. (आमसुले आवडत नसल्यास किंवा ऍलर्जी असल्यास तसे करावे परंतु या उसळीसाठी आमसुले जास्त छान. ) डाळिंब्या शिजायलाही हव्यात पण शक्यतो मोडताही नयेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने ढवळाव्यात. वाफ आणताना झाकणावर पाणी ठेवल्यास डाळिंब्या शिजण्यास मदत होते. साखर आवडत असल्यास घालावी. लाल तिखट अजिबात न घालता फक्त हिरवाच रंग हवा असेल तर हिरव्या मिरच्या जरा जास्त घालाव्यात.
अवांतर : डाळिंब्यांची उसळ विविध पध्दतीने करता येते. प्रकार-२ टाकतेच पाठोपाठ. शिवाय डाळिंबी भातही अप्रतिम लागतो. :)
टीपा
डाळिंब्यांची उसळ जितकी पातळ वा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घालावे. आवडत असल्यास लसूण घालावा. मसाला वाटतानाच त्याबरोबर लसणीच्या पाच-सहा पाकळ्या वाटाव्यात. आमसुलाऐवजी चिंचही वापरता येईल. (आमसुले आवडत नसल्यास किंवा ऍलर्जी असल्यास तसे करावे परंतु या उसळीसाठी आमसुले जास्त छान. ) डाळिंब्या शिजायलाही हव्यात पण शक्यतो मोडताही नयेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने ढवळाव्यात. वाफ आणताना झाकणावर पाणी ठेवल्यास डाळिंब्या शिजण्यास मदत होते. साखर आवडत असल्यास घालावी. लाल तिखट अजिबात न घालता फक्त हिरवाच रंग हवा असेल तर हिरव्या मिरच्या जरा जास्त घालाव्यात.
अवांतर : डाळिंब्यांची उसळ विविध पध्दतीने करता येते. प्रकार-२ टाकतेच पाठोपाठ. शिवाय डाळिंबी भातही अप्रतिम लागतो. :)
वाचने
28121
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
व्वा!!!!!!!!!!!
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by मस्तानी
देते लवकरच.
डाळींब्या कितीही चांगल्या
In reply to डाळींब्या कितीही चांगल्या by रेवती
हो ते नख दुखतेच.. आणि कितीही
In reply to डाळींब्या कितीही चांगल्या by रेवती
फोटो दिसत नाहीये का...
In reply to फोटो दिसत नाहीये का... by भानस
मलाही फोटो नाही दिसत आहे..
In reply to मलाही फोटो नाही दिसत आहे.. by प्राजु
:(
मस्तच..
In reply to मस्तच.. by उपास
ते लाड मायदेशीच ..
In reply to ते लाड मायदेशीच .. by भानस
अगदी अगदी! स्वत:
In reply to अगदी अगदी! स्वत: by रेवती
म्हणनूच..
In reply to अगदी अगदी! स्वत: by रेवती
आमच्या
In reply to अगदी अगदी! स्वत: by रेवती
हा हा हा .............अगदी
तोंडाला पाणी सुटले
In reply to तोंडाला पाणी सुटले by बेसनलाडू
वाल आणि डाळिंब्यात
In reply to वाल आणि डाळिंब्यात by भानस
मस्तं पाककृती.....
In reply to तोंडाला पाणी सुटले by बेसनलाडू
सेम टु सेम हिअर.
मी केव्हाही बिरडं खाण्यासाठी
हा...जिभवर लगेच चव निर्माण
काहि वेळा डाळिंब्या व्यवस्थित
In reply to काहि वेळा डाळिंब्या व्यवस्थित by अविनाशकुलकर्णी
धन्यवाद.
फोटोपाहुन जीव गेला. सजावट
रेसीपी मस्त आहे पण फोटो दिसत
In reply to रेसीपी मस्त आहे पण फोटो दिसत by कौशी
ओह्ह...
एक प्रश्न..
In reply to एक प्रश्न.. by प्रियाकूल
काही कल्पना नाही बुवा!
फोटो दिसत नाहीये
In reply to फोटो दिसत नाहीये by रश्मि दाते
असे का होतेय?
वालाचे बिरडे म्हणजे जीव की प्राण...
In reply to वालाचे बिरडे म्हणजे जीव की प्राण... by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद!
पुण्याला आपटे रोडवर आशा
In reply to पुण्याला आपटे रोडवर आशा by अविनाशकुलकर्णी
धन्यवाद
वावा..
पाकृ छान आहे आणि फोटो सुद्धा
In reply to पाकृ छान आहे आणि फोटो सुद्धा by Mrunalini
अभिप्रायबद्दल
आले पहिल्यांदाच पाहिले !!
फोटू मस्त आलाय.
In reply to फोटू मस्त आलाय. by अत्रुप्त आत्मा
आभार्स!
मलाही फोटो दिसत नाही. plz परत
In reply to मलाही फोटो दिसत नाही. plz परत by त्रिवेणी
त्रिवेनि,
ओइंग !!! मलाही दिसत नाहिये
In reply to ओइंग !!! मलाही दिसत नाहिये by पियुशा
पियुशा..
एकदाच
In reply to एकदाच by कच्ची कैरी
आवडली होती नं
परवाच केली होती तुमचया रेसेपी प्रमाणे
ओह्ह!
ऑनलाईन घेण्यासाठी कुणाकडे लिंक असल्यास प्लीज द्या