तो कवी..ती कवियित्री..
-------------------------------------
तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री..
हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..
त्याच्या कवितेत..भरक़टलेल्या दिशा,निखळणारे तारे,
तिच्या कवितेत..भिजलेल्या उशा अन पिसाटलेले वारे..
तिच्या कवितेत किणकिणतो..रात्रभर चुडा..
त्याच्या कवितेत किरकिरतो..सदा रातकिडा..
तिच्या कवितेत असतो..स्वप्नांचा सुंदर गाव..
ह्याच्या पाठीवर बसतात..नेहेमी घावामागुन घाव..
रात्रभर तळमळुन बिचारी..वाट पाहुन झोपते...
तिची झोपमोड करतो हा नेहेमी पहाटे पहाटे...
त्या वळणावर वाट पाहते ती त्याची बिचारी..
रणांगणावर उपसत असतो हा तेव्हा तलवारी..
मोगर्याच्या शेजेवरती ही बिचारी बसते झुरत..
सरणावरती मरणाची हा वाट पाहत असतो घोरत...
तरीही दोघांचे पटते..जरी चिडतात..वैतागतात..
रात्र रात्र दोघेही..कविता ऐकवत जागवतात...
तसे होत नाही फार काही लग्नानंतर नऊ महीन्यांनी..
बाहेर पडतो एक कवितासंग्रह ("रणांगणावरील श्रुंगार" नावाचा किंवा "श्रुंगारातील रण" नावाचा)मिळुन रचलेला दोघांनी..
--------योगेश .
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1974
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवियित्री नव्हे, कवयित्री
कडक! आवडलेच! मस्तच लिहिलंय.
मस्त आहे कविता!
मस्त कविता.
तुमच्या सगळ्या कविता आवडतात.
हाहा
तिच्या कवितेत
योग्या जबरी एकदम ... पुन्हा