झुरळाने मिशा फेंदारुन एकदा
कविता करायचे ठरवले..
बिळात बिळात मिशा टाकुन.
नुसते विषय हुडकले..
त्याला विषय मिळाले खुप
पण सुचली नाही कविता..
अहो,कविता फक्त करता येते..
दाढी खाजवता खाजवता..
एकदा झुरळाला कशीबशी
एक कविता सुचली..
मिशामिशा फेंदारुन त्याने
झुरळीसमोर वाचली..
झुरळी म्हणाली त्याला..
काय पण हुरळलाय गडी..
अहो...जरा सबुरीने...
कविता केलीये..आता तुम्हाला फुटेल दाढी..
दाढीवालं झुरळ..म्हणताच..
झुरळ दचकलं जाम ..
आपल्या मिशाच बर्या बुवा..
कविता करणे आपले नाही काम..
झुरळाने कितीही मिशा फेंदारल्या
तरी त्याला वाघ होता येत नाही..
दाढी फुटल्या शिवाय कुणाला
कविता करता येत नाहीत..
बोकडाला पण दाढी असते..
ते का कविता नाही करत?
कारण बोकड सदा न कदा
शिंगे असते मारत..
वाघ एवढा शुर.त्याला तर दाढी आणि मिशा...
तो ही का मग कविता करत नाही ..
कारण वाघाला दाढीमध्ये बोट घालुन.
खाजविता येत नाही...
A poets' diellema..
झुरळाने वाचले स्तोत्र..
झुरळाने केली आरती..
तरी पण झुरळाला कविता
करता का आली नव्हती?
आरती करणे नाही हो सोपे
घालुन दाढीत एक हात
कुठे भलतीकडे खाज सुटली तर
वापरायच कुठला हात..
विचार करकरुन झुरळ
जाम थकले..
मिशासकट त्याने त्याचे
सारे पाय टेकले..
एक तर त्याला प्रश्न..
हात म्हणुन वापरायचे तरी काय?
आणि जर काही सुचलेच..
तर खाजवायचे तरी काय?
(मिशीवाला) योगेश.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2357
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगले लिहिले आहे रे .....
हा हा हा ... मस्त!
काहीही
काहीही
काय बी समजले नाय बा! हे
In reply to काहीही by भाऊ ठाकुर
(विषय दिलेला नाही)
In reply to काय बी समजले नाय बा! हे by कानडाऊ योगेशु
जबराट ...
In reply to काय बी समजले नाय बा! हे by कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया झेपत नसतील तर...
मी ठार चुकलो भा(ई)ऊ..तुम्ही
In reply to प्रतिक्रिया झेपत नसतील तर... by भाऊ ठाकुर
दाढी