Skip to main content

न-निशाण

लेखक तिमा यांनी रविवार, 14/11/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
जय नांवाच्या इतिहासावर रणांचा पण इतिहास आहे नाना-नानी बागेमध्ये चघळण्याचा विषय आहे वर्तमानाच्या मोजफितीवर इतिहासाला मापत आहेत डोळ्यांवरती पट्टी बांधून तराजुवर डोलत आहेत महाकाय या बोधकथेवर लघुमतींचे प्रवचन आहे युगंधराच्या न्यायबुध्दीला केविलवाणे दूषण आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1146
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

करण अर्जून श्रेष्ठत्वाच्या युद्धात अजून एक निशाणेबाज! चालू दे :)