विडंबनाच्या चर्चेवर विडंबन... मद्यविरहित

तळीराम's picture
तळीराम in जे न देखे रवी...
28 Mar 2008 - 9:59 pm

मिसळपावच्या कट्ट्यावरती विडंबन दिले तू मला
टोपणनावे `तूटून' पडलो ओळखले का मला

चतुरंग मी, मी प्राजू ती
सुशील, लाडू, खेचर येती
नाव भिन्न परी एकच यु(क्)ती
मतामतांचा पूर तेधवा कट्ट्यावर पातला

घाला बंदी ! नको विडंबन
मद्याचे तर नकोच चिंतन
मिसळ खाऊ या कांद्यावाचून
सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला

विनोदविडंबनमौजमजाप्रकटनशुभेच्छाप्रतिसादप्रतिक्रियावादविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

28 Mar 2008 - 10:27 pm | सर्किट (not verified)

विचार चांगले.

पण,

१. मूळ कवितेचे नाव द्यायला हवे होते: स्वरगंगेच्या काठावरती
२. मुखड्यातच खडे लागतात.

पुढील विडंबनांस शुभेच्छा.

- सर्किट रामुभय्या दाते

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 10:18 am | विसोबा खेचर

घाला बंदी ! नको विडंबन
मद्याचे तर नकोच चिंतन
मिसळ खाऊ या कांद्यावाचून
सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला

मस्त लिहिलं आहेस रे तळीरामा...

(सुधाकर) तात्या.