" स्वप्न" पहिला पाउस

निरन्जन वहालेकर जे न देखे रवी...
" स्वप्न" पहिला पाउस सुटला वैरी वादळवारा, रिमझिम बरसतील रेशीम धारा, इंद्र धनुचे रंग घेउनी, भेटावीस तू अशाच प्रहरा. पहिला पाऊस तू होऊन यावी, प्रेमघनासम मजवर बरसावी, तव प्रीतीच्या जलधारांनी, प्रेमसागरा भरती यावी. ओलेती तव रूप पहावे, संमोहित गात्रांनी व्हावे, प्रेमरंगी तल्लीन होऊनी, प्रीतीचे अमृतघट प्राषावे, विसारावीस तू क्षणिक ह्या जगा, मजसी माझा विसर पडावा, तव मिलनाचा अपूर्व ठेवा, हृदय अंतरी जतन करावा,. सुटला वैरी वादळ वारा ……… निरंजन वहाळेकर
वर्गीकरण
काव्यरस

6 टिप्पण्या 2,469 दृश्ये

Comments

शानबा५१२ नवीन

काय कविता आहे!!!! चांगली आहे का?? ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे

शुचि नवीन

सुंदर सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair नवीन

चांगली कविता आहे. पण इंग्रजीत या कवितेच्या शीर्षकाचा भलताच अर्थ निघतो म्हणून आधी चरकलो होतो:)

शिल्पा ब नवीन

In reply to by sur_nair

कविता छान आहे.... इंग्रजी नाही पण मराठीतलाच वेगळा अर्थ वाटला मला :-) .. इथे बाकी इंग्रजी अर्थाची कविताही येऊ शकते बरं!!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

निरन्जन वहालेकर नवीन

प्रतिसादासाठी धन्यवाद व आभार ! शीर्षकात बदल केला आहे. सूचनांसाठी पुन्हा आभार !

मदनबाण नवीन

ओलेती तव रूप पहावे, संमोहित गात्रांनी व्हावे, प्रेमरंगी तल्लीन होऊनी, प्रीतीचे अमृतघट प्राषावे, :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson