दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं सुलु आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला. सुलुच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता.
मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?"
"पाणी दे मग सगळं सांगते." - सुलु
मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं.
सुलु नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?"
मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस."
मला हसताना पाहून सुलुचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते. अगदी "Head over heels" तू तिच्या प्रेमात पडतेस मग तू काय करशील?"
"इश्श्य्य ! अगदीच डेस्परेट दिसणार नाही अशा रीतीने करता येईल ते करेन" ;) - अस्मादिक
" हो की नाही? मी ही तेच केलं मी अगदी रंगून गेले त्याच्या प्रेमात पण स्वारी कवितेच्या ओळींखेरीज पुढेच जाईना मग शेवटी ४ महीन्यानी हिंट देऊन देऊन देऊन शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." - सुलु
"अय्या मग? मस्तच की." - मी सुलुला लाडवाची बशी देत देत म्हटलं.
"मग काय आता बोंबला! तो निघालाय महाडँबीस. त्यानी त्यावर मला २ नाही ४ कवितांच्या ओळी ऐकवल्या परत प्रेमाचा इजहार केला नाही तो नाहीच." :( इति सुलु
"अगं मग तू त्याला सरळ कन्फ्रंट का नाही करत?" मी विचारलं
"तेच ना शुचि , तू आणि मी भोळ्या आहोत जशा बर्याच बायका असतात. हे पुरुष महाडँबीस असतात. सगळे पत्ते यांच्या हातात ठेवतात. आता बघ मी जर त्याला विचारलं आणि तो जर नाही म्हणाला तर सगळं मुसळ केरात. :("
"अगं पण सुलु कशावरनं तो नाही म्हणेल तो सुद्धा तुझा फॅन असेल"
"पण शुचि तेच तर आहे ना त्याला मी विचारलं आणि तो जर हो म्हणाला तरीदेखील काय चार्म राहीला गं? इतका अट्टाहास, आटापीटा करून होकार पदरात पाडायचा त्यात सगळी गोडी निघून जाते."
"ह्म्म! खरय" - मी
"म्हणून म्हणतेय धरलं तर चावतं अन सोडलं तर पळतं असं झालय नुसतं." सुलु बशीतला लाडवाचा तुकडा मोडत मोडत म्हणाली.
_____
आम्हाला तरी या समस्येवर काही तोडगा सुचत नाही आहे तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा.
वाचने
3615
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि मला वाटत होतं की बायका ता
माठ बायका देखील असतात तर!
In reply to आणि मला वाटत होतं की बायका ता by अरुण मनोहर
दोघांशी सहमत
In reply to माठ बायका देखील असतात तर! by आजानुकर्ण
कार्ट्याकडून बाब्याकडे
In reply to दोघांशी सहमत by बेसनलाडू
म्याग्नाकार्टा !
In reply to कार्ट्याकडून बाब्याकडे by चतुरंग
हे पुरुष महाडँबीस असतात.ख्या
प्यार का लड्डु !!
नो चान्स! दुसरा अध्याय उघडणे.
बेटर.....
अतिशय तरल लेखन. खरच तुमचे
तुमचेसुद्धा फार्फार कौतिक...
In reply to अतिशय तरल लेखन. खरच तुमचे by परिकथेतील राजकुमार
आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं
आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं
In reply to आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं by शिल्पा ब
<<<काका विचारत होते की हे
In reply to आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं by परिकथेतील राजकुमार
एक उपाय
कुठल्या ओळी?
सुलुचे भाषाविषय कच्चे