यापूर्वी मेघनाने 'सुगरणीच्या सल्ला' मध्ये पोह्यांचे वेगवेगळे प्रकार दिले होते. त्याआधी काही धागे निघाले असतील तर माहित नाही. तेव्हा मिपा सुगरणींना आणि सुगरणांना विनंती की त्यांनी आधीच्या धाग्यात भर घालावी अथवा नवीन धागा काढून त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या पोह्यांची पाकृ द्यावी.
प्राजुला दहा प्रकारचे पोहे माहित आहेत, शाल्मलीने सांगितलेले फ्लॉवर पोहे आज पहिल्यांदाच वाचले तेव्हा अशा वेगळ्या प्रकारांची सचित्र माहिती आली तर फारच बरं होईल. त्याचं काय आहे, पोहे हा अंमळ भारीच हळवा कोपरा आहे.
सहमत.
फ्लॉवर, मटार, वांगी या भाज्या मिक्स किंवा एकेक आवडीप्रमाणे फोडणीत परतायच्या आणि पोहे नेहमीप्रमाणे करायचे.
सगळे प्रकार छानच लागतात. अगदी वांगीपोहेसुद्धा!
मला कोळाच्या पोह्यांची कृती माहित नाही. कोणी पायरीपायरीने देत असेल तर बरे होइल.
पोहे हा माझाही हळवा कोपरा आहे. माझ्या इथे ज्या हिरव्या मिरच्या मिळतात त्या इतक्या बंडल असतात कि तिखटपणा नावालाच असतो. पण भारतात खूप छान मिरच्या मिळतात, त्याचा स्वाद मस्तच!
प्रतिक्रिया
मस्त
पोहे...आवडता पदार्थ..पण मी
पोह्यांचा पेश्शल धागा काढा ब्वॉ!!!
सहमत. फ्लॉवर, मटार, वांगी या
थाई चिली नावाने आपल्याकडच्या
माहितीबद्दल धन्यवाद!
मस्त लेख !!