पहावे अंतर्यामी
कोण म्हणे देव
भक्ताचा भुकेला
वारकरी मेला
वारीतच
विश्वात्मक ऐसे
इथे काही नाही
तुच तुला पाही
आत मध्ये
तुझ्या अस्तित्वाचा
एकच पुरावा
मी पणा पहावा
अंतर्यामी
अंतर्यामी घ्यावा
शोध ज्याचा त्याने
विचार स्पंदने
निरिक्षावी
सांडे अहंकार
वासना विकार
जेव्हा निर्विकार
पाहसी तू...!!
मस्त
छान आहे
आवडले!
वाह!! विश्वात्मक ऐसे इथे काही
ईश्वर शोधण्या निघालो... मी पण
अभंग
पंचमदा, आपण ग्रेट आहात ....!
गोखले, पंचम -