✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिहार निवडणूक निकाल

न
नितिन थत्ते यांनी
Wed, 11/24/2010 - 10:34  ·  लेख
लेख
बिहार निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे घवघवीत यश. त्याबद्दल नीतिश कुमार यांचे अभिनंदन !!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9905 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

दोन ओळींमधले...

विकास
गुरुवार, 11/25/2010 - 18:06 नवीन
कदाचीत हा आता उपलब्ध असलेला अग्रलेख मला वाटते कदाचीत संगणकाने नजरेखालून घातला असावा आणि काहीतरी तांत्रिक गडबड वगैरे म्हणत, "Warning: Invalid argument supplied " असे म्हणून वाचकांना सावध केलेले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चांगला धडा

सुनील
Wed, 11/24/2010 - 18:59 नवीन
जाती, धर्म, भाषा असल्या पोकळ मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मतदान होत असेल तर, सर्वच पक्षांसाठी तो एक चांगला धडा ठरेल.
  • Log in or register to post comments

पतन

तिमा
Wed, 11/24/2010 - 20:31 नवीन
काँग्रेसच्या पतनाची ही सुरवात आहे. महाराष्ट्रातली जनता कधी शहाणी होणार ?
  • Log in or register to post comments

२०७

क्लिंटन
Wed, 11/24/2010 - 21:53 नवीन
टाईम्स ऑफ इंडियामधील बातमीप्रमाणे आताचा लेटेस्ट आकडा २०७!! नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद(यु) आणि भाजप युतीने अभूतपूर्व यश संपादन केले.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जातीपातींच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर पडून मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले आहे असेच दिसते.जनमताचा कौल इतका निर्विवाद आहे की त्याविषयी कोणालाही शंका घेता येणार नाही.१९९० ते २००५ या काळात माकडचाळे करून बिहारी जनतेला खोटी आशा दाखवत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या लालू यादवांच्या पक्षाचा पुरता पाडाव झाला हे सगळ्यात चांगले झाले.लालू यादव यांच्या बरोबर युती करून निवडणुक लढविणारे रामविलास पासवान आणि लालूं-राबडींच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचाही मोठा पराभव झाला यावरूनच लालूंच्या सरकारशी संबंधित प्रत्येकाला जोरदार धडा लोकांनी शिकवला आहे असे दिसते.असे म्हणतात की in politics, you can fool some people all the time, you can fool all the people some time but you cannot fool all the people all the time. लालूंना त्याची प्रचिती आली असेल. मागे मिसळपाववरील विविध वेगळ्या चर्चांमध्ये ’ही कसली लोकशाही’ अशा स्वरूपाची मते अनेकांनी व्यक्त केली होती.अशांचे शंकानिरसन आजच्या या निकालाने झाले असेल अशी आशा करू या. तसेच २०७/२४३ म्हणजे पाच-षष्ठांशापेक्षा जास्त बहुमत नितीशकुमारांना मिळाले आहे.असेच किंबहुना यापेक्षाही मोठे बहुमत जयललितांना १९९१ मध्ये तमिळनाडूत मिळाले होते.पण नंतरच्या काळात आपल्या सामर्थ्याची नशा चढलेल्या जयललितांनी काय केले हे वेगळे सांगायलाच नको. यापासून धडा घेऊन नितीशकुमार आपले पाय जमिनीवरच ठेऊन बिहारमधील विकासप्रक्रिया पुढे नेतील अशी आशा करू या. क्लिंटन
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र आणि बिहार !!

अर्धवटराव
Wed, 11/24/2010 - 22:02 नवीन
नितीश कुमारांचे आणि रा.लो.आ. चे अभिनंदन. विकासाची तहान लागलेल्या बिहारी जनतेने नितीशकुमारांचे काम बघुन त्यांना दुसरा चान्स दिला. या सूज्ञपणाबद्दल बिहारी जनता देखील अभिनंदनास पात्र आहे. आता राहिला मुद्दा कि महाराष्ट्रात असं काहि होईल कि नाहि... मला वाटतं, शक्यता कमी आहे. सगळ्यात मुख्य कारण म्हणजे लालूंची जी इमेज बिहार मध्ये होति/आहे तेव्हढी खराब इमेज महाराष्ट्रात काँग्रेस नेतृत्वाची नाहि. बिहारी जनता रा.ज.द. पेक्षा "लालूंना" कंटाळाली होती. महाराष्ट्रात काँग्रेस एक पक्ष म्हणुन सक्षम आहे. इथे पक्षाला एकच एक चेहरा नाहि कि ज्याच्या विरोधात मते एकजूट व्हावीत. दुसरं असं कि बिहारमध्ये "लालूंचा काटा काढायला नितीश" असं समीकरण जमलं. महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा असा कोण नेता आहे कि ज्याच्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवावा ?? तीसरं कारण काँग्रेस पक्षाची रा. काँग्रेससोबत असलेली युती. हे दोन पक्ष आपापसात कितीही लट्ठालट्ठी करोत, पण दोघांपैकी कुणी एकाने जरी थोडं चांअगलं काम केलं तरी फायदा त्यांच्या युतीला होतोच. मराठी जनता काँग्रेसशी नेहमीच प्रामाणीक राहिली आहे आणि शरद पवारांची इमेज चांगलीच आहे. ह्म्म्म... आता जर एव्हढ्यात महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचीत भा.ज.प.-सेना युतीला बिहार मधल्या निकालांचा थोडा फायदा झाला असता... तसही "आदर्श" वगैरे प्रकरण मराठी जनता बघतेच आहे. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा