Skip to main content

पहावे अंतर्यामी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव भक्ताचा भुकेला वारकरी मेला वारीतच विश्वात्मक ऐसे इथे काही नाही तुच तुला पाही आत मध्ये तुझ्या अस्तित्वाचा एकच पुरावा मी पणा पहावा अंतर्यामी अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी सांडे अहंकार वासना विकार जेव्हा निर्विकार पाहसी तू...!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1642
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी हे मस्तच !

ईश्वर शोधण्या निघालो... मी पण पायात जखडलो अंतर्यामी निरखलो भाबडा मी....!!!! पाहण्या रूप ईश्वराचे... कण-कणात मातीचे.... येथे हवेत जातीचे.... आम्ही नाही.....!!!! आम्ही बोलावे काही आमची ऐपतच नाही अशीच सेवा व्हावी.... मराठीची.....!!! अप्रतिम .....!!!!!

आवडला. पंचमची प्रतिक्रिया पण आव्डली.