कुणी झुपके-दार, कुणाची लवलवती देखणी
कुणी केसांचे दोर, मिरविती झुलती केरसुणी
गर्वाने शेपूट उचलती रांपावर मखडुनी
सौष्ठवाचे करीती प्रदर्शन प्रेक्षकास पाहुनी
“शेवटची एन्ट्री येऊद्या” घोषणा ती ऐकुनी
घट्ट भुवरी खिळून राही श्वान पाय रुतवुनी
साखळी खेचित आणी मालक तरीही ओढूनी
हाय, दिले की चुचकारोनी रांपावर सोडुनी
जिथे सोडले तिथेच राही, मान जरा झुकवूनी
परी प्रयत्ने मध्यावरती आणिले परिक्षकांनी
पाहतसे बसलेल्या लोकां, धीर जरासा करुनी
दाद येतसे टाळीभरली, जमलेल्यांच्या कडूनी
क्षणात कळले आपण सुंदर, कडकडाट ऐकोनी
जरी टाकले अपुले शेपूट छाटून मालकानी
उगा चिडविती बाकी कुत्री, बांड्या संबोधुनी
पळत नाही मी त्यांच्या जैसा शेपूट घालोनी!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1481
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता सुरेखच आहे
+१
In reply to कविता सुरेखच आहे by चित्रा
मस्त
चित्रात्मक काव्य!