Skip to main content

कुणी उधळली मुठ नभी ही रम्य सुवर्णाची...

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 05/08/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा कॅनन एसेक्स २०० आय एस
लेखनविषय:

वाचने 3739
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

आजच संध्याकाळी काढला आहेत का हा फोटो? मस्त आहे. मला डेस्कवरूनही एवढं मस्त दिसत होतं आकाश आज ... अगदी असंच!

In reply to by युयुत्सु

तुम्ही जिमला जाता आणि अदितीला डेस्क आहे हे वाचून आनंद झाला.. बाकी फोटो मस्तच...गूढ असं काहीतरी वाटलं.

In reply to by शिल्पा ब

लोकांना मुलं असतात, अदितीला डेस्क आहे असं काहीसं वाटलं! अदितीकडे किंवा अदितीसाठी डेस्क आहे हे वाक्य जास्त योग्य वाटतं. ********************************* कुठे रे गेला माझा कॅलक्यूलेटर?

In reply to by शिल्पा ब

>>तुम्ही जिमला जाता आणि अदितीला डेस्क आहे हे वाचून आनंद झाला.. हे वाचून तुम्ही मिपावर मुरल्याची खात्री पटली.

In reply to by शिल्पा ब

छानच उधळण आहे :) अवांतर :- मी "अदितीला डोस्क आहे हे वाचून आनंद झाला.." असे वाचले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवांतर :- मी "अदितीला डोस्क आहे हे वाचून आनंद झाला.." असे वाचले.
चुकून का होईना या सदाशिव पेठी पर्‍याने माझ्यावर चांगला आरोप केला हे वाचून डोळे पाणावले, हा आरोप माझ्या ह्रुदयाला भिडला. असो. सदर प्रतिसादातच मी जाहीर खुलासा करू इच्छिते की मला डेस्क नाही आणि डोस्कंही नाही. खुलासा संपला. धन्यवाद. :-)

छान

सर्व अभिप्रायांबद्दल मनःपूर्वक आभार! खरं तर मला रघुवंशाच्या दूस-या सर्गातील खालिल श्लोक हे दृष्य बघितल्यावर आठवला. कालिदासाला अभिप्रेत असलेला 'पल्लवरागताम्र' म्हणजे तांबूस रंग हाच असणार असे वाटल्याने कॅमेरा काढून लगेच टिपला... संचारपूतानि दिगंतराणि कृत्वा दिनान्ते निलयाय गन्तुम् | प्रचक्रमे पल्लवरागताम्रा प्रभा पतंगश्च मुनेश्च धेनु: || अर्थ - दिगंतराचा संचार पूर्ण करून तांबूस (पल्लवरागताम्रा) रंगाची गाय (नंदिनी) आणि सूर्याची प्रभा घरा कडे परत निघाल्या...

छान फोटो आहे......... पण इमारत नसती तर चालले असते..... पुढच्या वेळेस ध्यानात ठेव.........

फोटो आवडला..