Skip to main content

" स्वप्न" पहिला पाउस

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 22/06/2010 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
" स्वप्न" पहिला पाउस सुटला वैरी वादळवारा, रिमझिम बरसतील रेशीम धारा, इंद्र धनुचे रंग घेउनी, भेटावीस तू अशाच प्रहरा. पहिला पाऊस तू होऊन यावी, प्रेमघनासम मजवर बरसावी, तव प्रीतीच्या जलधारांनी, प्रेमसागरा भरती यावी. ओलेती तव रूप पहावे, संमोहित गात्रांनी व्हावे, प्रेमरंगी तल्लीन होऊनी, प्रीतीचे अमृतघट प्राषावे, विसारावीस तू क्षणिक ह्या जगा, मजसी माझा विसर पडावा, तव मिलनाचा अपूर्व ठेवा, हृदय अंतरी जतन करावा,. सुटला वैरी वादळ वारा ……… निरंजन वहाळेकर
काव्यरस

वाचने 2482
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चांगली कविता आहे. पण इंग्रजीत या कवितेच्या शीर्षकाचा भलताच अर्थ निघतो म्हणून आधी चरकलो होतो:)

In reply to by sur_nair

कविता छान आहे.... इंग्रजी नाही पण मराठीतलाच वेगळा अर्थ वाटला मला :-) .. इथे बाकी इंग्रजी अर्थाची कविताही येऊ शकते बरं!!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

ओलेती तव रूप पहावे, संमोहित गात्रांनी व्हावे, प्रेमरंगी तल्लीन होऊनी, प्रीतीचे अमृतघट प्राषावे, :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson