Skip to main content

एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?

लेखक अथांग यांनी गुरुवार, 09/09/2010 05:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच मिपावर काही लिहु धजत आहे. गेले काही दिवस येथे वाचन करत आहे, प्रतिक्रिया बघत आहे..यावर माझी प्रतिक्रिया अशी की आपण आपले वाचक म्हणूनच रहावे. कशाला उगीच काही पोस्ट करण्याचा आटापिटा? पण आज मनाचा हिय्या करुन माझी पहिली कविता आपणांसमोर ठेवत आहे. तिचे पोस्टमार्टम होवु शकते याची पूर्ण कल्पना आहे. ते झाले तरी कवितेचा "आत्मा" माझ्यापुरता तरी मी सांभाळून ठेवेनच! बाकी मिपावरची दर्दी मंडळी जे काही पदरात टाकतील ते गोडच असेल असा माझ्यापुरता समज मी करुन घेत आहे, किंवा ते गोड'च' मानून घेण्याची मनाची तयारी पण करत आहे. कवितेला नावे नाहीत कारण पूर्ण कवितेची भावना अशी एका/काही शब्दात कशी बांधायची याबद्दल मनात बराच संभ्रम आहे. त्यामुळे माझी कविता ही जो जो जशी वाचेल तशी त्यालाच अर्पण... कुठला ना बंध ना कुठला दुवा... वाऱ्यावरती झुंजत झुंजत लढत चाललो खुळा ! रुजण्याचे भाग्य ना मजला, ना जगण्याचे भान, आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान ! ना एक ठिकाणा माझा, ना वसण्याचे वरदान - मी न कुणाचा जिवलग ना माझी कोणी जान ! आज इथे तर उद्या तिथे, भरकटण्याचा शाप मला.... तरी वाऱ्याशी झुंजत झुंजत, लढत चाललो खुळा, मी पाचोळा, मी पाचोळा !!!
लेखनविषय:

वाचने 3338
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मंडळी, वेळात वेळ काढून प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल मनापासून आभार! आता (कीबोर्ड-रुपी) लेखणी उचलली आहेच, तर माघार नाही. काही ना काही खरडत राहू. आपल्या सबळ पाठिंब्याच्या कृपेने आता भीड पण चेपत आहे. मस्त कलन्दर : संदीप खरेंच्या "मोर्चा" ची आठवण झाली म्हणता...भरुन पावलो !!! धन्यवाद!

तुमची कविता खुप आवडली. पण कवितेच्या भाषेवरुन लक्शात येतेय की भाषा एकदम परिपक्व आहे. बरेच लिखान केले असणार !! लिहित रहा. खुप शुभेच्छा !!!!

पोस्ट मार्टेम करणारे असतील तसे कौतुक करणारे पण भेटतील. छान लिहिलं आहे. आणि शेवटी आपण काय लिहिलं आहे हे प्रत्येकालाच माहिती असतं. सो, डोण्ट वरी!

रुजण्याचे भाग्य ना मजला, ना जगण्याचे भान, आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान ! वरील ओळी आवडल्याच पण, ’आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान’ लै भारी. अजून येऊ दे...! -दिलीप बिरुटे

कविता आवडली. लिहित रहा.