Skip to main content

धरलं तर चावतय ...

लेखक शुचि यांनी गुरुवार, 05/08/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं सुलु आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला. सुलुच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता. मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?" "पाणी दे मग सगळं सांगते." - सुलु मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं. सुलु नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?" मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस." मला हसताना पाहून सुलुचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते. अगदी "Head over heels" तू तिच्या प्रेमात पडतेस मग तू काय करशील?" "इश्श्य्य ! अगदीच डेस्परेट दिसणार नाही अशा रीतीने करता येईल ते करेन" ;) - अस्मादिक " हो की नाही? मी ही तेच केलं मी अगदी रंगून गेले त्याच्या प्रेमात पण स्वारी कवितेच्या ओळींखेरीज पुढेच जाईना मग शेवटी ४ महीन्यानी हिंट देऊन देऊन देऊन शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." - सुलु "अय्या मग? मस्तच की." - मी सुलुला लाडवाची बशी देत देत म्हटलं. "मग काय आता बोंबला! तो निघालाय महाडँबीस. त्यानी त्यावर मला २ नाही ४ कवितांच्या ओळी ऐकवल्या परत प्रेमाचा इजहार केला नाही तो नाहीच." :( इति सुलु "अगं मग तू त्याला सरळ कन्फ्रंट का नाही करत?" मी विचारलं "तेच ना शुचि , तू आणि मी भोळ्या आहोत जशा बर्‍याच बायका असतात. हे पुरुष महाडँबीस असतात. सगळे पत्ते यांच्या हातात ठेवतात. आता बघ मी जर त्याला विचारलं आणि तो जर नाही म्हणाला तर सगळं मुसळ केरात. :(" "अगं पण सुलु कशावरनं तो नाही म्हणेल तो सुद्धा तुझा फॅन असेल" "पण शुचि तेच तर आहे ना त्याला मी विचारलं आणि तो जर हो म्हणाला तरीदेखील काय चार्म राहीला गं? इतका अट्टाहास, आटापीटा करून होकार पदरात पाडायचा त्यात सगळी गोडी निघून जाते." "ह्म्म! खरय" - मी "म्हणून म्हणतेय धरलं तर चावतं अन सोडलं तर पळतं असं झालय नुसतं." सुलु बशीतला लाडवाचा तुकडा मोडत मोडत म्हणाली. _____ आम्हाला तरी या समस्येवर काही तोडगा सुचत नाही आहे तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3631
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आणि मला वाटत होतं की बायका ता वरून ताकभात ओळखण्यात पटाईत असतात! इथे तर >>शेवटी ४ महीन्यानी हिंट देऊन देऊन देऊन शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे. नंतर चे (लॅक ऑफ) रिस्पॉंसेस पाहून देखील हिंट घेतली नाही. कठीण आहे. म्हणजे सिक्थ सेंस नसलेल्या, पुरषांसारख्या माठ बायका देखील असतात तर!

In reply to by अरुण मनोहर

माठ बायका देखील असतात तर!?? श्री. अरुण मनोहर, मिपावर आता जपून राहा.

In reply to by बेसनलाडू

जाताना असे प्रतिसाद अडथळ्याचे ठरु शकतात मनोहरकाका! ;) (बाब्याकार्टा*)चतुरंग *कसं मॅग्नाकार्टा वगैरे म्हटल्यासरखं वाट्टं नै! ;)

हे पुरुष महाडँबीस असतात. ख्या ख्या ख्या...खी खी खी , उगाच डोक्यात "पिडा" आठवले. ;) समस्त पुरुष जातीला एकजात डँबीस ठरवल्या बद्धल निषेध !!! ;) (प्रेमळ डँबीस)... ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुमचेसुद्धा फार्फार कौतिक... इतके प्रोत्साहन देणारी व्यक्ती गेल्या १०००० वर्षात झाली नाही... (दहा हजार वर्षे अत्र्यांकडून उधार.)

आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." एवढं सांगूनसुद्धा काहीच response नाही म्हंटल्यावर सोडून द्यायचं... का सगळं स्पष्टच सांगितलं पाहिजे?

In reply to by शिल्पा ब

आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." एवढं सांगूनसुद्धा काहीच response नाही म्हंटल्यावर सोडून द्यायचं... का सगळं स्पष्टच सांगितलं पाहिजे?
+१ शमत आहे. काल ही कथा वाचुन आमचे एक काका विचारत होते की हे सगळे सुलुच्या नवर्‍याला कसे काय चालते ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

काका विचारत होते की हे सगळे सुलुच्या नवर्‍याला कसे काय चालते ? =)) =)) =)) =))

त्यांना ग्रेसजींची "दारी उभा गे साजण" ही कविता म्हणून दाखवा आणि प्रतिक्रिया बघा ! कविता का जवाब कविता से !! ;)

सुलुचे भाषाविषय कच्चे राहिलेले दिसतायत.. सख्ख्या प्रियकराने "विषय सर्वथा नावडो" ही ओवी म्हणून दाखवल्यावर आणखी काय होणार ;)