Skip to main content

आईचं छप्पर.

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 10/08/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं छप्पर. कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिंव भरी ...! हिंव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रम्हपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहतांना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! ...गंगाधर मुटे.. . ( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री) ( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2343
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हं!

योगेशुजी आणि अपर्णाजी धन्यवाद.

चारपाच दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो घरांची झालेली पडझड आणि उध्वस्त झालेले संसार आज बघितले आणि या कवितेची आठवण झाली. :( :(