✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दहर में नक़्शे-वफ़ा -ग़ालीब, गायली आहे स्वरसम्रा्ज्ञी लताबाईंनी

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 10/02/2010 - 19:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3384 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ठार मारले हो.

चिंतामणी
Sat, 10/02/2010 - 19:49 नवीन
जयंत कुलकर्णी- ठार मारले हो तुमच्या खुलासेवार लिखाणानी आणि लताबाईंच्या आवाजात गजल ऐकुन. पुर्वी अनेकदा ऐकली होती. या रेकॉर्डवर अजून काही गजला होत्या. तिची C.D. आवृत्ती नाही मिळाली. डाउनलोडसाठी लिंक देता का?
  • Log in or register to post comments

मिळेल की त्यात काय एवढे ?

जयंत कुलकर्णी
Sat, 10/02/2010 - 20:09 नवीन
मिळेल की त्यात काय एवढे ? कुठलेही १९३८ ते १९६० सालातील गाणे (हिंदी) आपल्याला सापडले नाही तर कळवा. बहुतेक माझ्याकडे मिळेल. इ-मेल द्या. पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

धन्यु.

चिंतामणी
Sat, 10/02/2010 - 20:15 नवीन
व्यनीने इ-मेल आय डि. कळवला आहे. त्या रेकॉर्डवर असलेली एक अजून गजल आठवली. रोने से और इश्क़ में बेबाक हो गये धोये गये हम ऐसे कि बस पाक हो गये
  • Log in or register to post comments

जयंतराव

तिमा
Sat, 10/02/2010 - 20:16 नवीन
साष्टांग दंडवत. इतके कठीण शेर आहेत की तुम्ही समजावले नसते तर डोक्यावरुनच गेलं असतं सगळं! ऐकून पण धन्य झालो. अजून येऊ द्यात!
  • Log in or register to post comments

सलाम....!!!

इन्द्र्राज पवार
Sat, 10/02/2010 - 21:33 नवीन
श्री.जयंत कुलकर्णी यांना सलाम.... तुमचे असे कण न् कण सुंदररितीने वेगळे काढून "डाळिंब" पेशंटला खायाला देणे फार आवडले. मी एरवी ही गझल ऐकली तेव्हा ती समजणे शक्यच नव्हते, पण त्यावेळी आपण 'लता' ऐकतोय हेच फीलिंग मनी असल्याने त्यातील अर्थाला दुय्यम स्थान प्राप्त झाले. पण आता नव्याने ऐकताना त्याची खुमारी लज्जत खुलणार हे नक्की. आज रात्री जाणीवपूर्वक तुम्ही दिलेल्या अर्थासह याचा लुफ्त घेणार....त्याबद्दल अगोदरच आभार मानतो, जयंत जी. जाता जाता > तुम्ही भावार्थ दिला तो पोचला....तसेच कठीण उर्दु शब्दांचे जे अर्थ दिले तेदेखील नोट केले आहेत. तरीही काही शब्द अजूनही डोक्यावरून गेले आहेत, त्याचा अर्थ [मराठी] द्याल का? १. दहर : याचा अर्थ तुम्ही दिला आहे 'काळ' (पण एके ठिकाणी त्याचा अर्थ "आजकाल" असाही वाचला होता....हा अर्थ इथे घेता येईल?) २. तुझ्या गालावर रुळणार्‍या नागासारख्या बटांवर तुझ्या पाचूसारख्या ओठांच्या महिरपीचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. ~~ हे वाचताना जी.ए.कुलकर्णी यांची एक नायिका 'अल्थीया' नजरेसमोर आली....तिचेच हे वर्णन आहे असे वाटले. ('काळ्या बियांतून हिरवी पाने कशी निर्माण होतात? तुझ्या निळ्या डोळ्यांतून सगळ्यांनी प्रिय वाटणारे काळे जहर कसे येते?") ३. वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ. [ 'सितमगर' म्हणजे ? ~~ छऴ करणारा या अर्थाने?] तू ना आमच्याशी कधी बोललीस ना कधी वादा केलास पण ते ठीकच झाले. तुझ्या या नाजूक फुलासारख्या ओठातून काही शब्द आमच्यासाठी उमटले असते तर ते आमच्यावर उपकारच झाले असते. पण तेवढे कुठले आमचे नशीब ? ~~ हे जणू काही 'क्लिओपात्रा' ला उद्देश्यून म्हटले गेले की काय असे वाटते? [एक ठिकाणी या राणीबद्दल वाचले होते ~ "तुझ्या ओठातून येणार्‍या विषावर एकच उपाय आहे.....परत तुझे ओठच !"] लिहिल तेवढे कमीच आहे.....फार आनंद झाला, हे हृदयातून आलेले लिखाण वाचून. इन्द्रा
  • Log in or register to post comments

पवारसाहेब,

जयंत कुलकर्णी
Sun, 10/03/2010 - 08:07 नवीन
नमस्कार ! उर्दू शब्दांचे अर्थ हे मुळ अर्थ आहेत. शायरी मधे हिच गंमत आहे त्याचे manifestation ओळखायला लागते आणि त्यात फार वेळ जातो. शायरने हा शब्द का वापरला असेल, विविध लोकांनी त्याचा लावलेला अर्थ, आपल्या मनात त्या शब्दांच्या अर्थाला अनुसुरून काय विचार येतात, ते आपल्याला पटतात का ? सगळे एकत्र केल्यावर त्यातून काही अर्थबोध होतोय का ? त्यात काही संकेत आहे का ? मागच्या, पुढच्या ओळीत काही संधर्भ्/निर्देश आहेत का ? आणि कितितरी गोष्टी..... परत त्या वेळेची तुमची मनस्थिती..... पण तो एक मस्त अनुभव असतो हे खरं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

गाणं ऐकून जुन्या काळात पोचले

पैसा
Sat, 10/02/2010 - 23:39 नवीन
लहान असताना काळोख्या रात्री घराच्या अंगणात बसून आकाशवाणीवर ऐकलेल्या मदनमोहनच्या गझलांची आठवण जागी झाली. याचा संगीतकार कोण आहे हो?
  • Log in or register to post comments

जुनी गाणी

मीनल
Sun, 10/03/2010 - 05:56 नवीन
जुनी गाणी त्यातून गझल कमीच ऐकली आहेत. त्यातून असले गहन अर्थ न समजण्याजोगे होते. आता त्या शब्दातील अर्थ समजून ऐकलेली चाल छान वाटली.
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव

अन्या दातार
Sun, 10/03/2010 - 16:50 नवीन
कुलकर्णी साहेब! चांगला अनुभव दिलात. आत्तापर्यंत गझल म्हणजे झोप येण्यासाठी उत्तम साधन असे माझे मत होते. पण आज त्याचे रसग्रहण केल्यावर त्याची मजा काही औरच असते याची जाणीव झाली. पुनश्च धन्यवाद........ अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

दहर

विश्नापा
Sun, 10/03/2010 - 20:07 नवीन
माझ्या मते "दहर" या शब्दाचा अर्थ "संसार" हे जग असा आहे. ज्ञानवंतांकडून अधिक खुलाश्याची अपेक्षा!!!
  • Log in or register to post comments

विवेचन आणि गाणं, दोन्हीही

विसोबा खेचर
Sun, 10/03/2010 - 20:13 नवीन
विवेचन आणि गाणं, दोन्हीही सुरेख..! तात्या. -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार !

जयंत कुलकर्णी
Mon, 10/04/2010 - 17:42 नवीन
सर्वांचे आभार !
  • Log in or register to post comments

झकास

विजुभाऊ
Mon, 10/04/2010 - 17:48 नवीन
झकास
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा