जयंत कुलकर्णी- ठार मारले हो तुमच्या खुलासेवार लिखाणानी आणि लताबाईंच्या आवाजात गजल ऐकुन.
पुर्वी अनेकदा ऐकली होती. या रेकॉर्डवर अजून काही गजला होत्या. तिची C.D. आवृत्ती नाही मिळाली.
डाउनलोडसाठी लिंक देता का?
श्री.जयंत कुलकर्णी यांना सलाम....
तुमचे असे कण न् कण सुंदररितीने वेगळे काढून "डाळिंब" पेशंटला खायाला देणे फार आवडले. मी एरवी ही गझल ऐकली तेव्हा ती समजणे शक्यच नव्हते, पण त्यावेळी आपण 'लता' ऐकतोय हेच फीलिंग मनी असल्याने त्यातील अर्थाला दुय्यम स्थान प्राप्त झाले. पण आता नव्याने ऐकताना त्याची खुमारी लज्जत खुलणार हे नक्की. आज रात्री जाणीवपूर्वक तुम्ही दिलेल्या अर्थासह याचा लुफ्त घेणार....त्याबद्दल अगोदरच आभार मानतो, जयंत जी.
जाता जाता > तुम्ही भावार्थ दिला तो पोचला....तसेच कठीण उर्दु शब्दांचे जे अर्थ दिले तेदेखील नोट केले आहेत. तरीही काही शब्द अजूनही डोक्यावरून गेले आहेत, त्याचा अर्थ [मराठी] द्याल का?
१. दहर : याचा अर्थ तुम्ही दिला आहे 'काळ' (पण एके ठिकाणी त्याचा अर्थ "आजकाल" असाही वाचला होता....हा अर्थ इथे घेता येईल?)
२. तुझ्या गालावर रुळणार्या नागासारख्या बटांवर तुझ्या पाचूसारख्या ओठांच्या महिरपीचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. ~~ हे वाचताना जी.ए.कुलकर्णी यांची एक नायिका 'अल्थीया' नजरेसमोर आली....तिचेच हे वर्णन आहे असे वाटले. ('काळ्या बियांतून हिरवी पाने कशी निर्माण होतात? तुझ्या निळ्या डोळ्यांतून सगळ्यांनी प्रिय वाटणारे काळे जहर कसे येते?")
३. वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ. [ 'सितमगर' म्हणजे ? ~~ छऴ करणारा या अर्थाने?]
तू ना आमच्याशी कधी बोललीस ना कधी वादा केलास पण ते ठीकच झाले. तुझ्या या नाजूक फुलासारख्या ओठातून काही शब्द आमच्यासाठी उमटले असते तर ते आमच्यावर उपकारच झाले असते. पण तेवढे कुठले आमचे नशीब ?
~~ हे जणू काही 'क्लिओपात्रा' ला उद्देश्यून म्हटले गेले की काय असे वाटते? [एक ठिकाणी या राणीबद्दल वाचले होते ~ "तुझ्या ओठातून येणार्या विषावर एकच उपाय आहे.....परत तुझे ओठच !"]
लिहिल तेवढे कमीच आहे.....फार आनंद झाला, हे हृदयातून आलेले लिखाण वाचून.
इन्द्रा
नमस्कार !
उर्दू शब्दांचे अर्थ हे मुळ अर्थ आहेत. शायरी मधे हिच गंमत आहे त्याचे manifestation ओळखायला लागते आणि त्यात फार वेळ जातो. शायरने हा शब्द का वापरला असेल, विविध लोकांनी त्याचा लावलेला अर्थ, आपल्या मनात त्या शब्दांच्या अर्थाला अनुसुरून काय विचार येतात, ते आपल्याला पटतात का ? सगळे एकत्र केल्यावर त्यातून काही अर्थबोध होतोय का ? त्यात काही संकेत आहे का ? मागच्या, पुढच्या ओळीत काही संधर्भ्/निर्देश आहेत का ? आणि कितितरी गोष्टी..... परत त्या वेळेची तुमची मनस्थिती.....
पण तो एक मस्त अनुभव असतो हे खरं !
कुलकर्णी साहेब! चांगला अनुभव दिलात. आत्तापर्यंत गझल म्हणजे झोप येण्यासाठी उत्तम साधन असे माझे मत होते. पण आज त्याचे रसग्रहण केल्यावर त्याची मजा काही औरच असते याची जाणीव झाली.
पुनश्च धन्यवाद........
अनिरुद्ध
प्रतिक्रिया
ठार मारले हो.
मिळेल की त्यात काय एवढे ?
धन्यु.
जयंतराव
सलाम....!!!
पवारसाहेब,
गाणं ऐकून जुन्या काळात पोचले
जुनी गाणी
मस्त अनुभव
दहर
विवेचन आणि गाणं, दोन्हीही
सर्वांचे आभार !
झकास