Skip to main content

चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/09/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला
सिच्युएशनः गल्लीत सार्वजनीक मंडळाचा गणपती बसतोय. दोन हिरो अन दोन हिरवीनी आहेत. म्युझीक सुरू..... (सुचना: एक ओळ हिरो नं एक म्हणेल अन दुसरी ओळ हिरो नं २ म्हणेल असाही बदल करता येवु शकतो)
दोघे हिरो: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||धृ|| हिरो नं १: गणपतीची मुर्ती आणूया आज हिरो नं १: कशी आणायाची ठरवा लगेच हिरो नं २: अष्टविनायक आणूया की राजा लालबागचा? हिरो नं २: बालगणेश आणूया की श्रीमंत दगडूशेटचा? दोघे हिरो: घाई करा घाई करा, लगेच निघु चला कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||१|| हिरो नं १: ढोल ताशे बडवा तुम्ही रे जोरात हिरो नं १: डिजे आणूनी लावा मोठ्या आवाजात हिरो नं २: झाडून सारे सगळे नाचा चला रे हिरो नं २: गणेशाच्या उत्सवात सहभागी व्हा रे दोघे हिरो: उगा फिकीर उन्हापावसाची करता कशाला कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||२|| हिरवीन नं १: साजिरी सुंदर गणेशाची मुर्ती हिरवीन नं १: पुजनाने त्याच्या भक्तां येई स्पुर्ती हिरवीन नं २: मनामध्ये साठवूया भावभक्तीने त्याला हिरवीन नं २: आरती करा आता निरांजन ओवाळा दोघी: नमस्कार करा सारे, प्रसादाला हात पुढे करा कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १०/०९/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1359
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया