एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?
प्रथमच मिपावर काही लिहु धजत आहे. गेले काही दिवस येथे वाचन करत आहे, प्रतिक्रिया बघत आहे..यावर माझी प्रतिक्रिया अशी की आपण आपले वाचक म्हणूनच रहावे. कशाला उगीच काही पोस्ट करण्याचा आटापिटा? पण आज मनाचा हिय्या करुन माझी पहिली कविता आपणांसमोर ठेवत आहे. तिचे पोस्टमार्टम होवु शकते याची पूर्ण कल्पना आहे. ते झाले तरी कवितेचा "आत्मा" माझ्यापुरता तरी मी सांभाळून ठेवेनच! बाकी मिपावरची दर्दी मंडळी जे काही पदरात टाकतील ते गोडच असेल असा माझ्यापुरता समज मी करुन घेत आहे, किंवा ते गोड'च' मानून घेण्याची मनाची तयारी पण करत आहे.
कवितेला नावे नाहीत कारण पूर्ण कवितेची भावना अशी एका/काही शब्दात कशी बांधायची याबद्दल मनात बराच संभ्रम आहे. त्यामुळे माझी कविता ही जो जो जशी वाचेल तशी त्यालाच अर्पण...
कुठला ना बंध
ना कुठला दुवा...
वाऱ्यावरती झुंजत झुंजत
लढत चाललो खुळा !
रुजण्याचे भाग्य ना मजला,
ना जगण्याचे भान,
आठवणींचे हिंदोळे अन
साठवणींचे गान !
ना एक ठिकाणा माझा,
ना वसण्याचे वरदान -
मी न कुणाचा जिवलग
ना माझी कोणी जान !
आज इथे तर उद्या तिथे,
भरकटण्याचा शाप मला....
तरी वाऱ्याशी झुंजत झुंजत,
लढत चाललो खुळा,
मी पाचोळा, मी पाचोळा !!!
अथांग, लिहीत रहा हो. तुमच्या
स्वागत
छान कविता.. वाचताना मला "मी
धन्यवाद..
छान आहे कविता , आवडली.
तुमची कविता खुप आवडली. पण
शुभेच्चा!!!!!!!!!!!
शुभेच्छा
छान कविता.
मस्तच