✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

संघ आणि सिमी सारखेच : भावी पंतप्रधान राहुलजी यांच्रे परखड बोल

ह
हुप्प्या यांनी
Wed, 10/06/2010 - 17:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42890 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

हाहा!

चित्रा
Fri, 10/08/2010 - 03:00 नवीन
वत्सले मातृभूमे, पोटात घे ह्या अज्ञ बालकाला. नको, पृथ्वीच्या पोटात विरजण कोणाला हवे असणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हाण्ण

श्रावण मोडक
Fri, 10/08/2010 - 10:17 नवीन
हाण्ण तिच्या... मला वाटलं सेवा दल म्हणजे समाजवादी सेवादलाची चर्चा चालू आहे. इथं दुवा तर कॉंग्रेस सेवादलाविषयी बोलतोय काही तरी. आता या कॉग्रेस सेवा दलाचा तिरकस उल्लेख सेवा या शब्दावरून कॉंग्रेस वर्तुळातील खाशा स्वाऱ्यांमध्ये कसा होतो हेही सांगावं लागणार की काय? छ्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

नाही

चित्रा
Fri, 10/08/2010 - 16:56 नवीन
तशीच सुरू होती, तिला फाटे फुटले! मूळ सेवादलाला जसे फाटे फुटले तसेच हे. माझी अशी समजूत आहे की कॉंग्रेसमधून समाजवादी जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी राष्ट्र सेवादल सुरु केले. राष्ट्रसेवादल हे काँग्रेस सेवादल जसे काँग्रेसचा भाग आहे तसा समाजवादी पार्टीचा भाग नाहीत, पण त्यांचे कार्यकर्ते हे समाजवादींच्या निवडणुकीत मदत करतात असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हाहाहाहा

श्रावण मोडक
Fri, 10/08/2010 - 00:24 नवीन
आमचे एक मित्र 'स्वयंसेवक' या शब्दाचा तिरकस वापर करायचे त्याची आठवण झाली. ;) या मित्राचा या दोन्ही संघटनांशी काहीही संबंध नव्हता - असेलच तर तो फक्त अशा संघटनांतील तथाकथित आग्रहांच्या फोलपणाचे टीकाकार म्हणूनच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

तो काय हो

चित्रा
Fri, 10/08/2010 - 00:36 नवीन
गांधी टोपीचाही तिरकस उल्लेख होतो. अवांतर - गांधी टोपी हे नाव कसे पडले? कोणी दिले असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

छ्या...

श्रावण मोडक
Fri, 10/08/2010 - 10:15 नवीन
छ्या... टोपीपर्यंत जाण्याची गरज नाही. गांधी या शब्दाचाच तिरकस वापर होतोच की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

ते खरेच

चित्रा
Fri, 10/08/2010 - 16:57 नवीन
तेही खरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

उदाहरणार्थ

विकास
Sat, 10/09/2010 - 03:07 नवीन
गांधी या शब्दाचाच तिरकस वापर होतोच की. इंदिरा गांधी .... ते.... राहूल गांधी? ह्यातील वापर का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

राहूल का राउल ?

गांधीवादी
Sat, 10/09/2010 - 05:34 नवीन
राहूल का राउल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 10/09/2010 - 11:54 नवीन
तोही घेता येईलच की. आमची त्याला काहीही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मार

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/07/2010 - 23:59 नवीन
पण संघाने तरुणींनाही नेहमीच्या शाखांमध्ये प्रवेश दिला तर बहुतेक तरुणांची भरती होईल असे वाटते. ही ऐड्या आम्ही "संघाची आणि समितीची जाईंट ओटीसी भरवावी" ह्या शब्दांत दिली होती, त्यावेळी हिंदुत्त्वाला कसा धोका निर्माण होईल, हे बौद्धिक घेण्यात आले होते. एक वेळ मार परवडला, चित्राताई. पण संघाचे बौद्धिक नको. इतिहासाचे ट्विस्टीकरण (काय शब्द आहे, वा !) करण्याची अधिकृत ठिकाणे, ह्यात संघाचे बौद्धिक येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

हो का?

चित्रा
Fri, 10/08/2010 - 00:19 नवीन
मग लिहा की. भूतकाळाचे ट्विस्टींग जाऊ दे. वर्तमानाचे ट्विस्टींग अजूनही चाललेच आहे तिकडे दुर्लक्ष झालेले दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

ओ!

विकास
Fri, 10/08/2010 - 00:24 नवीन
इतिहासाचे ट्विस्टीकरण (काय शब्द आहे, वा !) करण्याची अधिकृत ठिकाणे, ह्यात संघाचे बौद्धिक येते. अरेच्चा संघ डाव्या विचारांचा आहे, ही बातमी माझ्यासाठी नवीनच आहे! बरे झाले सांगितलेत ते! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

काळजी करू नका

मिसळभोक्ता
Fri, 10/08/2010 - 00:28 नवीन
अधिकृत ठिकाणे, ठिकाण नव्हे. आणि हो, ह्या ठिकाणांत जे एन यू देखील येते. ट्विस्ट करून डावीकडे नेला काय, किंवा उजवीकडे, शेवटी ट्विस्ट केला हे महत्त्वाचे. शेवटी काय, हिंद देश के निवासी, सभी जन एक है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चला ट्विस्ट करू!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/08/2010 - 11:38 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मागे एकदा सेवादलाबद्दल तिथे तरुणांची लग्ने जुळत असे ऐकले होते.

चिंतामणी
Fri, 10/08/2010 - 00:52 नवीन
खरी आहे ही गोष्ट. आज युक्रांदचे (काहीजण फुक्रांद म्हणायचे. ) त्याकाळ्चे धडाडीचे नेते कुठे आहेत? (एखादा नेता कोणाच्यातरी वळचणीला बसल्याने एखाद्या सत्कार समारंभात दिसतो अधेमधे कधीतरी.) [जाताजाता-फुक्रांद ही संज्ञा प्रथम यासंघटनेच्या तत्कालीन नेत्याच्या बायकोनेच दिली होती.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

फालतू

गुंडोपंत
गुरुवार, 10/07/2010 - 05:09 नवीन
फालतू वाक्यांना प्रसिद्धी का देता? मिपा सदस्यांनी या माणसा विषयी लिहावे इतकी व्हॅल्यू नाहीये याची!
  • Log in or register to post comments

भावी

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/07/2010 - 05:51 नवीन
मला वाटते, की भारताच्या भावी पंतप्रधानाच्या वक्तव्यांना महत्त्व दिले जावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

अरेरे

गुंडोपंत
गुरुवार, 10/07/2010 - 06:06 नवीन
उद्या भावी संपादक म्हणतील, मिसळभोक्ता आणि गुंडोपंत सारखेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

भावी

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/07/2010 - 06:23 नवीन
असे असल्यास त्यांना महत्त्व द्यावेच लागेल. त्यांना तसे का वाटते, ह्याचा सखोल विचार करायला हवा. नुसते फालतू म्हणून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

उद्या भावी संपादक म्हणतील,

विजुभाऊ
गुरुवार, 10/07/2010 - 12:59 नवीन
उद्या भावी संपादक म्हणतील, मिसळभोक्ता आणि गुंडोपंत सारखेच! ते तसे म्हणणे अवघड आहे. मिभो अभ्यासू आहेत. मिभोना लिहिण्याची जाण आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

सध्या

विकास
गुरुवार, 10/07/2010 - 06:46 नवीन
सध्या भारताला केवळ "भावी" पंतप्रधानच आहेत. बाकी देश "अभावी" पंतप्रधानावर चालतोय असे वाटते. (असे म्हणताना मनमोहनसिंग यांच्या कार्यक्षमतेबद्दल तिळमात्र शंका नाही. फक्त जे पंतप्रधान म्हणतात की पक्षश्रेष्ठी/सोनीयाजी म्हणतील तेंव्हा पद मोकळे सोडेन तेंव्हा ते नक्की किती पंतप्रधान आहेत यावर शंका निश्चित येते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

+१००

मी ऋचा
गुरुवार, 10/07/2010 - 12:17 नवीन
एक नंबर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

योग्य

आंसमा शख्स
गुरुवार, 10/07/2010 - 06:59 नवीन
माननीय श्री. राहुलजी गांधी जीसाहेब बरोबर बोलले आहेत. एक वेळ सिमी चालेल पण आरएसएस नको असला पाहिजे. लक्षात घ्या सिमी मूलता: जवान लोकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेली संघटना होती. पण पुढे सगळे चुकत गेले. आणि आता आरएसएस व सिमी यात फार फरक नाही हे सत्यच आहे. आरएसएसला इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही आणि सिमीला किती प्रयत्न केला तरी आजचा भारत बदलता येणार नाही हे सत्य आहे! फक्त राहुलजीसाहेब च ही बात समजले आहेत. ते जे बोलले ते बरोबर आहे.
  • Log in or register to post comments

एक वेळ सिमी चालेल ?

गुंडोपंत
गुरुवार, 10/07/2010 - 07:26 नवीन
एक वेळ सिमी चालेल? काय बोलताय काय? काय यडे झाले तूम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

चालेल

आंसमा शख्स
गुरुवार, 10/07/2010 - 07:29 नवीन
एक वेळ चालेल असे म्हंटले मी. आधी वाचा काय लिहिले ते. खुदा करम करे दिल का मैल धुलाये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

अरे

गुंडोपंत
गुरुवार, 10/07/2010 - 07:33 नवीन
संघाचे काय कार्य आहे, ते तरी माहिती आहे का रे तुम्हाला? उगाच कशाला काहीही बरळता? मैल म्हणे! कोणता मैल रे? तुमचा देशद्रोही मैल काढा म्हणा आधी मग बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

जाणतो

आंसमा शख्स
गुरुवार, 10/07/2010 - 07:36 नवीन
रास एस एस चे काम कोणाला माहिती नाही? चुकिचा इतिहास लिहायचा. तो खरा म्हणून खपवायचा. एका मोठ्या शांततावादी समुदायाला शत्रु म्हणून दाखवण्याचे चांगले काम केले ना? त्याच्या इतकी दुफळी माजवायचे काम कुणी केले आहे का भारतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

माझ्या कडून

गुंडोपंत
गुरुवार, 10/07/2010 - 07:41 नवीन
माझ्या कडून हा विषय संपला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

जैसी मर्जी

आंसमा शख्स
गुरुवार, 10/07/2010 - 07:44 नवीन
जैसी मर्जी. खरे बोल आल्यावर त्रास होतो हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

खरे बोल आल्यावर त्रास होतो

मृत्युन्जय
गुरुवार, 10/07/2010 - 14:22 नवीन
खरे बोल आल्यावर त्रास होतो हेच खरे. तुम्ही लक्ष देउ नका हो आसमा तै. भारत हा दहशतवादी देश आहे असे पाकिस्तान नावाचा एक शांतताप्रिय देश म्हणतो तेव्हा त्यांना अश्याच मिरच्या झोंबतात. हे असले दुटप्पी लोक संघात भरपुर भरले आहेत आणि. लहान लहान मुलांना मैदानावर बोलावुन संस्कृती, धर्म, आचरण अश्या गोष्टी शिकवतात हे नालायके संघी लोक. आणी केवढे हिंसक तरी लाठ्यांचा पुरस्कार करतात. सगळे साले एकजात दहशतवादी. आणी तोंड वर करुन सिमीला नावे ठेवतात. आणि संघापेक्षा सिमी खरोखर चांगले. लोक याहुन वेगळा विचार करत असतील तर मुर्ख आहेत देशद्रोही आहेत. संघी साले देशाच्या जीवावर उठले, सार्वभौमत्वावर हल्ल करु पाहत आहेत. सिमीवाले गरीब बिचारे कोलेजिअन्स आहेत. देशासाठी काहितरी करु पाहणारे सळसळणारे रक्त आहि. निरपराध, सोज्ज्वळ, सज्जन, निरागस लोक आहेत ते. संपादक मंडळ उगाच अश्या साध्या सरळ संघटनेवर टीकेची राळ उडवणार्‍या लोकांवर कारवाई करेल अशी आशा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

+१

हंस
गुरुवार, 10/07/2010 - 15:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हा मॅन्युफॅक्चर्ड डिफेक्ट आहे का?

भारतीय
गुरुवार, 10/07/2010 - 11:57 नवीन
मुस्लीम हा शांततावादी समुदाय असू शकतो, पण सिमी नाही.. बाकी मनुष्यावर जसे संस्कार होतात तशीच त्याची मते बनतात हे तुमचे प्रतिसाद पाहिल्यास लक्षात येते.. दोष तुमचा नाही.. बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

एका मोठ्या शांततावादी

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/07/2010 - 13:15 नवीन
एका मोठ्या शांततावादी समुदायाला कोणता समुदाय बरे हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

एका मोठ्या शांततावादी

अनामिका
गुरुवार, 10/07/2010 - 14:25 नवीन
एका मोठ्या शांततावादी समुदायाला शत्रु म्हणून दाखवण्याचे चांगले काम केले ना? या सारखा मोठा विनोद दुसरा असुच शकत नाहि......मिपा धन्य झाली म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

आमच्या तुकाराम महाराजांनी म्हणले आहे...

चिंतामणी
Fri, 10/08/2010 - 00:56 नवीन
नाही मन निर्मळ काय करील साबण. (हे असे सांगायला आमच्या देवाला यायची गरज नाही. ) :x
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

एक वेळ सिमी चालेल पण आरएसएस नको असला पाहिजे

चिंतामणराव
गुरुवार, 10/07/2010 - 12:37 नवीन
आरएसएस ने गेल्या ६० वर्षांत भारतासाठी काय केलं किंवा नाही हा मुद्दा बाजुला ठेवुन तुम्ही सांगा ना कि सिमी ने काय दिवे लावलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

>इस्लामी भारताचा गौरवशाली

सविता
गुरुवार, 10/07/2010 - 13:46 नवीन
>इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

हसुन हसुन ठार झालो...

प्रशु
गुरुवार, 10/07/2010 - 15:45 नवीन
इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास मिपा वर सर्वोत्क्रूष्ट विनाओदाचे पारितोषीक असेल तर देऊन टाका ह्यांना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

हॅ हॅ हॅ

योगी९००
गुरुवार, 10/07/2010 - 16:33 नवीन
आरएसएसला इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही आणि सिमीला किती प्रयत्न केला तरी आजचा भारत बदलता येणार नाही हे सत्य आहे! खुप हसलो..इस्लामी भारत वाचून डोळे पाणावले (हसण्याचा अतिरेक)..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

अटळ संघर्ष !!

अर्धवटराव
गुरुवार, 10/07/2010 - 21:34 नवीन
तुमच्या सारख्या मुस्लीमांचे आणि मिपावरच्या बराचश्या हिंदुंचे अविवेकी विचार ऐकुन/वाचुन खेद वाटतो. हा धार्मीक संघर्ष खरच अटळ आहे का? सध्या तरी परिस्थिती फार आशादायक नाहिये... काँग्रेसने मुस्लीमांना अनेक दशके केवळ वापरुन घेतले... पण अजुन देखील त्यांचा कावा ओळखायला मुस्लीम लोक तयार नाहित. खैर... बघु... (आशावादी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

होय यथा यथा च

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 10/07/2010 - 12:09 नवीन
अहो यदा यदा ही गीतेतील श्लोक झाला. मी कुठे म्हणले आहे की हा गीतेतील श्लोक आहे म्हणून? आणि शेवटी आम्ही एका सुजाण राजकारण्या बद्दल बोलत असताना शुध्द लेखन कडे कसले लक्ष देता?
  • Log in or register to post comments

आंसमा शख्स, आहो बाई की बापू,

हंस
गुरुवार, 10/07/2010 - 12:33 नवीन
आंसमा शख्स, आहो बाई की बापू, आपले अकलेचे तारे तोडू नका. तुम्ही कधी आरएसएस च्या शाखेवर गेला आहात का. जा आणि तासाभराच्या शाखेतच आपल्याला कळून येईल की सिमि आणि आरएसएस मधे काय फरक आहे तो.
  • Log in or register to post comments

सिमि

आंसमा शख्स
Fri, 10/08/2010 - 05:16 नवीन
माझ्या लेखनाने गैरसमज झाला आहे. सिमि ही संघटना वाईट आहेच. मला त्या देशद्रोही लोकांची भलामण करायची नाहीच! जे कुणी माझ्या भारताच्या विरुद्ध ते माझेही दुष्मन आहेत. त्यात टेररिस्ट तर सर्वात वाईट जमात आहे. या जमातीने कोणत्याही कौमचा आव आण्ला तरी ते शेवट वाईटच - कारण ते सामन्य माणसाच्या जीवावर उठले आहेत. मग हा अतिरेकीवाद छुपा किंवा उघड कसाही असला तरी अर्थ तोच असतो. छुपा दहशतवाद कधी तरी गुजरात मध्ये उघड होतो. आणि उघड टेररिस्म सी एसटीवर. कसाबला कसला धर्म आहे? तो फक्त कसाई आहे. त्याने सीएसटीवर जे केले त्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यात सर्व धर्मांचे लोक मरण पावले आहेत. मुस्लीम भारत हा गौरवशाली होताच. नाकारता का? या प्रदेशावर कुणी हमला करायची हिम्मतही करू शकत नव्ह्ता. इतका मोठा प्रदेश एका अंमलाखाली होता, त्याला एक प्रकारची शासन व्यवस्था होती. यामुळे सामान्य लोकांनाच हे हवे होते. जर ही व्यवस्था चालत नसती तर भारत इतका काळ कशाला यात राहता? सगळ्या भारतातून मुघल सल्तनतीला बळ मिळत होते म्हणून तर हे शासन टिकले. जेंव्हा शासक मुजोर झाले रयतेच्या विरुद्ध गेले तेव्हा राज्य संपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

+१

मिसळभोक्ता
Fri, 10/08/2010 - 07:17 नवीन
आंसमा तै/दादा/काका/मौशी (काय जे काही असेल ते) मुस्लीम भारत हा गौरवशाली होताच. नाकारता का? या प्रदेशावर कुणी हमला करायची हिम्मतही करू शकत नव्ह्ता. इतका मोठा प्रदेश एका अंमलाखाली होता, त्याला एक प्रकारची शासन व्यवस्था होती. यामुळे सामान्य लोकांनाच हे हवे होते. जर ही व्यवस्था चालत नसती तर भारत इतका काळ कशाला यात राहता? सगळ्या भारतातून मुघल सल्तनतीला बळ मिळत होते म्हणून तर हे शासन टिकले. आपला वरील परिच्छेद अंमळ चुकीचा आहे. (बरेचसे / काहीसे बरोबर आले तरी.) भारत (किंवा कोणताही देश) नेहमीच गौरवशाली होता/आहे. गौरव करणारे नेहमीच असतात. दुसरे वाक्य चुकीचेच. मुसलमानी अंमलात भारतावर अनेक हमले झाले, आतून आणि बाहेरून. म्हणजेच, हिम्मत अनेकांनी केली, शक्य झाले नाही, हे निराळे. पूर्ण प्रदेश एका अंमलाखाली नव्हता. एका महाराष्ट्रातच ३-४ वेगवेगळे अंमल होते. मुघल सुल्तानीचे बळ मिळाले, पण वेगळ्या कारणासाठी. सरकार हे लोकांपेक्षा वेगळे राहू शकते, हे लोकांना कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

एकटे मुघल शासक समृद्ध

अनामिका
Fri, 10/08/2010 - 13:32 नवीन
एकटे मुघल शासक समृद्ध हिंदुस्थानवर शासन होते तर मग कुतुबशहा,आदिलशहा,निजामशहा हे मोगलांची धुणी धुत होते का आंसमाजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

आम्हि तर नरेन भाई मोदी पंत

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 13:38 नवीन
आम्हि तर नरेन भाई मोदी पंत प्रधान व्हावे म्हणुन देव पाण्यात घालुन बसलो आहोत.
  • Log in or register to post comments

नॉय बा.... सुरेश जी कलमाडी च

सविता
गुरुवार, 10/07/2010 - 13:47 नवीन
नॉय बा.... सुरेश जी कलमाडी च पाहिजेत आम्हाला पंतप्रधान म्हणून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

आम्हाला तर अबु आझमीच हवा

मृत्युन्जय
गुरुवार, 10/07/2010 - 14:30 नवीन
आम्हाला तर अबु आझमीच हवा (आयेशा टकियाचा सासरा). गेला बाजार सैय्यद गिलानी तरी हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

वेगळीच

तिमा
गुरुवार, 10/07/2010 - 18:18 नवीन
संघ आणि अतिरेकी ? आम्ही तर लहानपणापासून एकच घोषवाक्य ऐकून आहोत, 'संघ दक्ष भलतीकडे लक्ष!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा