कोळशाचा उपयोग मागच्या तीन दशकांत तिप्पट झाला आहे. तो येत्या दशकात आजच्या तुलनेत दुप्पट होईल. आपली ऊर्जेची गरज २०३० सालापर्यंत आजच्या तुलनेत त्यात कोळशापासून होणा-या ऊर्जेचा सर्वात मोठा भाग असेल. कोळश्यामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईड पसरतो, प्रदूषण वाढते. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढते व त्याचे परिणाम विशेषतः हवामानावर होतात. येणा-या शतकात पर्जन्यवृष्टी नियमबध्द होणार नाही. नद्या व तलाव धोक्यात येतील, पाण्याची समस्या वाटेल. शिवाय नद्यांच्या प्रत्यक्ष प्रदुषणांमुळे त्यांची स्थिती बिकट होईल. नद्यांच्या काठावरचे कारखाने, प्रवाहात सोडलेली रसायने, औद्योगिक घाण, मनुष्यविष्टा यांमुळे भारतातील सा-याच नद्या स्वच्छ राहणार नाहीत.
संदर्भ - एका दिशेचा शोध; लेखक- संदीप वासलेकर; प्रकाशक- राजहंस प्रकाशन
ही सगळी अनुमाने काढलेली आहेत स्ट्रॅटेजिक फ़ोरसाईट ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर यांनी. एका दिशेचा शोध या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतचे आपले स्व-अनुभव वाचकांसोबत शेअर केलेले आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला हा माणूस स्वत:च्या गळ्यात मृत्यूचा फ़ास आवळून घेत आहे याची कल्पना आली. हा वासलेकरांचा अनूभव वाचत असतांना स्व. लेखक बाबुराव बागूल यांच्या मरण स्वस्त होत आहे या अजरामर कथेची आठवण झाली. या कथेतील पात्र , माणसं जशी स्वत:हून मरणाच्या शोधात हिंडतात तशीच काहीशी अवस्था आज विज्ञाननिष्ट समाजात जगणा-या माणसाची झालेली आहे.
विज्ञान हे कधीच चुकू शकत नाही. जरी माणसाने विज्ञानाचा शोध लावलेला असला तरी सुध्दा.. इतिहास साक्षीला आहे, मानवाने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेळोवेळी विज्ञानाचा दुरुपयोग केलेला आहे. विज्ञान म्हणजे काय तर अलाद्दीनचा चिराग. वापरणा-यावर याचे परिणाम अवलंबून असतात हे समजून देखील माणसाची मरण घाई...? हे एक न उलगडणारे कोडे आहे.
प्राणवायू, प्रकाश आणि पाणी या सजीवांच्या मुलभूत गरजा. यावरच आज मानव या ग्रहावर जीवित आहे. मात्र मानवनिर्मीत प्रयोगांमुळे या तीन घटकांची हानी होत आहे. ज्याचे परीणाम आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे त्यात मात्र शंका नाही .जर आपण निसर्गाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिलो तर निसर्ग आपल्याशी एकनिष्ट राहील. त्यासाठी आपण पर्यायी ऊर्जा साधनांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. लेखकाला आपल्या अनुभवातून आणि अभ्यासातून वाचकांना हाच संदेश द्यायचा असावा असं मला व्यक्तीगतरित्या वाटतं....
अधिक माहितीसाठी वाचा- http://www.facebook.com/profile.php?id=100001063917416&v=info#!/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
वाचन संख्या
1992
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अणु उर्जा वापरावि म्हणुन
अणु उर्जा वापरावि म्हणुन
पुस्तक परीचय
श्री. सावंत
जबराट प्रतिसाद !
In reply to श्री. सावंत by ५० फक्त
कोळसा आयात खूप कमी आहे
In reply to श्री. सावंत by ५० फक्त
नाही पटले.