मी नितिन थत्ते.
पूर्वी काही काळ खराटा या नावाने लिहित असे.
स्वतः खूप काही लिहीत नाही. (दुसर्याने लिहिलेल्यावर कॉमेण्ट मारणे सोपेच असते).
घटना, अर्थशास्त्र, स्त्रीपुरुषसमानता आणि पुरुषमुक्ती, रॅशनलिझम, राजकारण हे जिव्हाळ्याचे विषय.
माझ्याबद्दल थोडेसे,
मी अमोल मेंढे, मुळचा वर्ध्याचा...सध्या राजस्थानात राहतो. मिपा वर बर्याच दिवसांपासुन येतो..पण सदस्यत्व आता आताच मिळाले.
आवडी म्हणाल तर...वाचायला, गायला ,रचायला आणि नाचायला आवडते. जालावर बर्याच दिवसांपासुन असल्यामुळे खुप मित्र आहेत.
आणखी काय सांगु? ( माझी बायको मला माझ्यापेक्षा जास्त ओळखते.)
मी पुण्याचा . नावात काय आहे. त्यामुळे सांगत नाही. मृत्युन्जय माझे नाव नाही हे तर ओघाने आलेच.
नवीन सदस्य म्हणावा तर आयडी तयार करुन २ वर्षे झाली. आणि जुना म्हणावा तर फारसे काही लिहिलेले नाही. मि पा वरचा सक्रीय वावर सध्याचाच. एवढ्यात इथ खुप "छान" चर्चा चालु आहेत त्यामुळे जरा जास्तच सक्रीय आहे. एरवी आधी फारसे लिहीले नव्हते (म्हणजे मी खुप छान लिहितो तरीही लिहिले नव्हते असे नाही तर वाचण्यासारखे काही आपल्याला लिहिता येते असे वाटतच नसल्यामुळे लिहिले नव्हते. नुकत्याच पेव फुटलेल्या अनेक लेखकांचे लेख बघुन आपणही याहुन वाईट लिहित नाही याची खात्री पटल्यामुळे काही लेख लिहिले आहेत खरे. ) वाचायचो मात्र खुप. मित्राने मिसळपाव वरुन रामदासांचा काटेकोरांटीची फुले स्कॅन करुन पाठवला तेव्हापासुन मि पा चा फॅन झालो. आणि शिंपिणीचे घरटे वाचुन रामदासकाकांच्या लेखणीच्या प्रेमात पडलो.
इथे उत्तमोत्तम लेख वाचायला आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे त्याचे रसग्रहण करणार्या प्रतिक्रिया वाचायला जाम आवडते. इथे मुख्यत्वेकरुन तेच करायचो पुर्वी. अजुनही तेच करतो. पुढेही तेच करत राहीन (नाही म्हणता कुजकटपणा अजुन थोडा वाढला तर कदचित प्रतिक्रिया पण देइन.)
आवडते लेखक अर्थात रामदास काका.
बर झाले! हा धागा सुरु झाला
(गट:- नवीन सदस्य!!!!!!)
माझ नाव:- मला हर्षद म्हणू शकता ....
काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतोय पण मुळं मात्र सातारा, सांगली आणी कोल्हापुरची .......
छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) भटकंती करायला आवडत).....
सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!...
बिपिन कार्यकर्ते
रोचक
विशाल व इतर मंडळींचा प्रचंड फंखा. त्यांच लेखन वाचुनच इथ्ले सभासदत्व घेण्यासाठी धड्पड केली आणी काही अंशी यशस्वी झाली. झालच तर बिकाषेठच्या कंपुमध्ये जागा बळकावि म्हणतो.
माहिती माझी....
व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ...... मी.
भावनिक जगाच्या हिंदोळ्यात डोलणारा..........................मी
नको तितकं खरं नाही त्या ठिकाणी बोलून पस्तावणारा ..........मी
तिला पाहुन खुदकन हसणारा आणि आपलं हसु दाबणाराही....हो ..मी च.
मी गर्दित उभा असतो गर्दितला एक बनून
पण त्या धामधुमीत्,त्या गर्दीतही बघत असतो बाहेरच्या गोबर्या गुलाबावरचा
टप्पोरा थेंब तल्लीन होउन
मी असतो अफाट काम करणारा...
तथाकथित "थॅंकलेस्" जॉब करणारा....
पण ते केल्यावर लोकांचं समाधान पाहुन भरुन पावणारा.
माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची....
माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची.
थोडासा बावळट्,किंचित भोळ्सट दिसत असेनही.
वागायला मात्र थोडासा खट्याळ बराचसा नाठाळ असेनही.
पण तु नसताना तुझ्याच आठवणीत रमलेला मी असेनही....
सगळ्या दोस्तांत एकमेव मी....
भरल्या गर्दित एकटाच मी.......
माझा मलाच पुरत नाही मी!
जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी
दोस्तांनो, ह्या सफळ्यातला कुठला तरी "मी" तुम्हीही असणारच.
का ह्याहुन वेगळे, आपल्या सप्तरंगात स्वच्छंद तरी तुम्ही असणारच.
इथं लिहिलय तस्साच आहे मी...
तुम्हीही सांगा कसे,कोण आहात तुम्ही?
अजुन डीट्टेल माहिती हवी असेल तर बोला, मी लिहायला मोकळाच आहे.(मिपा च्या ब्यांडविड्थ चं तेव्हढं माहित नाही. त्यांना हे झेपल की नाही.)
माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची....
माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची.
माझा मलाच पुरत नाही मी!
जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी
मी अदिती; आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त आहे असं प्रत्यक्षात भेटलेले लोकं मला सांगतात. ३_१४ आकडा मी पायपंथी, इरॅशनल, असल्यामुळे तिथून उचलला. तसंही माझी तीनतेराशी असलेली जुनी जवळीक ३_१४ मधूनही दिसतेच (असं मीच म्हणते).
माझ्याबद्दल खास काही सांगण्यासारखं नाही, अर्थात आपली आपण काय स्तुती करायची! पण सदर धागाप्रवर्तक चोता दोन, आपलं छोटा डॉन, आमचे रा.को. असल्यामुळे धाग्यावर लिहीलं.
"आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त"
मला ही "अदिती" कधीही विक्षिप्त वाटलेली नाही, त्यामुळे या विशेषणाचा (तसेच त्या ३_१४ चा) कधीच विचार केलेला नाही.
इन्द्रा
कशी शाळा-कॉलेजमधल्या, गेलाबाजार हापिसातल्या पहिल्या दिवसाची आठवण आली. हजारो आयडी असलेल्या अश्या संकेतस्थळावर अश्या ओळखी होणं खरच उपयोगी असतं याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. मी जेव्हा परक्या शहरात खुप अडचणीत होतो तेव्हा इथंच ओळख झालेले संपादक निखिल यांनी मला किती मदत केली ते माझं मला माहिती. या धाग्यामुळं सदस्यांमधे सामंजस्य्-सौहार्दाचं मनमोकळं वातावरण निर्मा होईल अन नवनविन मित्रांची ओळख होईल ही अपेक्षा.
असो!
आता माझ्याबद्दल थोडंस. माझं नाव प्रसन्नकुमार केसकर. मुक्काम पुणे. व्यवसाय पत्रकार. सध्या पुण्यातल्या एका इंग्रजी दैनिकात काम करतो आहे.
नमस्कार
मी माया ज्ञानेश.
लातूर-औरंगाबाद-पुणे -सध्या बेल्जियम मध्ये राहाते.
स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे. पण सध्या रिकामटेकडी.
माणसं-पुस्तकं, खाणं-खाऊ घालणं, सैपाकघरात अनेक प्रयोग करणं, आणि सर्वात आवडीचं -भटकायला आवडतं.
अशीच जालावर भटकत भटकत इथे आले, अनेक समानधर्मी दिसले म्हणून थांबले.. :)
कोण निळुभौ? ;-)
बाकी आपली काय वळक द्यायची राव?
सुतासारखा सरळ मानुस, सुशील, सोज्वळ समंजस (वग्रै वग्रै) गरजेपुरता सैपाक येतो, अगदी साध्या आवडीनिवडी, कसला सोस नाय की काय नाय, अहो एकदम कॉमन मॅनच म्हणा ना.
(डान्या, जमलंय का?)
ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही. ती "निळाई" इटलीची. सुर्याला आव्हान देणा वेश घालणार्या तरुणी. आठवलं का ? या निमित्ताने पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय.
"आज माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की तुझ्या निळाईचा अर्थ सांगणार्या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे."
"पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय."
हे बरोबर आहे आणि पु.लं.नी तसा "निळाई"चा उल्लेख केलेला हेही वाचले आहेच. पण आम्ही मायाताईंना उद्देशून जे लिहिले आहे त्याचा संबंध त्यांनी केलेल्या "ग्रीस" सफरीचा सविस्तर वृत्तांत इथे कलादालनात अनेक सुंदर फोटोसह दिला होता, तीमध्ये अगदी "इटली" सारख्याच एका निळाईचा समावेश होता. नवीन सदस्यांना (जे अनेक आहेत) कदाचित कलादालनची पाने उपलब्ध नसावीत - 'प्रवेश प्रतिबंधीत' असा इशारा येत असल्याची संपादकांकडे त्यांनी तक्रारही केली आहे - म्हणून पुनश्च फोटोंचा तो खजिना नव्याने द्यावा यासाठीचा तो प्रतिसाद होता.
इंद्रराज, माझ्या नावामुळे काही सदस्यांचा घोटाळा होतो आहे. म्हणून आजपासून मी ' माया ज्ञानेश ' च्या ऐवजी ' मितान ' या नावाने मिपावर असेन. :)
ग्रीस ची निळाई मी दुसर्या एका संस्थळावर लिहिली होती. इथे नाही. इथेही टाकण्याच्या विचारात आहे.
मी विजुभाऊ
रहायला विले पार्ले. सध्या मात्र पुण्यात
वाचायला आवडते. द मा मिरासदार , शंकर पाटील , पु ल ,सु शि , व पु, जी ए , नेमाडे , श्री ना ,मार्क ट्वेन , अंतोन चेकॉव्ह , हॅन्स अॅन्डरसन्स , डॅन ब्राऊन , सिडने शेल्डॉन , पाउलो कोएलो , इलियाहु गोल्डराट , सोफोक्लीस आर्थर कोनन डॉयल हे आवडते लेखक.
आय ड्रीम ऑफ अ जीनी , डेनीस द मिनेस , थ्री स्टुजेस , हम पांच या आवडत्या सिरीज.
थोडे फार लिखाण करतो , फार पूर्वी कधितरी नाटक करायचो.
पगार देणारे काम : ई आर पी कन्सल्टिंग , प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट इ.
लष्करच्या भाकर्या : स्ट्रेस मॅनेजमेन्ट , मेमरी रीटेन्शन, पर्सनल काउन्सेलिंग वगैरे.
खाण्याची आवडः: उंधियो , पिठलं भाकरी ,पापलेट,सुरमयी , सोलकढी
सर्वात आवडते काम : चकाट्या पिटणे, गप्पा मारायला सौंगडी गोळा करणे, टीममधल्या स्वभावाने सिर्यस लोकाना कामाला जुंपणे वगैरे वगैरे.
टिंग्या अगोदर छोटी टिंगी नाव लावायचा. कोण्या एकाने मझ्यशी मयत्री कर्नार क? हे हे हे कल्जी घेने"
असे विचारल्यानन्तर टिंग्या घब्रला. आणि तो एकदम छोटी टिंगीचा ब्रिटिश झाला.
बाय द वे टिंग्या माझा दुशली ब मद्ला मित्ल हाये
मी अर्चना,
तशी मी मिपावर वाचक म्हनून जुनीच आहे, परंतु ID आताच मिळाल्याने नवीन.
मी IT wife :) आहे, आणि स्वयंपाकही छान येतो. वाचनाची फार आवड असल्याने जालावर सहज मिपाची माहिती मिळाली आणि आता दिवसातून किमान १० वेळा तरि मिपा बघितल्याशिवाय दिवस जात नाही. लिहायचा कंटाळा कारण मराठी टायपिंग ची सवय कमी. पण आता आय डि मिळाल्याने मराठी लिहायची सवय वाढवेन.
ऑफिसच्या कामातून वेळ मिळाल्यास चित्रकला, पाककला, शिवणकाम, बागकाम, आणि इ अशा खूप काही कला....
सध्या वास्तव्य : मुंबई
तुम्हा सगळ्या नव्या, जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना राम राम...!!!
जास्त काही लिहीत नाही परंतु एकच सांगावेसे वाट्ते की हॅट्स ऑफ टू ऑल यू पीपल हू आर पुटिंग देअर हार्ड अँड सोल एफर्टस इन किपींन मिपा ऑन टॉप.
एवढे बोलून मी माझे ४ (??) शब्द संपवते.
नमस्कार !! मी अण्णु !!
तोच हो आपला ... अण्णु गोगट्या ... कोकणातला :)
मिपावर तसा बर्याच दिवसापासुन आहे... पाहुणा म्हणुन. त्यामुळे सर्व लोक ओळखीचे आहेतच.
गेल्या आठवड्यात तात्यांची कृपा झाल्यने आत्ता तुमच्या समोर येऊ शकलो.
पुण्यात एका I.T. कंपनीमध्ये आहे ... सध्या मिपावर पडीक
असेच चांगलेचांगले लेख वाचायला मिळतील ही अपेक्षा .... :)
हलो!
लेखाव्यतिरिक्त कुणाशीही बोलण्याची ही पहिलीच वेळ.
खोट आवडत नसल्याने माझ नाव ही खरच ,'अपर्णा' अन 'अक्षय' माझे धनी.
मुळची कोल्हापुरची पण लग्नानंतर फिरस्ती! हल्ली मुक्काम "सिंगापोर".
पोरकेपण म्हणजे काय हे माहित असल्यान सर्वांशी जमेल तेव्हढ चांगल वागायचा प्रयत्न करते मी. पण जर कुणी फारच आडव्यात गेल तर थोडाबहुत लवंगी मिरचीचा ठसका देते मी.
लिहिण हा जन्मजात वारसा किंबहुणा लिखाण हे एकच मन मोकळ करायच ठिकाण. चेष्टा मस्करी, खदखदुन हसण्याची अतिशय आवड.
स्त्री वा पुरुष पेक्षा 'माणुस' ही संकल्पना भावते मला. दुसर्याच चांगले गुण अगदी त्याच्या वाइट वागण्यातुनही ओळखण्याची क्षमता बाळगते मी. स्वतः साठी च नाही पण दुसर्या साठी सुद्धा उभारहायची ताकद बाळगते मी, त्या मुळे बघाव तेंव्हा कुठे तरी जगाच ओझ घेउन फिरते अस 'धनी' म्हणतात.
नानासाहेब!!! हा धागा सर्वांची ओळख व्हावी, हलकी फुलकी दंगामस्ती व्हावी जेणेकरून ओळख वाढावी इत्यादी उद्देशाने काढला आहे. इथे माफक दंगा केला तर चालेल असेही धाग्याच्या प्रवर्तकाने लिहिले आहे. म्हणून चालू आहे. असो.
- (सदस्य)
प्रतिक्रिया
नमस्कार बिका
नमस्कार! नमस्कार!! स्वागत
फोटोसकट ओळख देताय का?
नाही हो
तो कोपर्यात डोक्यावर हात
हा
मी नितिन थत्ते. पूर्वी काही
ते नाडीचं राह्यलं का वो?
हा हा हा. र्हायलं ब्बॉ. पण
------
माझ्याबद्दल थोडेसे
मी पुण्याचा . नावात काय आहे.
आमची ओळख
धन्यवाद आणि येल्कम रे
मी शरयू.. मिपाची नियमित
ही घ्या
तुमचं खरं नाव नानू सरंजामे
तुमचं खरं नाव नानू सरंजामे
मी अदिती; आयडीतल्या
विशेषण
स्तुत्य उपक्रम....
खोटं.. खोटं... अरे सल्ला'गार'
अजुन नाही रे.....
नमस्कार मी माया ज्ञानेश.
निळाई
ग्रीस ची निळाई ती!
सॉरीईईईई....!!!
एक शंका येऊ रहायली कवाधरून...
कोण निळुभौ? बाकी आपली काय
ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही.
निळाई
इंद्रराज, माझ्या नावामुळे
आजपासून मी मितान !
धन्यवाद आणि येल्कम रे बाब्या!!!
मी विजुभाऊ रहायला विले
मी
अश्लील, अश्लील, अश्लील!
कोण?
लिहीलं असतं, पण नको.
!!!
ठॉऑऑऑऑ =)) =))
ठ्ठॉ !
"अश्लील अश्लील" टिंग्या
काय पन दाद आहे
टिंग्या अगोदर छोटी टिंगी नाव
नमस्कार मंडळी!
नमस्कार !! मी अण्णु !!
हलो! लेखाव्यतिरिक्त कुणाशीही
या धाग्यावर अनेक अनावश्यक
नानासाहेब!!! हा धागा सर्वांची