✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छ
छोटा डॉन यांनी
Tue, 08/10/2010 - 14:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55069 वाचन

💬 प्रतिसाद (304)

प्रतिक्रिया

नमस्कार, मी अवलिया , मिपा

अवलिया
Tue, 08/10/2010 - 15:05 नवीन
नमस्कार, मी अवलिया , मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र. मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक. मी घरात राहतो. आवडी : अनेक आहेत, फिरणे सर्वात मोठा छंद आहे. संगीत आवडते, गाणी आवडतात. प्यायला- खायला आवडते ;) लेखन करतो काही विषयामध्ये स्पेशेलिस्ट आहे :) माझे लेखन वाचले की तुम्हाला कळेलच !!
  • Log in or register to post comments

माझी ओळख ...

छोटा डॉन
Tue, 08/10/2010 - 16:56 नवीन
माझी ओळख काहीशी अवलियासारखीच आहे ... झालच तर अवलिया माझा मित्र आहे ( असे त्याला सारखे वाटते, असो ) आणि हितचिंतकही आहे.
मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र.
+१, हेच म्हणतो.
मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक.
हे महाशय कोण आहेत ह्याची मला खरोखर कल्पना नाही, बहुतेक एखादा हलकट छुपा आयडी असावा, असो. असो, तर आता माझी ओळख. मी छोटा डॉन, माझे खरे नाव अ‍ॅक्च्युअली छोटा डॉन नाही पण माझे टोपणनाव 'डॉन' आहे. मिपावर आल्यावर त्याचे डान्राव, डॉन्या, डॉनराव, डॉनबा असे नाना अवतार आले. माझे खरे नावही थोडे हुडकले तर नक्कीच सापडेल ;) शिक्षण पुण्यातच घडुन गेले ( झाले आणि घडुन गेले ह्यात जमिनाअस्मानाचा फरक आहे, असो ). सध्या पोटापाण्यासाठी काही कमवावे म्हणुन काहीबाही नोकरी वगैरे करत असतो, नोकरी काय लै भारी नाही पण उगाच फारिनर्सना थुका लावायला मजा येते. थोडक्यात सांगायचे तर 'Engine Design' असे आमच्या जॉबचे वर्णन करता येईल. आवडी-निवडी आणि छंद काय फारसे वेगळे आणि विक्षिप्त नाहीत. " ऊगाच बोंबलत हिंडणे , तासनतास आंतरजालावर कालापव्याय करणे [ यात वाचन , लेखन व अनेक नसत्या ऊचापती यांचा समवेष होतो .] , ठार मेल्यासारखे झोपणे ,तासनतास कुठल्याही 'अर्थहीन विषयावर ' गप्पा ठोकणे , 'चेंडू झोडपण्याचे' सगळे खेळ खेळणे, मनोसोक्त हादडणे त्यात बल्लवगिरीची हौस , 'सगळ्या प्रकारचे सिनेमे' अतिशय आत्मीयतेने पहाणे , कसलेही गाणे लावून ते तन्मयतेने ऐकणे व कधितरी आपल्या सारख्या ४ मित्रांना गोळा करून "बैठक बसवणे " यासारखे आमचे काही छंद आहेत .... आजकाल आम्हाला त्यातल्या त्यात "फुटबॉल ( पहायला व त्यावर अफाट लिहायला व बोलायला ) " हा खेळ खुप आवडतो. कधीमधी माफक लिखाण वगैरे करत असतो पण ते काही खास नोंद घेण्यासारखे नाही. बाकी मित्र जमवायची आवड आहे ( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). हे झाले माझ्याबद्दल, ही माझी थोडक्यात ओळख. आता सांगतो माझ्याबद्दलच्या काही अफवा ( ज्या तुम्ही कित्येकवेळा वाचल्या असतील किंवा भविष्यातली वाचताल ) : १. मी म्हणे काही लोकांना 'लेख लिहतो रे' असे वायदा करतो व तो पुर्ण करत नाही. म्हणुन लोक आम्हाला 'वायदेआझम' म्हणतात. १००% खोटे आहे हे, इच्छुकांनी आमचा ब्लॉग पहावा ( जाहिरात नको म्हणुन लिंक देत नाही ). २. मी उगाच लोकांचे प्रतिसाद, लेख आणि अजुन बरेच काही उडवतो म्हणे, शुद्ध लोणकढी थाप आहे ही. ३. इथे बरेच लोक मी त्यांचा 'मित्र' असल्याचा दावा करतात. ह्यावर मी केवळ "हास्यास्पद" इतकेच मत देऊ इच्छितो. बाकी सविस्तर सवडीने, तुर्तास एवढेच ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

( आणि जमलेल्या मित्रांना

विजुभाऊ
Tue, 08/10/2010 - 17:01 नवीन
( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). वायदे आझम ही पदवी फक्त डॉन्यालाच खर्‍या अर्थाने शोभून दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

एक निरीक्षण (आणि एक अनुमान)!

असुर
Tue, 08/10/2010 - 17:04 नवीन
एक निरीक्षण (आणि एक अनुमान)! धागा डान्रावांनी काढला आणि नानासाहेबांचा प्रतिसाद पहिल्या नंबरला, म्हणजे या धाग्यावर किमान १५० प्रतिसाद येणार येणार येणार!!! चकास! (ह. घ्या!) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

१५० झाले की राव!!!

असुर
Wed, 08/11/2010 - 00:54 नवीन
धत्तर तत्तर, धिन्च्यान तिच्यान... नाच्चो तिच्यायला! १५० झाले की राव!!! येका डावात, येका दिसात १५० मारले की या ध्याग्यानं... अन अजून चालू हाये!!! २००-३०० मारतंय जनू! चकास!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

कोण मी??? असा प्रश्न मला बरेच

निखिल देशपांडे
Tue, 08/10/2010 - 19:46 नवीन
कोण मी??? असा प्रश्न मला बरेच वेळा पडतो... आणि या प्रश्नाचे उत्तर आजवर तरी मला उमगलेले नाहिए.... आमचे नाव निखिल देशपांडे हे माझ्या आयडी मधुन तुम्हाला लक्षात आलेच असावे. आमचा पोटापाण्याचा धंदा म्हणालं तर बघा आय टी कंपनीत हमाल आहोत.... आणि आय टी असल्यामुळे अंमळ हळवेपणा हा बाय डिफॉल्ट आलाच??? तर आम्ही मिपा वर आलो तेव्हा आमचा आयडी हा निखील देश्पन्दे असा होता. अर्थात रुळल्यावर आम्ही तो बदलून घेतला हा भाग अलाहिदा. जालावर भटकण्याची सवयीनेच मिसळपाव च्या घोषणे पासूनच शोध लागला होता पण आम्ही जरा सदस्यत्व घ्यायला उशीर केला आणि आमचा बिल्ला नं झाला ५४१. सदस्यत्व घेतल्यानंतर पहिले २-४ महिने आम्ही फक्त वाचनमात्रच होतो पण एक दिवस असेच लॉगिन केले आणि आम्हाला खरडवही या मिपावर एकेकाळी सगळ्यात हॅपनिंग असलेल्या गोष्टीचा साक्षात्कार झाला. आणि आम्ही लवकरच खरडवही उचकापाचक मंडळाचे अध्यक्ष प.रा. राजवाडे यांचा मार्गदर्शना खाली आम्ही खव उचकापाचक करायला लागलो. त्याच काळात आम्हाला खरडवहीत झेंड्याचा चड्ड्या हा ऐतिहासिक खरडवाद वाचायला मिळाला. तुमचे लाडके चोता दोन आणि आमचे एक आमच्याच गावचे म्हणजेच औरंगाबादचे मित्र आनंदयात्रीजी आणि यांच्यातला वाद गाजला. या वादात आक्रस्ताळी अदिती पण बहुधा सामील होती. या वादाचा आम्हाला सगळ्यात जास्त झालेला फायदा म्हणजे श्री. धमाल मुलगा बारामतीकर यांची मैत्री. हा माणुस कुणालाही गप्पात कसा गुंतवेल सांगता येत नाही हो.. आणि त्यानंतर एक एक करुन ओळखी व्हायलाच लागल्या, काही चांगले नांतेसंबध जुळल्या गेले. इथल्या मित्रांची यादी आता खुप मोठी आहे. तर असे हे मिपा ज्यावर आम्ही आलो आणि इथलेच झालो. बाकी माझ्याबाबत लिहायचे राहुनच गेले. अर्थात सांगण्यासारखे काही खास नाही. हळुहळु बोलुयात खरडवहीतुन म्हणजे ओळख होईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हा हा हा

मितभाषी
Wed, 08/25/2010 - 18:40 नवीन
डॉनराव हे लै भारी. मी भाउसाहेब. तसे मला सगळे हौशा, गवश्या, नवश्या किंवा भावश्या म्हणुन ओळखतात. म्हणजे त्याचे असे झाले. आम्ही आमच्या पालनकर्त्या मायबापास एका जत्रेत सापडलो त्यामुळे 'गवश्या'. आम्ही सापडण्याअगोदर आमच्या पालनकर्त्या मायबापानी देवाला नवस केल्ता. त्याणा अपत्यप्राप्ती होन्याअगुद्रच आम्ही त्यांना सापाडलो/गवासलो. म्हणुन नवश्या. तसेच आम्हाला लहानपनापसुनच लै हौस(हवस नव्हे) म्हुन हौश्या. आनि ठेवल्याल नाव भाउसाहेब म्हुन भावश्या. आमचे आवडते लेखक्/लेखिका म्हन्जी, फुस्स, कार्लोस, वहिनी, दादा कोंडके, _अदिती, गणपा, संजोप राव, बिकाशेठ इ इ. आम्ही कट्ट्यावर लय 'धमाल' करतो. दादा दरोज येगयेगळ्या बाया काखत घालुन येतो नि आम्हाला लै हसवतो म्ह्नुन आम्ही त्याइचे आभारी. कार्लोस मला इंग्रजी शिकवतो. फुस्स एक नंबर ठुसक्या आहे. म्हणुन त्याला सरकारने PUC अनिवार्य केले आहे. तो कट्ट्याव आल्याव आम्ही मागच्या वर्षीचे स्वाइन्चे मास्क घालुन बसतो. मला मिपा फार्फार आवडते. इथले प्रतिसाद फार आवडतात. मला वाचायला आवडते. भावश्या.
  • Log in or register to post comments

वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा

फुस्स
Tue, 08/10/2010 - 14:56 नवीन
वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने जास्त काही लिहु शकणार नाही. -(आवाज आला क्का ?) फुस्स
  • Log in or register to post comments

बर बर...

पांथस्थ
Tue, 08/10/2010 - 15:48 नवीन
मग प्रतिक्रिया तरी कशाला दिलीत. -(वास आवाज आला क्का ?) ढुस्स ह.घ्या.हे.वे.सां.न.ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुस्स

मला वाटतं इथे प्रत्येकजण

फुस्स
Tue, 08/10/2010 - 16:48 नवीन
मला वाटतं इथे प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडी आणि स्वतःची ओळख / हेतु सांगतोय. बघा, मराठी कळत असलं तर! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल -(आवाज आला क्का ?) फुस्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

बघा, मराठी कळत असलं तर! हो

पांथस्थ
Wed, 08/11/2010 - 08:45 नवीन
बघा, मराठी कळत असलं तर!
हो का? बघू बरं ...
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
...वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने...
या प्रश्नाला तुमची प्रतिक्रिया कसे बरं उत्तर ठरू शकते? ना त्यात आवड सांगितली आहे ना छंद ना काही अवांतर. ह्याला माझा (तात्त्विक) आक्षेप होता :) असोत. जास्त वैयक्तिक होण्यापेक्षा हा (सं)वाद इथेच थांबवूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुस्स

-(वास आवाज आला क्का ?)

मी ऋचा
Wed, 08/11/2010 - 10:48 नवीन
-(वास आवाज आला क्का ?) ढुस्स ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं

फुस्स
Wed, 08/11/2010 - 12:45 नवीन
:) लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं ! असो , पाथस्थांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. टारझनाचे पाहुन सगळ्यांनीच त्याच्या स्टाईलचे अनुसरन करायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाला जमेलंच असे नाही. -(आवाज आला क्का?) फुस्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

हलकेच घ्या की हो!!

मी ऋचा
Wed, 08/11/2010 - 13:12 नवीन
हलकेच घ्या की हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुस्स

अश्लिल अश्लिल अश्लिल हलकेच

फुस्स
Wed, 08/11/2010 - 14:31 नवीन
अश्लिल अश्लिल अश्लिल :) हलकेच घ्या. -(आवाज आला क्का?) फुस्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

मायला, डान्रावांनी धागा काढून

असुर
Tue, 08/10/2010 - 14:57 नवीन
मायला, डान्रावांनी धागा काढून १० मिनिट झाली आणि कोणी काय बोलला नाय इथे!! फक्त २ प्रतिसाद!!! फाउल झाला ना!!! असो!!! आपण असुर. बरीचशी माहिती लिहिली आहेच पण परत एकदा. चकाट्या पिटणे हा आमचा जाहीर व्यवसाय आहे. आणि असुर हे नाव घेण्यामागे काहीही प्रयोजन नाही. "सुहास्य तुझे" हे गाणे ऐकत होतो, आणि "जशी विमोही सुरासुरांची" हे वाक्य ऐकून आपल्याला हे नाव सुचलंय. बाकी आपण नवीन-जुने हा फरक मानतच नाय! माफक मस्करी करावी, चांगला टाईमपास होतो.. चार बरे लेख पाडावेत, काहीतरी चांगलं वाचल्यासारखं वाटतं. बास, अजून काय लिहिणे, लेखन-सीमा!
  • Log in or register to post comments

मी नगरीनिरंजन, मूळचा नगरचा

नगरीनिरंजन
Tue, 08/10/2010 - 15:05 नवीन
मी नगरीनिरंजन, मूळचा नगरचा (अहमदनगरचा). सध्या सिंगापुरात. नवीन चांगले मराठी वाचण्याचा आणि काहीबाही लिहिण्याचा किडा आहे म्हणून इथे आलोय.
  • Log in or register to post comments

लई बर झाल बुवा एकदम झक्कास......!!

मनि२७
Tue, 08/10/2010 - 15:08 नवीन
मला आता माझी ओळख करून द्यायला आणि घ्यायला पण एकदम सोप झाल ... (गट:- नवीन सदस्य!!!!!!) चला सुरवात नावापासून.(अर्थात माझ्या..) माझ नाव:- मला मनी/ माऊ काहीही म्हणू शकता .... :-) काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतेय पण मुळची अस्सल विदर्भातली....... छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला जरा जास्त आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) आणि त्यामुळे पाककृतीची आवड, भटकंती करायला आवडत(पावसाळ्यात जास्त), त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड आणि असाच time pass भरपूर काही आहे पण आता आठवत नैये (आठवलं कि सांगतेच परत)..... सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!... आणि अशीच थोडक्यात ओळख सगळ्या सदस्यांनी द्यावी(माझी ओळख थोडी जास्त झाली असेल तर तुम्ही थोडक्यात द्या पण द्याच...) आभारी.... :-) मनी...
  • Log in or register to post comments

वा....

मन
Tue, 08/10/2010 - 15:09 नवीन
नवीन्-जुने,हिरवे-पिवळे चर्चेला सकारात्मक वळण दिल्याबद्दल डॉन्याचं अभिनंदन आणि आभार. मी, मन.... मनोबा. मला दोनेक वर्षापासुन इथं नवीन असल्यासारखच वाटतय. :) मी क्वचितच लिहितो.(लेख किंवा प्रतिसाद) आणि जितकं लिहिलय त्यातही क्वचितच समोरच्याचं कौतुक करतो.(चांगल्या गोष्टीला "फाल्तु आहे.सवंग आहे" असं म्हटल्याशिवाय मला मोठं कोण म्हणणार?(तसही कुणीच म्हणत नाही म्हणा) ) प्रवेश करत नस्लो तरी बहुतांशी वाचनमात्र असतोच असतो. इथल्या जवळपास सगळ्याच "हिट" लेखांचा(आणि तो लिहिणार्‍यांचा मी फ्यान आहे) अधिक काय सांगु?
  • Log in or register to post comments

अरे भल्या माणसा....

धमाल मुलगा
Tue, 08/10/2010 - 18:34 नवीन
आहेस कुठे तू? एकदम गायब झालायस की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

चुकून ३ वेळा प्रकाशित

मनि२७
Tue, 08/10/2010 - 15:11 नवीन
चुकून ३ वेळा प्रकाशित झाल... क्षमस्व आहे :-) मनी...
  • Log in or register to post comments

मी मीच

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:12 नवीन
माझं नाव माझ्या नावाप्रमाणेच आहे. सुरूवातीपासून तसंच आहे. त्यामुळे कसं सुचलं वगैरे प्रश्न गैरलागू आहेत. एक नंबर कंपूबाज. फक्त आपल्या कंपूला काही बंधन नाही. गप्पा मारणारे, हसून खेळून वावरणारे कोणीही आमच्या कंपूत बाय डिफॉल्ट सामावून घेतले जातात. कधी कधी काही तरी लिहितो इथे. ( http://www.misalpav.com/newtracker/322 प्लिज प्लिज प्लिज वाचा आणि कौतुक करा ) ... नवीन सदस्यांचं स्वागत. मिपावरही आणि आमच्या कंपूतही.
  • Log in or register to post comments

>>>कधी कधी काही तरी लिहितो

अवलिया
Tue, 08/10/2010 - 15:54 नवीन
>>>कधी कधी काही तरी लिहितो इथे मातीचा पुढचा भाग कधी ? (ही चौकशीच आहे. वसकन अंगावर येवु नये.. फाट्यावर मारु)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आता डान साहेबांनी इचारालय

जोशी 'ले'
Tue, 08/10/2010 - 15:13 नवीन
आता डान साहेबांनी इचारालय म्हून सांगतो , नाय तर आपण कुणाला घाबरत नाय, मी जोशी 'ले' माझ्या बद्दल सांगण्या सारखे काही नाही , मी खूप दिवसां पासून मि. पा. चा एक वाचक आहे, पण सदसत्व आताच मिळालाय,
  • Log in or register to post comments

'ले' म्हणजे काय?

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:21 नवीन
'ले' म्हणजे काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

आम्ही जोशिले ..शहजादे है जमीं

जोशी 'ले'
Tue, 08/10/2010 - 16:36 नवीन
आम्ही जोशिले ..शहजादे है जमीं के... दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

'ले' म्हणजे एकच शिक्का दोनदा

नितिन थत्ते
Tue, 08/10/2010 - 15:26 नवीन
'ले' म्हणजे एकच शिक्का दोनदा मारणारे तर नव्हे? (ह घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मग जोशी म्हणजे काय?

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:27 नवीन
मग जोशी म्हणजे काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

एक पुर्वाश्रमीच असेल हो.बिका

गणपा
Tue, 08/10/2010 - 15:34 नवीन
एक पुर्वाश्रमीच असेल हो. बिका तुम्हला भारी चौकशा बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आता धागाच चौकशी साठी काढलाय

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:43 नवीन
आता धागाच चौकशी साठी काढलाय न्हवं!!! मंग???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बाब्बो ..कसे धाड धाड परस्न

जोशी 'ले'
Tue, 08/10/2010 - 16:34 नवीन
बाब्बो ..कसे धाड धाड परस्न फेकले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

नमस्कार मंडळी, मी

गणपा
Tue, 08/10/2010 - 15:14 नवीन
नमस्कार मंडळी, मी गणापा. बिल्ला नंबर ७०७ मुंबईकर, पण सध्या वास्तव्य विदेशात. प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. पण बरेच मित्र असे मिळालेत की वाटत आम्ही शाळुसोबतीच. :) विनाकरण कुणाशी वाकड्यात जात नाही. कुणी डिवचल तर मग मात्र खरडी प्रतिसाद फेकुन मरतो ;) आवड निवड म्हणाल तर कानसेन आहोत. हौशी कुक. आता जालिय मित्रांनी डोक्यावर चढवुन ठेवलय ही त्यांची दर्यादिली. फिरायला घरातुन पाय बाहेर पडत नाही, पण पडलोच तर मात्र मनमुराद आनंद लुटतो. बाकी आता आहात इथेच तर खरडत जा इथे अधुन मधुन. तेवढीच ओळख वाढत जाईढ.
  • Log in or register to post comments

'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:22 नवीन
'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बाकी कोण मिपाकर आहेत हो तुमच्या ओळखीचे? आय मीन, तुम्ही बघितलेले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बिका आरसा दिसतो का पहा बर जरा

गणपा
Tue, 08/10/2010 - 15:24 नवीन
बिका आरसा दिसतो का पहा बर जरा आजु बाजुला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आम्ही आरशात दिसत न्हाय!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:25 नवीन
आम्ही आरशात दिसत न्हाय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

दिसत न्हाय का मावत न्हाय. =))

गणपा
Tue, 08/10/2010 - 15:31 नवीन
दिसत न्हाय का मावत न्हाय. =)) =)) =)) -असो आता पळतो नाय तर डॉनअण्णा येईल कात्री घेउन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

म्हंजी बिकाला बघितला हायेस दिसते.

चिंतामणी
Tue, 08/10/2010 - 23:31 नवीन
मी गणापा. प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. प्रेषक गणपा दि. मंगळ, 10/08/2010 - 15:31. दिसत न्हाय का मावत न्हाय. =)) म्हंजी बिकाला बघितला हायेस दिसते. (चौकस)चिंतामणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

विकास
Tue, 08/10/2010 - 16:39 नवीन
'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. अगदी! हे म्हणजे, दहावीला बोर्डात पहीले येणारे मुलाखतीत कसे सांगतात की मी कधी अभ्यास केलाच नाही, तसेच काहीसे हे झाले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप

विजुभाऊ
Mon, 12/08/2014 - 15:46 नवीन
हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बिका मराठीत "हौशी " हा शब्द फारसी "हवस " या शब्दावरून आलेला आहे .. ( चला पळा................ )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>प्रत्यक्षात एका मिपाकराला

अर्धवट
Tue, 08/10/2010 - 15:26 नवीन
>>प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. म्हणजे १०-१५ आयडी झालेच की. (पळा आता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आम्ही समजतो त्या मिपाकराला

अवलिया
Tue, 08/10/2010 - 15:55 नवीन
आम्ही समजतो त्या मिपाकराला पाहिले असेल तर पाचशे आयडी पण असु शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

बिल्ला नं २७०

ऋषिकेश
Tue, 08/10/2010 - 15:25 नवीन
मी ऋषिकेश. बिल्ला नं २७० मुंबईकर भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आणि या सगळ्यावर लिहायला (उतरत्या क्रमाने) आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.
  • Log in or register to post comments

बिल्ला क्र. १७

नंदन
Tue, 08/10/2010 - 23:41 नवीन
भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.
--- +१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कोटी कोटी कोट्यांबद्दल मौन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/10/2010 - 23:42 नवीन
कोटी कोटी कोट्यांबद्दल मौन का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

असा मी, असा मी

गांधीवादी
Tue, 08/10/2010 - 15:35 नवीन
एक सामान्य माणूस अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर, पुण्यातील एका संस्थेतून MBA (finance) करीत आहे. आवडता विषय एक आणि एकच राजकारण. माझे स्वप्न एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे. ( DO OR DIE ) हा जन्म भारताच्या सत्कारणी लावायचा आहे.
  • Log in or register to post comments

गांधीवादी : माझे स्वप्न एकद

विजुभाऊ
Tue, 08/10/2010 - 16:11 नवीन
गांधीवादी : माझे स्वप्न एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे. हम्म.. नो कॉमेन्ट्स. राजकारणातल्या कोलाम्ट्याउड्या इतिहासातही :) अवांतर :तुमच्या त्या अवताराला गांधीवादी सावरकर म्हणावे लागेल. अतीअवांतर : भाजपने कधितरी स्वीकारलेला गांधीवादी समाजवाद तो हा असाच होता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

मी इन्द्रराज पवार

इन्द्र्राज पवार
Tue, 08/10/2010 - 15:40 नवीन
"माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे." (हे काही धाग्यांतील प्रतिसादाबाबतही व्हावे अशी अपेक्षा आहे. असो.) =================================================== नमस्कार. मी 'इन्द्रराज पवार' आणि याच मूळ नावाने इथे वावरतो. कलाशाखेचा पदव्युत्तर. मूळचा कोल्हापुरचा पण आता दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या भागात व्यवसायानिमित्ताने भटकंती. महिन्यातून एकदोनवेळा कोल्हापुरी घरी परत येत असतो. खूप प्रवास त्यामुळे "मिसळपाव" हा प्रवासातील फार जवळचा असा मित्र बनला आहे. (रोहटकच्या वाटेवर "ती" स्वयंपाक धागा मालिका वाचत असताना होत असलेल्या मनोरंजनामुळे प्रवास चालू असताना फार हसू येत होते, आणि माझे त्या हसण्यामागील कारण न समजल्याने माझे शिख मित्र गोंधळुन "ओये, देखो तो अपना बिट्टा पागल हो गया है" असे आपसात म्हणत होते.) साहित्य (मराठी आणि इंग्लिश), राजकारण, समाजजीवन, इतिहास यांची आवड त्यामुळे या विषयावरील धाग्यात भाग घेणे, प्रतिसाद देणे आवडते. तसा फार जुना सदस्य नाही, तरीही सदस्यत्व घेतलेल्या दिवसापासून इथे रमलो आहे हे तितकेच खरे. संपादक मंडळ "मिसळपाव"साठी स्वतःचा वेळ/पैसा खर्च करत असते याची जाणीव असल्याने त्यांनी आखणी केलेल्या धोरणाविरुद्ध कधीही वर्तन केलेले नाही. शिवाय एखादी बाब व्यक्तीशः आवडली नसेल तर मंडळातील कुणाही एकाला "व्य.नि." केला तर त्यावर कार्यवाही होते असा अनुभव असल्याने तक्रारीस जागा नाही. अशुद्ध लिखाणाची नावड आहे, त्यामुळे धागा देताना वा प्रतिसाद देताना तो तिथे जाण्यापूर्वी दोन-तीन वेळा तपासतो. (तसेच चर्चेत वाद वाढणार असे दिसल्यास कुठे थांबायचे ते समजते, "क्षमस्व" म्हटल्यास सर्व काही शांत-शांत होते असा अनुभव आला आहे. त्यामुळे एकमेकात कटुता राहात नाही.) नवीन सदस्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांच्या लेखनास शुभेच्छा ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

मी विलासराव............

विलासराव
Tue, 08/10/2010 - 15:47 नवीन
मी विलास शिंदे........मला बरेच लोक विलासरावच म्हनतात म्हनुन हि आयडी.मुळचा अहमदनगरचा.वास्तव्य मुंबई येथे. भटकंती, वाचन ही आवड. नवीन सदस्य असलो तरी वाचक जुनाच आहे. खेचाखेची आवडत नाही पण कुनी केलिच तर..............सरळ दुर्लक्ष करतो. कुणाही मिपाकराला प्रत्यक्ष ओळखत नाही.
  • Log in or register to post comments

कलादालन मद्धे फोटो कसे टकाय्चे ते कोणी सागेल का

शेखर दिवसे
Tue, 08/10/2010 - 15:42 नवीन
कलादालन मद्धे फोटो कसे टकाय्चे ते कोणी सागेल का
  • Log in or register to post comments

काका!!! प्रश्नाची गल्ली

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/10/2010 - 15:44 नवीन
काका!!! प्रश्नाची गल्ली चुकली.... असो. आधी माहिती द्या ना... डान्या वरडू वरडू सांगायलाय की तुमची माहिती द्या म्हून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर दिवसे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा