गुपित !
शब्दांचे किती-कसे,
उभे आडवे वळसे..
भाव ओथंबले त्यात,
ओठीं काही येत नसे !
हो, डोळे बोलतात कधी,
भाषा एक साधी-सुधी..
ज्याची त्याला समजावी,
कुणी-कुण्णी नको मधी !
काही हलके इशारे,
उभ्या अंगाला शहारे...
भर उन्हातही जणु,
मनभर गार वारे !
क्षणी असे हरवणॆ,
आणि पुन्हा गवसणॆ...
तुझी-माझी लपाछपी,
सार्या गावाचे बहाणे !!
छान
जुदिआ अर्थात जुने दिवस आठवले!
तिसरं कडवं मस्त जमलंय.
अप्रतिम! हो, डोळे बोलतात