'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्वास घेतला.
पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईत आयोजित केलेल्या "महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात राजकीय पुढाऱ्यांना लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पोवाड्यांची खास मेजवानी मिळाली होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच नागपुरात यशवंत स्टेडियमवरदेखील त्यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. "टिंग्या' आणि "विहीर' या गाजलेल्या अलीकडच्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या प्रमुख भूमिकादेखील होत्या.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना गुरुवारी 104 पेक्षा जास्त ताप होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी नागपूरला न जाण्याचा सल्ला दिला होता. पण, दीक्षाभूमीवर येण्याच्या त्यांच्या जिद्दीपुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. "मला नागपूरला जाऊ द्या, कदाचित हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल,' असेही त्यांनी कुटुंबीयांजवळ बोलून दाखविले होते.
विठ्ठल उमप यांना..... " मिपाकरांकडून" भावपूर्वक श्रद्धांजली ......... !!!!

वाचने
4862
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
विठ्ठल उमप यांना भावपुर्ण
खरच विठ्ठल उमप यांच्या
बरेच झाले. ज्या पुरस्काराचा
In reply to खरच विठ्ठल उमप यांच्या by जोशी 'ले'
+1
In reply to बरेच झाले. ज्या पुरस्काराचा by मृत्युन्जय
हो रे .......... संपादक
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना
असेच म्हणते..
विनम्र श्रध्दांजली!
विनम्र श्रध्दांजली!
विठ्ठल उमप यांना श्रद्धांजली.....
तरुणांनाही लाजवेल असा उत्साह
शाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र
लोकशाहीराला भावपूर्ण
एक तारा निखळला.... पण