Skip to main content

जीव गुंतला .. ( चाल खेळ मांडला)

जीव गुंतला .. ( चाल खेळ मांडला)

लेखक गणेशा
Published on रवीवार, 17/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
खालील कविता ही पाचोळ्या प्रती मेघाची ओढ दाखवते आहे. मेघ- पाउस .मेघ - वसुंधरा ह्यांचे नाते सर्वांना माहीत आहेच. पण या नविन नात्याची अनोखी ओढ प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे उसवला श्वास राजा संपला प्रवास तरी न्हाई प्राण सोडला ... जीव गुंतला जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला --- तुझा मेघ
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1631
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया