भयंकर षडयंत्र
डिस्क्लेमर : सदर कथा काल्पनिक असून त्याचे कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा.
*** वेळेअभावी संक्षिप्त स्वरुपात हे कथानक लिहितो आहे. ***
भयंकर षडयंत्र
उपोद्घातः
फेब्रुवारी १९९८
अफगणिस्थानातील तोराबोरा या दुर्गम इलाख्यातील एक प्रशस्त गुहा
आपल्या पॉश सोफ्यावर राजेशाही थाटात पाय पसरुन तो बसला होता. सोनी टीव्ही च्या आलिशान पडद्यावर तो अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्याक्षांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध कसे करते हे तो पहात होता. गेली कित्येक वर्षे तो हे करत होता. आपल्या कट्टर शत्रू देशाविरुद्ध तो करत असलेल्या कारवायांना अजून त्याने तितकेसे कठोर रुप दिलेले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणत होते - ".... अमेरिकेची जगात असलेली अफाट ताकद कोणीही बदलू शकत नाही. अमेरिका विश्वाचे नेतृत्त्व करत आहे आणि यापुढेही करत राहीन...."
येथपर्यंत ठीक होते. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढचे वाक्य चुकूनही बोलायला नको होते असे त्याला वाटू लागले.
"संपूर्ण जगात अमेरिका आणि ख्रिश्चन धर्माला मानणारेच फक्त या जगात नेतृत्त्व करु शकतील...आणि अमेरिकेच्या शक्तीला कोणीही या जगात आव्हान देऊ शकणार नाही एवढे अमेरिकेचे सामर्थ्य आहे याचा मी सर्व अमेरिकन जनतेला विश्वास देतो"
या वाक्याबरोबरच व्हाईट हाऊस समोर उपस्थित लाखो अमेरिकन नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडात अध्यक्षांना अनुमोदन दिले.
हे वाक्य ऐकताच तो खूप उत्तेजित झाला. रागाने त्याने टीव्ही सेट बंद करुन रिमोट कंट्रोल सोफ्यावर फेकून दिले आणि त्याच्या आलिशान खोलीत अस्वस्थ पण निश्चयी मनाने फिरायला सुरुवात केली.
+ + +
रागीट असला तरी तसा तो खूप बुद्धीमान होता. त्याला हिब्रू, अरबी, उर्दू, फारसी यांबरोबरच स्पॅनिश आणि इंग्रजी अस्खलितपणे बोलता येत होते. लंच आणि डिनरच्या वेळी पाळायचे पाश्चात्य शिष्टाचार त्याला पूर्णपणे अवगत होते. तो स्वतः जेवताना काटे चमचे यांचा सर्रास वापर करायचा. पण तरीही तो इस्लामचा कट्टर समर्थक होता. जग हे विज्ञानाच्या मागे धावता धावता विनाशाच्या खाईकडे चालले आहे हे त्याला उघड उघड दिसत होते. तेवढा बुद्धीमान तो नक्कीच होता. आणि विनाशाच्या या अनियंत्रित वेगाला जबाबदार कोणी असेल तर अमेरिका असे त्याचे ठाम मत होते. त्याचे वाचनही अफाट होते. बायबल, कुराण यांबरोबरच गीता, वेद आणि उपनिषदे यांचे सखोल वाचन केलेले होते. त्यामुळेच ज्या काळात इस्लामची निर्मिती झाली होती, तशीच गरज आज इस्लाम चा जगभर प्रसार करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. यासाठीच त्याने इस्लामी जिहाद चा आवाज दिला होता. त्याच्या आवाहनाला अशिक्षित, शिक्षित, अर्धशिक्षित आणि त्यांच्यातीलच मूठभर हिंसक व अत्याचारी लोकांमुळे जगभर तिरस्कार सहन करणार्या हजारो इस्लामी बांधवांनी मदतीचा ओघ सुरु केला होता. एवढ्या जबरदस्त प्रतिसादाने त्याचे मनोबल खूपच उंचावले होते.
+ + +
अचानक त्याचा चिंताग्रस्त चेहरा हसरा झाला आणि समाधानाने त्याने एक चुटकी वाजवली. त्याने अमेरिकेला जगासमोर नागवे करायची योजना ठरवली होती. स्वतःशीच तो बोलू लागला:
"आता अमेरिकेला असा धडा शिकवतो की जगात सगळीकडे अमेरिकेचा उपहास होईल आणि अमेरिकेचे जगाच्या नेतृत्त्वाचे स्वप्न सर्व देश हेटाळणीच्या स्वरुपात पाहू लागतील."
त्याने उत्तेजित स्वरात आवाज दिला -
"कासिम... माझ्या हवाई बेटांवर राहणार्या कुरेशी चाचांना फोन लाव. त्यांना निरोप दे की मी २ दिवसांनी त्यांना हॉटेल पॅरेडाइजमधे भेटेन. येताना केनियाच्या थोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या सर हुसेन यांनाही बरोबर
घेऊन यायला सांग. माझी भेट ते नाकारणार नाहीत.... आणि महमूद कुरेशी या नावाने माझ्या प्रवासाची व्यवस्था कर"
+ + +
एक महिन्यांनंतरः
नुकतेच त्याने हॉटेल पॅरेडाईज सोडले होते. एक प्रवाशी अनेक दिवस येथे मजेसाठी आला होता आणि मौजमजा करुन गेला यापेक्षा हॉटेल पॅरेडाईजला त्याची किंमत नव्हती. विमानतळावर जाताना कॅबमध्ये तो मधूनच स्वतःशीच हसत होता. खूप समाधानी होता तो. त्याच्या डोळ्यांपुढे मागच्या एक महिन्यांतील घटनाक्रम तरळू लागले. कुरेशी चाचांनी ओळख करुन दिलेल्या सर हुसेन यांचे अर्थशास्त्रातील ज्ञान पाहून तो थक्क झाला होता. तशी त्याला कल्पना होती त्यांच्याबद्दल. पण एखाद्या देशाची अर्थव्यवस्थादेखील बदलवून टाकण्याचे सामर्थ्य असण्याइतपत सखोल ज्ञान सर हुसेन आहे याबद्दल त्याला अचंबा वाटत होता. खरेतर आपल्या बुद्धीमत्तेने त्याने सर हुसेन यांना पहिल्याच दिवशी जिंकले होते. पण त्याची निर्दोष योजना सर हुसेन कट्टर इस्लामी असूनही त्यांच्या गळी उतरत नव्हती. यात खूप म्हणजे खूपच धोका होता. अमेरिकेच्या मर्मस्थानावर प्रहार करण्यात प्रचंड धोका होता. मनोमन त्यांनी त्याला खूप मानले होते. शेवटी सलग दहा दिवस त्याने मेहनत घेऊन त्यांना सविस्तरपणे भविष्यकाळाचा पट उतरवून दाखवला होता. त्याच्या योजनेत कुठेही चूक नव्हती. आपल्या धर्मबांधवांच्या नजरेत सन्मानाचे स्थान त्यांना यामुळे मिळणार होते. त्याची योजना पूर्णपणे समजून घेताच त्यांनी दहाव्या दिवशी त्याला होकार दिला होता. नंतरचे पंधरा दिवस दोन अतिशय बुद्धीमान मेंदू ती योजना यशस्वी करण्यासाठी त्यांतील दोष काढून टाकण्यासाठी झिजत होते. यासाठी आखातात तेलसाठ्यांमुळे अब्जावधी डॉलर्स कमावलेले कित्येक शेख त्याला मदत करणार होते.
+ + +
दोन वर्षांनंतर:
ऑगस्ट २००० ची एक संध्याकाळ :
नुकतेच अमेरिकेच्या वॉशिंग्टनवरुन एक विमान न्यूयॉर्क कडे उडाले होते. हे विमान न्यूयॉर्कजवळ येताच उमर खान या तरुणाला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन विलोभनीय टॉवरचे दर्शन घडले. अमेरिकेच्या सत्ता आणि ताकदीचे दर्शन करण्याची संधी अमेरिका सहसा कधी सोडत नाही त्यामुळेच विमान उतरण्यापूर्वी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूती देणार्या वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या दोन इमारतींचे अनोखे दर्शन प्रवाशांना घडेल व ते अमेरिकेच्या भव्य दिव्य साम्राज्याने अचंभित होतील हा हेतू बाळगूनच विमान उतरण्याच्या मार्गाची आखणी करण्यात आली होती. उमर खान ने विमानतळावर उतरुन आपली बॅग ताब्यात घेतली.
बाहेर पडताच त्याने फोन केला -
"सलाम वालेकुम कासिमचाचा"
"वालेकुम अस्सलाम उमर...कोई परेशानी?" पलिकडून आवाज आला.
"बिल्कुल नही"
"सब खैरियत?"
"खैरियत"
"अल्ला की मेहेरबानी...अपने मुकाम पर पहुंच जाओ"
"जी चाचा... खुदा हाफिज"
"खुदा हाफिज"
ठरल्याप्रमाणे उमर न्यूयॉर्कमधील ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याला खात्री होती की अमेरिकेच्या लॉस एंजेलिस, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को, नेवाडा, अशा विविध तळांवरुन न्यूयॉर्क कडे येणार्या प्रत्येक विमानातील आपल्या साथीदारांनी काम केले असेल. काम सोपे होते असे त्याला वाटत होते. एक विशेश वस्तू बॅगेतून न्यायची आणि ती सिक्युरिटी चेक मधून पार पडते की नाही हे पहायचे होते. आणि दुसरे म्हणजे न्यूयॉर्क जवळच्या हवाई मार्गाची पाहणी करुन सारा तपशील कासिमचाचांकडे जमा करायचा होता. इस्लामची सेवा करण्याकरिता त्याने आपल्याला निवडले याकरिता उमर त्याचे व अल्लाचे आभार मानत होता. पुढचे काही दिवस हेच रुटीन होते त्यांचे पण उमर आणि त्याच्या २९ साथीदारांनी आत्तापर्यंत एकदम चोख काम केले होते.
+ + +
घटनाक्रमाची सुरुवात:
- ११ सप्टेंबर २००१ - अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर दोन प्रवाशी विमाने धडकली
- ऑक्टोबर २००१ - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला गति देणारे हे दोन टॉवर्स कोसळल्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला.
- २००७ - जगभरातील अर्थशास्त्री सावध करु लागले.
- २००८ - वॉल स्ट्रीटच्या रुपाने अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली.
- २००८ - बाकी जगाच्या अर्थव्यवस्थादेखील ताणल्या गेल्या.
- २००८ - सर्व जगभरातील शेअर बाजार कोसळले. अगणित संपत्तीचे नुकसान झाले.
+ + +
- थोडेसे मागे -
सन २००५
ईलिनॉस या अमेरिकेतील एका दुर्लक्षित परगण्यातून बराक ओबामा या एका सिनेटरची निवड झाली. बोलण्याचे चातुर्य ओबामांमध्ये उपजतच होते. पण परिस्थितीचे आकलन करण्याची तीव्र बुद्धीमत्तादेखील त्यांच्याकडे होती. मुख्य म्हणजे ते अमेरिकन नागरिकांना कष्ट करण्यासाठी प्रेरित करत होते. भारत व चीन वर तंत्रज्ञानाच्या ऑटसोर्सिंग च्या धोरणावर कडकपणे टीका करत होते. सर्वसामान्यांमध्ये बेरोजगारी होण्याचे हे एक मुख्य कारण ते मानत होते. बेरोजगारी वाढणार्या अमेरिकेत ओबामांना मोठा पाठिंबा मिळून ते सिनेटर म्हणून निवडून आले.
नोव्हेंबर २००८
व्हाईट हाऊसच्या प्रांगणात लाखो लोकांच्या उपस्थितीत बराक ओबामा अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत होते. करोडो लोकांची मने त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणार्या वाणीने जिंकली होती. अमेरिकेची जनता ओबामांकडे मोठ्या आशेने पहात होती.
ओबामा अमेरिकेत रोजगार निर्माण करण्याबद्दल ते बोलत होते.
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणार्या अल-कायदा ला नेस्तनाबूत करण्याबद्दल ते बोलत होते. अफगणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याबद्दल ते बोलत होते.
भारत आणि चीन यांच्यावर अवलंबून न राहण्याच्या गोष्टी करत होते.
अमेरिकेत राहणार्या सर्व धर्मियांना ते समान वागणूक देण्याबददल ते बोलत होते.
अल-कायदाविरोधातील अभियानात पाकीस्तानने केकेल्या मदतीबद्दल ते बोलत होते.
नासाच्या प्रगतीबद्दल ते बोलत होते.
अमेरिकन नागरिकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष पुरवावे याबद्दल बोलत होते.
अमेरिकन अस्मितेबद्दल बोलत होते
अमेरिकन मुलांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल बोलत होते
अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत करण्याबद्दल ते बोलत होते
नवनिर्वाचित अध्यक्षांचे भाषण संपताच टाळ्यांच्या कडकडाटात लाखो अमेरिकन नागरिकांनी ओबामांना मानवंदना दिली. आता अमेरिकेवरचे अरिष्ट संपणार या उमेदीने सर्व अमेरिकन नागरिक आनंदात घरी परतले.
+ + +
दोन वर्षांनी:
सन २०१०
अमेरिकन नागरिकांत बराक ओबामांबद्दल रोष वाढू लागला. अमेरिकन अर्थव्यवस्था मूळपदावर आलेली नव्हती. लादेन अजून पकडला गेला नव्हता. अल-कायदाचे पारिपत्य झालेले नव्हते. रोजगार म्हणावे तसे निर्माण झाले नव्हते. शिक्षणरचनेत काहिच बदल झालेला नव्हता. नासाच्या अनुदानात कपात करण्यात आली होती.
पेंटॅगॉनच्या जमिनीखालील एका गुप्त खोलीत एक वरिष्ठ अधिकारी "जॉन सेजविक" त्याच्या संगणकावर काम करता करता एकदम उठून उभा राहिला.
"माय गॉड... जीझस..."
गेली २ वर्षे तो करत असलेल्या मेहनतीला यश आले होते. व्हाईट हाऊसमधून कोणीतरी खूप मोठा खेळ खेळत असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. अमेरिकेच्या सर्व नितींची माहिती बाहेर फुटत होती. कोणीतरी कित्येक वर्षे मुद्दम हे करत होते. आणि जॉन सेजविक अशा निष्कर्षाप्रत पोहोचला होता की अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळण्यामागे व्हाईट हाऊसमधीलच कोणीतरी जबाबदार आहे. नवीन अध्यक्ष बराक ओबामांना अर्थव्यवस्था सुधारण्यात अपयश येणं याचे कारण त्यांची नीती आधीच शत्रूला कळत होती आणि त्याप्रमाणे शत्रू आपली चाल खेळून ती निती फोल ठरवत होता.
कोणावर विश्वास ठेवावा हे त्याला कळत नव्हते. त्याने ताबडतोब पँटेगनचे चीफ रॉबर्ट हावर्ड यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना दिली. त्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य समजले. तत्काळ हॉटलाईनवर फोन करुन हावर्ड यांनी बराक ओबामांना याची कल्पना दिली.
"प्रेसिडेंट .. व्हॉट कॅन आय डू नाऊ?"
"...." पलिकडे सुन्न शांतता होती.
"प्रेसिडेंट???..."
"रॉबर्ट... अजून कोणाला या प्रकाराची कल्पना आहे?"
"नाही सर..."
"ठीक आहे... सगळे पुरावे घेऊन तू मला ताबडतोब भेट. आणि हो... त्या हुशार अधिकार्याचे नाव काय म्हणालास?
" जॉन सेजविक...."
"त्यालाही सोबत घेऊन या. आणि येताना सावधगिरी बाळगा."
+ + +
एक तासानंतरः
अध्यक्षांनी सेजविक व हावर्ड यांना बसण्याकरिता निर्देश केला. अध्यक्षांच्या या साऊंड प्रूफ खोलीत अत्यंत गुप्त अशाच भेटी होत असत. पहाटे तीन वाजता अशी भेट प्रेसिडेंटची घ्यावी लागली याबद्दल दोघांच्या चेहर्यावर खिन्नता दिसत होती.
"हं तर काय काय पुरावे मिळाले आहेत? " प्रेसिडेंटनी जॉनकडे पाहून प्रश्न केला...
"सर... व्हाईट हाऊसचे मूळ आदेश जे सिनेट मधे पास झालेले आहेत ते अंमलबजावणी करताना बदलले जात आहेत" सर्व मंजूरी पत्रकांतील ४० टक्के पैसा एका विशिष्ट खात्याकडे वळविला जात आहे. याचे मूळ शोधले सर मी. स्विस बँकेत जाणारा हा पैसा नंतर उझबेकीस्तान, तुर्कमेनिस्तान, सौदी अरेबिया, अफगणीस्तान, पाकीस्तान, बांगला देश, इराण, इराक या सर्व विविध देशांमध्ये ट्रान्सफर होतो आहे."
"तुझा काय अंदाज आहे?"
"सर... व्हाईट हाऊसमधील कोणीतरी उच्च पदस्थच असे करु शकते...म्हणून तुमच्याकडे आलो."
"चांगले केलेत"
अचानक ओबामा उठले व फोनवरुन विलीला(त्यांच्या अंगरक्षकाला) तयारीनिशी आत यायला सांगितले.
हॉर्वर्डला कळाले नाही.-" मिस्टर प्रेसिडेंट विलीला आत्ता कशाला बोलावलेत?...अजून आपले संभाषण पूर्ण झालेले नाहिये"
"हो मला माहिती आहे."
तेवढ्यात विली आत आला.
"विली तुला कल्पना आहे ना काय करायचे याची?
"होय सर" असे म्हणून विली एकदम वळाला आणि रॉबर्ट हावर्ड व जॉन सेजविक यांच्यावर गोळ्या झाडल्या.
एका क्षणात ते मृत पावले.
"या सर्व मूर्ख अमेरिकन लोकांमध्ये हे दोघे थोडे हुशार निघाले" ओबामा आनंदाने उद्गारले. उमर या दोघांच्या बॉडीची विल्हेवाट एका अपघाताने लाव. त्या जॉन सेजविकच्याच खोलीत स्फोट करुन टाक. चुकून एखादा पुरावा राहिला असेल तर नंतर अडचण नको..."
उमरला गदगदून आले. खाली झुकून त्याने ओबामांचा हात धरला. आणि कित्येक वेळा चुंबुन म्हणाला -
"आप इस्लाम का सहारा हो... मै अल्ला का मेहेरबान हूं के मुझे आपकी सेवा करने का मौका मिल रहा है"
हात सोडवून घेऊन ओबामा म्हणाले-
अमेरिकेने स्वप्नातही असा विचार केला नसेन की ज्या 'ओसामा बिन लादेन' चा शोध आपण तोरा-बोरा च्या दुर्गम भागांत घेत आहोत तोच 'ओसामा बिन लादेन' अमेरिकेवर बराक हुसेन ओबामा या रुपाने राज्य करत आहे ..." असे म्हणून तो हसू लागला.
उमरच्या डोळ्यांसमोर मात्र सगळा घटनाक्रम लगेच समोर आला. मुल्ला उमर सगळ्या घटनांची अंमलबजावणी करणारा होता तरी त्यामागे जो मेंदू होता तो लादेनचा होता.
- १९ जिहादी शहिदांनी आपले काम चोख बजावून वर्ल्ड ट्रेड सेंटर धराशायी करुन अमेरिकेत दशत निर्माण केली होती.
- सर हुसेन ओबामांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सापळ्यात अडकवून अर्थव्यवस्था कोसळवली होती
- सर हुसेन ओबामांच्या मुलाच्या जीन्स चे लादेनने रोपण करुन घेतले होते. त्यामुळे २ वर्षांत त्याचे शरीरही तरुण झाले होते. बराक हुसेन ओबामा हेच नाव घेऊन सर बराक हुसेन ओबामा यांच्या मुलाच्या रुपाने अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश केला होता. अचानक २००५ मध्ये सिनेटर झालेला हा बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा झाला या कोड्यात कोणी पडलेच नाही कारण अमेरिकन जनतेची मानसिकता लादेननी पुरेपुर ओळखली होती.
- मुल्ला उमरनेही जीन्स थेरेपीने स्वतःचा कायापालट करुन घेऊन विल्यम ब्राऊन उर्फ विली या रुपाने ओसामाचा अंगरक्षक झाला होता.
- गेल्या दोन वर्षांत अब्जावधी डॉलर्स अमेरिकेतून इस्लामी शक्ती मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या देशांत ट्रान्सफर केले गेले होते.
- इस्लाम आता अधिक मजबूत होणार होता ते ही अमेरिकेच्याच पैशाने....
उमर भानावर आला व आपल्या शिल्लक असलेल्या कामाकडे वळाला.
+ + +
ताजा घटनाक्रमः
२००९ - अल कायदा विरोधी अभियानासाठी मदत करणार्या पाकीस्तानला बराक ओबामांनी अब्जावधी डॉलर्सची आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम मंजूर केली
२०१० - अफगणिस्तानातील अमेरिकन सैन्याच्या परतीची प्रक्रिया सुरु केली
२०१० - अमेरिकेने इराकमधील सैन्य पूर्णपणे काढून घेतले
२०१० - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागी मस्जिदीचे निर्माण व त्याला बराक ओबामांचे सर्वधर्मसमभावाच्या नावाने समर्थन
२०१० - पेंटॅगॉनचे प्रमुख व सिनियर ऑफिसर चा पँटॅगन मधील एका विचित्र अपघातात मृत्यू...
*** समाप्त ***
संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Barack_Obama
http://en.wikipedia.org/wiki/Barack_Obama,_Sr.
http://en.wikipedia.org/wiki/Osama_bin_Laden
प्रतिक्रिया
मस्त हॉलीवुड कल्पना.....
+१
केवळ माहीतीकरता...
अरेच्चा!
Simply Unbelievable
मस्त
कथा आवडली...
दशावतार आठवला
काय पण डोकं लढवलय ...
अतिशय मनोरंजक कथा पण काल्पनिक
काही हरकत नाही
ओसामा बना ओबामा... कसे वाटतेय
मस्त नाव
भयंकर षडयंत्र
माझीच कथा मला संपादित करता येत नाही