Skip to main content

सावधानतेचा इशारा

Published on शुक्रवार, 05/11/2010
कोळशाचा उपयोग मागच्या तीन दशकांत तिप्पट झाला आहे. तो येत्या दशकात आजच्या तुलनेत दुप्पट होईल. आपली ऊर्जेची गरज २०३० सालापर्यंत आजच्या तुलनेत त्यात कोळशापासून होणा-या ऊर्जेचा सर्वात मोठा भाग असेल. कोळश्यामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईड पसरतो, प्रदूषण वाढते. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढते व त्याचे परिणाम विशेषतः हवामानावर होतात. येणा-या शतकात पर्जन्यवृष्टी नियमबध्द होणार नाही. नद्या व तलाव धोक्यात येतील, पाण्याची समस्या वाटेल. शिवाय नद्यांच्या प्रत्यक्ष प्रदुषणांमुळे त्यांची स्थिती बिकट होईल. नद्यांच्या काठावरचे कारखाने, प्रवाहात सोडलेली रसायने, औद्योगिक घाण, मनुष्यविष्टा यांमुळे भारतातील सा-याच नद्या स्वच्छ राहणार नाहीत. संदर्भ - एका दिशेचा शोध; लेखक- संदीप वासलेकर; प्रकाशक- राजहंस प्रकाशन ही सगळी अनुमाने काढलेली आहेत स्ट्रॅटेजिक फ़ोरसाईट ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर यांनी. एका दिशेचा शोध या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतचे आपले स्व-अनुभव वाचकांसोबत शेअर केलेले आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला हा माणूस स्वत:च्या गळ्यात मृत्यूचा फ़ास आवळून घेत आहे याची कल्पना आली. हा वासलेकरांचा अनूभव वाचत असतांना स्व. लेखक बाबुराव बागूल यांच्या मरण स्वस्त होत आहे या अजरामर कथेची आठवण झाली. या कथेतील पात्र , माणसं जशी स्वत:हून मरणाच्या शोधात हिंडतात तशीच काहीशी अवस्था आज विज्ञाननिष्ट समाजात जगणा-या माणसाची झालेली आहे. विज्ञान हे कधीच चुकू शकत नाही. जरी माणसाने विज्ञानाचा शोध लावलेला असला तरी सुध्दा.. इतिहास साक्षीला आहे, मानवाने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेळोवेळी विज्ञानाचा दुरुपयोग केलेला आहे. विज्ञान म्हणजे काय तर अलाद्दीनचा चिराग. वापरणा-यावर याचे परिणाम अवलंबून असतात हे समजून देखील माणसाची मरण घाई...? हे एक न उलगडणारे कोडे आहे. प्राणवायू, प्रकाश आणि पाणी या सजीवांच्या मुलभूत गरजा. यावरच आज मानव या ग्रहावर जीवित आहे. मात्र मानवनिर्मीत प्रयोगांमुळे या तीन घटकांची हानी होत आहे. ज्याचे परीणाम आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे त्यात मात्र शंका नाही .जर आपण निसर्गाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिलो तर निसर्ग आपल्याशी एकनिष्ट राहील. त्यासाठी आपण पर्यायी ऊर्जा साधनांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. लेखकाला आपल्या अनुभवातून आणि अभ्यासातून वाचकांना हाच संदेश द्यायचा असावा असं मला व्यक्तीगतरित्या वाटतं.... अधिक माहितीसाठी वाचा- http://www.facebook.com/profile.php?id=100001063917416&v=info#!/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 1992
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अणु उर्जा वापरावि म्हणुन अमेरिकेने हे पिल्लु सोडुन दिले असेल असे वाटते...कित्येक वर्षे आपण कोळसा वापरतो आहे ..इतके दिवस लेखक झोपला होता का?

अणु उर्जा वापरावि म्हणुन अमेरिकेने हे पिल्लु सोडुन दिले असेल असे वाटते...कित्येक वर्षे आपण कोळसा वापरतो आहे ..इतके दिवस लेखक झोपला होता का?

तुम्ही चार चार वेगळे धागे एकाच पुस्तकावर काढायच्या ऐवजी एकच सविस्तर पुस्तक परिचय का लिहीत नाही? का मिपा हे जाहीरातींसारखे वापरत आहात? लेखकाला आपल्या अनुभवातून आणि अभ्यासातून वाचकांना हाच संदेश द्यायचा असावा असं मला व्यक्तीगतरित्या वाटतं.... लेखकाला नक्की कसले कसले अनुभव आहेत? माफ करा मला लेखक माहीत नाही. म्हणूनच येथील माझ्यासारख्या वाचकांना या लेखकाबद्दल पण माहिती सांगितली तर बरे होईल.

मी आज विद्युत उत्पादन क्षेत्राशी निगडित आहे, या क्षेत्रातल्या भविष्यातील अंदाजांनुसार भारतात असणारा कोळस्याचा साठा किति ही हावरट पणाने वापरला तरी पुढ्ची २०० वर्षे आपल्याला काही कमी पडत नाही. तसेच आज वापरला जाणारा कोळ्सा हा फक्त २० % भारतीय आहे. ह्या कोळ्श्याचा विद्युत क्षेत्राला फार कमी उपयोग आहे. हे क्षेत्र त्याला लागणारा ८०% कोळ्सा भारता बाहेरुन मागवते. सध्या प्रयोगावस्थेत असणा-या कोल गॅसिफायर तंत्राच्या सफलतेवर भारतीय कोळस्याची भविष्यातील किंमत / महत्व ठरणार आहे. हे तंत्र व्यायसायिक पातळिवर यशस्वी झाले तर भारत या क्षेत्रात आपल्यावर अवलंबुन राहणार नाही - हाच अमेरिका आणि इतर तथाकथित विकसित देशांचा पोटशुळ आहे. आपण खानावळित जेवुन झाल्यावर इतरांना ' या खानावळितिल जेवंण चांगलं नाही आणि संपत पण आलं आहे, आता तुम्ही असं करा माझ्या ओळखीचं एक ५ स्टार हॉटेल आहे, जा तिकडे जेवायला' (म्हणजे माझे कमिशन पक्कं) अशा प्रकारचा कावा आहे. या आणि अशा लेखकांना अमेरिका आणि इतर तथाकथित विकसित देशांचे तथाकथित एन्जिओज मदत करतात आणि हे देशद्रोही लिहितात. आज काल इतर प्रकारच्या देशद्रोह्यांपेक्षा लेखणीला तलवार ते एके ४७ ते आरडिएक्स ते अण्वस्त्रांपर्यंता काहीही समजणारे पण त्यांच्या आपल्या व आपल्या इतर देशबंधुंवर होणा-या घातक परिणामांकडे जाणुन बुजुन (फुकट मिळणा-या डॉलर वा पाँडामुळे) दुर्लक्ष लेखक कॅटेगरीचे देशद्रोही हे फारच माजले आहेत. + १ श्रि. विकास '' तुम्ही चार चार वेगळे धागे एकाच पुस्तकावर काढायच्या ऐवजी एकच सविस्तर पुस्तक परिचय का लिहीत नाही? का मिपा हे जाहीरातींसारखे वापरत आहात?'' मिपा हे जाहिराती करण्यासाठी वापरले जाउ नये या करितां काही नियम आहेत काय ? हर्षद

In reply to by ५० फक्त

आपले म्हणणे काही प्रमाणात पटले. एकच दुरुस्ती:
तसेच आज वापरला जाणारा कोळ्सा हा फक्त २० % भारतीय आहे. ह्या कोळ्श्याचा विद्युत क्षेत्राला फार कमी उपयोग आहे. हे क्षेत्र त्याला लागणारा ८०% कोळ्सा भारता बाहेरुन मागवते.
माझ्या मते आपली माहिती योग्य नाही. भारतीय कोळसा हा काही उत्तम प्रतीचा कोळसा नाही. पण भारत वापराच्या केवळ ५-१०% च कोळसा आयात करतो. आपली आकडेवारी ऑईल साठी योग्य आहे - ~२०% देशांतर्गत निर्मिती आणि ~८०% आयात.

तुम्ही म्हणता तसे भविष्यात आपल्याला कोळश्यापासून दूर जावेच लागेल - यात काहीच वाद नाही. परतु, यामध्ये अनेक प्रश्न आहेत: १. कोळश्या सारखे दुसरे मुबलक आणि स्वस्त इंधन भारतात उपलब्ध नाही. २. इतर इंधने आणि तंत्रज्ञान यांचा खर्च महाग आहे. हा अधिभार कोण देणार? सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगला विकसनशील देश जबाबदार नाहीत. अधिभार जर विकसित देश देणार असतील, तर त्याबाबत जरूर विचार व्हावा. पण त्यातही उर्जा सुरक्षिततेसारखे (energy security) महत्वाचे पैलू आहेत. ३. अर्थात ऋण अधिभार असणारे तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहेच आणि त्याचा वापर आपण सुरु करायलाच हवा. उदा. उर्जा वापरातील आणि निर्मितीमधील कार्यक्षमता सुधारणा. ४. अणूउर्जा हा सध्या तरी भारतात ठोस असा पर्याय होऊच शकत नाही. त्यामध्येही अनेक समस्या आहेत. जसे की - सध्याचे तंत्रज्ञान (युरेनियम विघटन) आणि त्याचा खर्च, अणूकचरा विघटन प्रक्रिया, युरेनियमसाठी इतर देशांवरचे अवलंबित्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकेबरोबरच्या १-२-३ करारामधील अनेक तरतुदी इ. थोडक्यात काय, तर इतर कोणत्याही पर्यायांविषयी वा उपायांविषयी न बोलता, फक्त कोळसा आणि सध्याचे प्रदूषण यांच्या नावाने उर बडवणे मला तरी पटत नाही. मिपा च्या या धाग्यावर आणि त्यातील काही उत्तम प्रतिक्रियांमधून वरील काही गोष्टींवर चर्चा झालेली आहे.