✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी मास्तरकी !

ज
जिप्सी यांनी
गुरुवार, 09/16/2010 - 20:21  ·  लेख
लेख
पुण्यातली बुधवार पेठ 'अनेक गोष्टींसाठी' प्रसिद्ध(!) आहे.याच वस्तीतल्या लोकांशी माझा अगदी जवळचा सबंध आलेला आहे त्याविषयी थोडंसं.... २००६ सालची गोष्ट्,पुण्यातल्या माझ्या एका ओळखीतल्या एका गृहस्थांनी 'मामाचं गाव' असा एक उपक्रम राबवला होता. कुणासाठी? तर ज्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जायसाठी मामाचं गावच नाही अशां मुलांसाठी. ही मुलं कोण? तर बुधवार पेठेतल्या वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रियांची! ही मुलं ८ दिवस रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आमच्याकडं येत. त्यांना रमवण्यासाठी आम्ही रोज वेगवेगळे खेळ्,चित्रकला,मातीकाम इ. गोष्टी करायचो.त्यातच एके दिवशी ज्या संस्थेतर्फे ही मुलं आमच्याकडं येत त्यासंस्थेच्या ताई आमच्याकडं आल्या,त्यांच्याशी गप्पा मारताना या मुलांबद्दलच्या अनेक गोष्टी कळत गेल्या. या मुलांच्या आयांचा वेश्याव्यवसाय हाच मुख्य पेशा होता. त्यांबद्दल बोलताना ताई म्हणाल्या,"अरे ज्या खाटेवर यांच्या आया गिर्‍हाईकांबरोबर असतात्,त्याच्याच खाली यातली लहान मुलं झोपलेली असतात." माझ्या अंगावर सर्रकन काटा आला,एवढं उघडं वाघडं सत्य माझ्या मुर्दाड मनालासुद्धा पचलं नाही. अशा अनेक गोष्टींतून्,मुलांच्या सहवासातून त्यांच 'जिणं' माझ्यासमोर उलगडत गेलं. शेवटच्या दिवशी मी ताईंना विचारलं,"ताई , मी तुम्हाला काय मदत करू? (आर्थिक सोडून ! त्यावेळी माझाच पडता आणि बेकारीचा काळ सुरू होता.) ताई म्हणाल्या तुला काय जमेल द्यायला? मी म्हणालो सध्या फक्त वेळ ! मग जरा चर्चा करून मी ८वी-१०वीच्या मुलांना सकाळच्या वेळेत शिकवावं असं ठरलं.(८वी-१०वीची मुलं बाहेरच्या शाळेत जात्,संस्थेची शाळा १ली - ७ वी पर्यंतच) आजकालच्या मुलांना पहीली दुसरी पासूनच ट्युशन लावतात्,पण यातल्या १०वीच्या मुलांनासुद्धा ते परवडायचं नाही. मग त्यांच्या शाळेआधी त्यांना गणित्,ईंग्लिश्,सायन्स(जवळ्पास सगळेच विषय थोडेफार) शिकवायची जबाबदारी मी घेतली. शाळा सुरू झाल्यावर मंडईतल्या एका केळांच्या भट्टीच्या मागच्या बाजूला असलेल्या शाळेत आमचे सकाळचे वर्ग सुरू झाले.या मुलांच्यात शिकायची प्रचंड तळमळ होती. शिकवता शिकवता त्यांच्याशी माझी मैत्रीच होउन गेली. सकाळी ०८.३० ते ११ पर्यंत आमचे वर्ग चालायचे,आम्ही सगळेच बरोब्बर साडेआठाला हजर व्हायचो. कधीतरी एखादा/एखादी वेळानं यायचे,वेळ का झाला? म्हणून विचारलं तर रात्री २वा.,३वा झोपलो असं उत्तर मिळायचं.(कारणं ही वाढलेली मुलं आईच काम पूर्ण झाल्याशिवाय घरात झोपायलाच यायची नाहीत) स़काळचा क्लास ११.०० वा संपला की ही मुलं शाळेला जायला निघायची. त्यांना डबा वगैरे चैनी माहीतच नव्हती,घरातनचं ५-१० रु. मिळायचे.(१ली - ७वीच्या मुलांना मात्र शाळेत जेवण मिळायचं) आणि रात्रीच जेवण म्हणजे आम्लेट्,बुर्जीपाव इ. एका शनिवारी या मुलांच्या पालकांच्या(!) भेटीचा कार्यक्रम होता,मलाही बोलावलं होतं. तेंव्हा या मुलांच्या आयांना भेटायचा भेटायचा योग आला. अगदी साध्या साड्यात,किंचीत सुजलेल्या डोळ्यांच्या,अशा त्या सभेला आलेल्या होत्या. माझं फारसं काही काम नव्हतं,पण तरीही सगळ्या माझ्याशी २-२ शब्द बोलल्या,मीपण बोललो. थोडे दिवसांनी श्रावणात आमच्या वर्गातल्या मनोजच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती,सगळ्यांना आमंत्रण होतं,बाकी सगळे सकाळी जाणार होते,पण मला जमणार नव्हतं,मी संध्याकाळी यायचं कबूल केलं. संध्याकाळी ७च्या सुमाराला मला न्यायला शाळेपाशी मनोज्,बंडु,शंकर्,दीपक असं मित्रमंडळ हजर होतं. मंडई ओलांडून,बुधवार पेठेतल्या अरूंद आणि गर्दीनं भरलेल्या रस्त्यानं आम्ही निघालो. रस्त्यात आम्लेट्,वडापाव इ.च्या गाड्या ,पानपट्ट्या,बाजूला दारूचं दुकानं अशा एका मोडक्या चाळीसारख्या इमारतीच्या पायर्‍या चढून आम्ही दुसर्‍या मजल्यावर गेलो. जिन्यातच पायर्‍यांवर उभारलेल्या गिर्‍हाईकांशी,आपसात गप्पा मारणार्‍यांना चुकवत, मनोजच्या खोलीच्या दाराशी पोचलो. बाहेरच्या गॅलरीत अनेकजणी मेकप करून्,गुटखा पान चघळत उभ्या होत्या. खोलीच्या आतलं वातावरणं मात्र पूर्ण वेगळं होतं.एकच खोली पण अगदी लख्खं. एका कोपर्‍यात पूर्व पश्चिम बघून पूजा मांडलेली. एका कोपर्‍यात स्टोव्ह. एका कोपर्‍यात छोटी न्हाणी त्याला पडद्याचा आडोसा. एक कॉट व त्यावर बैठक. मी गेलो,बसलो. मनोजची आई हसतमुखानं समोर आली,विचारपूस केली. मी उठून दर्शन घेतलं,तिर्थप्रसाद घेतला. स्टोव्हवरच्या उकळत्या मसाले दुधाचं एक भांड्भरून माझ्यासमोर आलं. बाहेर खिडकीतनं,गॅलरीतनं अनेक डोळे कुतुहलानं आमच्यावर खिळलेले. मी दुध पिताना मनोजच्या आईनं त्याच्या अभ्यासाविषयी चौकशी केली,बाकीच्या मुलांच्या आयासुद्धा आल्या.मनोजच्या आईच्या 'मावशीबाई' सुद्धा येउन गेल्या. मग मुलांच्या अभ्यासाबरोबरचं माझीसुद्धा चौकशी झाली. घरी कोण कोण ? असे प्रश्न झाले. त्यांच्या बोलण्यातून मला 'आपल्या जगाविषयी' असलेली त्यांची उत्सुकता जाणवत होती. तासभर गप्पा झाल्यावर मी जायला निघालो,मनोजच्या आई मला डोक टेकवून पाया पडल्या,पाठोपाठ मुलंही. मला अगदी बावरून गेल्यासारख्म झालं,मग एका वारकर्‍यानं दुसर्‍या वारकर्‍याच्या पाया पडावं तस मीही त्यांना नमस्कार केला.तो नमस्कार मी त्यांच्या मनाच्या पावित्र्याला होता. जाता त्यांनी मला ५१ रु. दिले,म्हणाल्या पुढच्या वेळेला कोल्हापूरला जाल तेंव्हा अंबाबाईची ओटी भरा ! आता मी सुद्धा माझ्या व्यापात अडकलो,घर बदललं तस शिकवायला जाणंही सुटलं. पण अजूनही रस्त्यात कॉलेजला जाणारी ही मुलं भेटतात्,एखाद्या राणीचा,पुनमचा कॉईन बॉक्सवरून फोन येतो,२-५ रुपये खर्च करून त्या माझ्याशी बोलतात.यांच्या हसर्‍या चेहेर्‍यामागं अनेक कथा आणि व्यथा दडलेल्या असतात्,त्यांच्याविषयी परत कधीतरी !
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9080 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

नाही पचवू शकणार हे हलाहल ..

गणेशा
Mon, 09/20/2010 - 13:38 नवीन
नाही पचवू शकणार हे हलाहल .. पण आपला समाज या लोकांनाच दोषी धरतो .. काही असतात अश्याच पण काही चांगल्या ही भरडल्या जातात .. १ उदाहरण .. अश्या एका नरकातुन एखाद्याच मुलीला बाहेर काढले जाते .. पण कोठे तर पुन्हा नविन लांबच्या नरकात... हे ऐकलेले आहे. आणि काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात .. उदा सत्य आहे .. माझ्या मित्रांना दारुचा शॉक आहे. त्यांच्या आग्रहाने २-३ दा लेडीज सर्वीस बार ला जाण्याचा योग आला होता. काय असते ? .. कसे असते .. ? या बद्दल उत्सुकता होती .. पण गेल्यावर काहीच पित नाही म्हंटल्यावर मित्राने माझयसाठी थम्स उप मागितले १०० रुपयाला १. आणि मग शेजारी १० च्या नोटांच बंडल ... मग काय एकेक अप्सरा येत होती नाचत तेथे . बरेच होते उडवणारे. कोणॅए बोलावले तर बाजुला बसत होत्या .. माझ्या मित्राने बळेच एकी जणी ला माझ्याशेजारी बसवले .. तर मीच थरथर कापत होतो पहिल्यांदा .. यांचे वाईट वाटुन घ्यावे की किव करावी तेच कळाना .. शेवटी तीच दारु क्यो नही पेता बे ? लु क्या इसको असे बोलायला लागल्यावर मी नाव विचारले मुलगी : पम्मी किती वर्षापासुन आहे : दोन . पहिले कल्याण के इधर थी बाद मे अभी इदर , घर किदर है : मध्यप्रदेश. क्यों ये धंदा करती हो : पैसे के लिये .. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी .. --- बरेच से संवाद येथे दिले नाहित .. पण असे कळाले की .. शेट्टी ( मालकाचे नाव) चा हा बार आहे. बरेच हप्ते जातात येथुन .. आणि ह्या असल्या मुली स्वताहुन येतात तेथे .. काही वर्श राहतात आणि जातात घरी. मुले वेटर पण होती ( म्हण्जे ते दलाल होते या मुलींचे ) त्यांनी हि माहीती दिली .. त्यांच्या कडे १०० ची नोट दिली कि सगळे सांगाय्चे .. कीती पैसा मिळतो कोणाचा कीती .. अआणि कोण कसे आहे ते . येथे बार मालक १०० ची बाटली ३०० ला विकतो .. आणि कमवतो खुप .. आणि मुली ३-४ वर्ष स्वताहुन येवून स्वताला विकुन लाखो रुपये न्हेतात नंतर विशेष म्हनजे मराठी पण मुली होत्या.. तेंव्हा पासुन अश्या लोकांचा मी विचार करण्याचे बंद केले होते. तुमचा लेख वाचुन पुन्हा वाईट वाटले .. कधी काळी तुम्ही म्हणता तश्या लोकांवर कविता केलय होत्या .. पण फक्त कविता .. मधल्या गोष्टींमुळे आपण आपले भले या स्व - स्वार्थ विचारात होतो .. आणि सामाजिक सुधारणा वगैरे जमेल तेव्हडे वेगळी कडे करण्याचा प्रयत्न करत होतो परोपकार म्हनजे कसा हे तुमच्याकडुन या लेखा द्वारे कळाला .. बाकी प्रस्न अन्नुतरीत राहतात हे खरे आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी

नाही पचवू शकणार हे हलाहल !!!!

जिप्सी
Mon, 09/20/2010 - 19:30 नवीन
काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ---- मला स्वतःला अशा कमीत कमी ८-१० जणी माहीत आहेत्,ज्यांना सोडवले गेले पण घरच्यांनी परत त्यांना स्विकारले नाही,मग काय कराव त्यांनी? काही जणी एखाद्याच्या प्रेमाखातर घर सोडून पळून येतात्,आणि तो तिला इथं आणून विकतो,मग जरी त्यांना सोडवलं तरी त्यानी जायचं कुठ?तुम्ही,मी देउ शकतो अशांना आसरा? मग त्या परत येतात. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी :- हे फक्त स्वप्नरंजन असतं त्यांच. कारण अनेक जणी इथं पैसे कमवून घरी पाठवत असतात. भावाचं/बहीणीचं लग्न होतं यांच्या पैशावर पण याना घरी बोलवतही नाहीत.मग यांचही मन मुर्दाड होतं आणि मग कशाचचं काही वाटेनासं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

नाही पचवू शकणार हे हलाहल ..

गणेशा
Mon, 09/20/2010 - 14:08 नवीन
नाही पचवू शकणार हे हलाहल .. पण आपला समाज या लोकांनाच दोषी धरतो .. काही असतात अश्याच पण काही चांगल्या ही भरडल्या जातात .. १ उदाहरण .. अश्या एका नरकातुन एखाद्याच मुलीला बाहेर काढले जाते .. पण कोठे तर पुन्हा नविन लांबच्या नरकात... हे ऐकलेले आहे. आणि काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात .. उदा सत्य आहे .. माझ्या मित्रांना दारुचा शॉक आहे. त्यांच्या आग्रहाने २-३ दा लेडीज सर्वीस बार ला जाण्याचा योग आला होता. काय असते ? .. कसे असते .. ? या बद्दल उत्सुकता होती .. पण गेल्यावर काहीच पित नाही म्हंटल्यावर मित्राने माझयसाठी थम्स उप मागितले १०० रुपयाला १. आणि मग शेजारी १० च्या नोटांच बंडल ... मग काय एकेक अप्सरा येत होती नाचत तेथे . बरेच होते उडवणारे. कोणॅए बोलावले तर बाजुला बसत होत्या .. माझ्या मित्राने बळेच एकी जणी ला माझ्याशेजारी बसवले .. तर मीच थरथर कापत होतो पहिल्यांदा .. यांचे वाईट वाटुन घ्यावे की किव करावी तेच कळाना .. शेवटी तीच दारु क्यो नही पेता बे ? लु क्या इसको असे बोलायला लागल्यावर मी नाव विचारले मुलगी : पम्मी किती वर्षापासुन आहे : दोन . पहिले कल्याण के इधर थी बाद मे अभी इदर , घर किदर है : मध्यप्रदेश. क्यों ये धंदा करती हो : पैसे के लिये .. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी .. --- बरेच से संवाद येथे दिले नाहित .. पण असे कळाले की .. शेट्टी ( मालकाचे नाव) चा हा बार आहे. बरेच हप्ते जातात येथुन .. आणि ह्या असल्या मुली स्वताहुन येतात तेथे .. काही वर्श राहतात आणि जातात घरी. मुले वेटर पण होती ( म्हण्जे ते दलाल होते या मुलींचे ) त्यांनी हि माहीती दिली .. त्यांच्या कडे १०० ची नोट दिली कि सगळे सांगाय्चे .. कीती पैसा मिळतो कोणाचा कीती .. अआणि कोण कसे आहे ते . येथे बार मालक १०० ची बाटली ३०० ला विकतो .. आणि कमवतो खुप .. आणि मुली ३-४ वर्ष स्वताहुन येवून स्वताला विकुन लाखो रुपये न्हेतात नंतर विशेष म्हनजे मराठी पण मुली होत्या.. तेंव्हा पासुन अश्या लोकांचा मी विचार करण्याचे बंद केले होते. तुमचा लेख वाचुन पुन्हा वाईट वाटले .. कधी काळी तुम्ही म्हणता तश्या लोकांवर कविता केलय होत्या .. पण फक्त कविता .. मधल्या गोष्टींमुळे आपण आपले भले या स्व - स्वार्थ विचारात होतो .. आणि सामाजिक सुधारणा वगैरे जमेल तेव्हडे वेगळी कडे करण्याचा प्रयत्न करत होतो परोपकार म्हनजे कसा हे तुमच्याकडुन या लेखा द्वारे कळाला .. बाकी प्रस्न अन्नुतरीत राहतात हे खरे आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी

:-)

सहज
Mon, 09/20/2010 - 14:57 नवीन
अश्या स्व:ताहून आलेल्या "भामट्यांचे" प्रमाण वाढल्यास चांगल्या फसवुन आणण्याचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा! स्वेच्छेने ह्या धंद्यात आलेल्या व्यक्तिंनी ह्या व्यवसायात नैतीकता आणावी असे वाटते. हा लेख जरुर वाचावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लेख आवडला... आपल्या पुढील

मदनबाण
Sat, 09/18/2010 - 10:14 नवीन
लेख आवडला... आपल्या पुढील लेखाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

नि:शब्द

सूड
Mon, 09/20/2010 - 20:00 नवीन
नि:शब्द
  • Log in or register to post comments

जिप्सी, तुमचे कौतूक वाटले !

शाहरुख
Mon, 09/20/2010 - 21:06 नवीन
जिप्सी, तुमचे कौतूक वाटले !
  • Log in or register to post comments

दु:खी करणारे लेखन!

संजय अभ्यंकर
Mon, 09/20/2010 - 22:00 नवीन
जिप्सींना दंडवत!
  • Log in or register to post comments

जबरदस्त !! सलाम !!!

अवलिया
Tue, 09/21/2010 - 14:07 नवीन
जबरदस्त !! सलाम !!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा