अखेरीस मॅकमामा गेला. तसे बरेच दिवस आजारीच होता म्हणा! सुटला बिचारा!
मॅकमामाला जग दुसर्याच नावानं ओळखायचं, पण माझ्यासाठी तो मॅकमामाच. त्याच्या गालफडावर खूप आधी थोडसं मास होतं तेंव्हापासून ते तीसेक वर्षं खप्पड झालेल्या गालफडांवर दाढी वाढवून ती लपवण्याच्या त्याच्या प्रयत्नांतून ते अखेरीस लिव्हरला सूज आल्यानं पुन्हा त्याची गालफडं पुन्हा पुरीसारखी टम्म झाली तोपर्यंत माझ्या दृष्टीने तो कायम मॅकमामाच होता. 'मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार' या न्यायाने त्याने कधी मला आणि त्याच्या इतर भाच्यांनाही लंगोटीचा तुकडाही दिला नाही. पण तरी मॅकमामा तो मॅकमामाच. कधी विचारलं तर आपल्या चिरकट आवाजात खेकसायचा, 'रांडिच्यांनो, हिथे जॉकॉफिक्या आन व्ह्यायपीच्या फ्रेंच्याबिंच्या बाजारात आल्या, आणि तुम्ही आजून लंगोटीतनं बाहेर पडत नाही. कदी मोठे होनार का आयुष्यभर कुनाची मुती लांब जात्ये या शर्यती लावत र्हानार, आं?' मामा होत अमराठी, पण मराठी बोलायचा झोकात. भाषा अगदी मराठी माणसासारखी रांगडी, पण स्वभावही अगदी मराठी माणसासारखा. मामा आमच्यावर खेकसायचा, पण आमचे लाडही करायचा. स्वभाव त्याचा कोकणातल्या फणसासारखा, वरुन काटेरी पण आतून रसाळ आणि गोड. आमच्यातल्या दामल्यांच्या गोर्यागोमट्या विनूवर त्याचा फार जीव. विनूला तो सारखा मांडीवर बसवून घ्यायचा. त्याचे गोबरे गाल कुस्करायचा. मग मधे काहीतरी झालं वाटतं. एकदा विनूचे बाबा मामाच्या घरी आले आणि त्यांनी मामाला भोसड भोसड भोसडला. तेंव्हापासून विनू मामाच्या घरी यायचा बंदच झाला . मामाच कधीकधी आमच्यापैकी कुणाला तरी 'त्या विन्यानं शाळा बदलली की काय रे भडव्या..' असं विचारायचा आणि मांड्या खाजवत दातात अडकलेले गुटख्याचे कण थू थू थू करत थुंकायचा. (थांक यू, दळव्यांनु! ) अशा वेळी मराठी माणसासारखंच त्याच्या वरकरणी कठोर दिसणार्या रंगरुपात खळखळणारं निर्मळ असं पाणी दिसायला लागायचं! (थ्यांक यू, भाईकाका!)
चेंबूरच्या अगदी गरीब वस्तीत मॅकमामाच्या दोन खोल्या आहेत. त्यातल्या बाहेरच्या खोलीतल्या एका कुरकुरणार्या खाटेवर मॅकमामा सदैव पडून असायचा. मधूनच आपलं कळकट बनियन वर करुन आपलं केसाळ खपाटीला गेलेलं पोट खाजवायचा आणि आपल्या किरट्या आवाजात मामीला शिव्या घालायचा. मामा-मामीचं नातं असं काही औरच होतं. ते एकमेकाशी बोलायचे ते फक्त भांडणापुरतेच, पण त्यांच्या मनात बाकी एकमेकाबद्दल सागराइतकं अथांग प्रेम होतं. 'तुला उचलला चौघानी, गोळा आला तुला पटकीचा, जाळला तुला तडातडा वढ्याच्या काठावर...' असं काहीतरी आतल्या खोलीत मामी पुटपुटत असायची. आपल्याला मूलबाळ नाही याचं शल्य तिला मनात कुठेतरी टोचत असावं. 'भाईर शेन खाऊन खाऊन नको ती बीमारी घेतली आन घरच्या जमिनीला घालायला पानीबी न्हाई आता मुडद्याकडं' असं काहीतरी ती म्हणत असायची. लहानपणी आम्हाला काही कळायचं नाही. मी आपला मामासमोरच्या शेवचिवड्याचा बकाणा भरायचो. मामाही समोरच्या ग्लासातला ओल्ड मंकचा मोठा घोट घ्यायचा आणि ब्रिस्टॉल पेटवत 'छिनाल साली...' असं काहीतरी बरळायचा. मामीचं खरं नाव काय हे लहानपणी आम्हाला कधीच कळालं नाही. कधी मामाची गंमत करायची म्हणून आम्ही त्याला विचारायचो, 'मामा, मामा, आपल्या मामीचं नाव काय रे?' त्यावर तो एकदम तिरसटायचा . 'ढुंगणात दात आले काय रे तुला?' तो खाका चोळत वसकन ओरडायचा. ' नाव नको काढूस त्या रांडेचं..' तो ढास आवरत केकाटायचा. (थ्यांक्यू अगेन , दळव्यांनु!)
मग आम्ही मुलं मोठी झालो , आणि हळूहळू हरीतात्यांची, आपलं मॅकमामाची चेष्टाही करायला लागलो. (थांक यू, ...पण जाऊ द्या!) आमच्यातल्या सद्या पवाराचे बाबा मिल्ट्रीत होते. सद्या लहापणापासून तर महिन्याला कागदात बांधलेली कसली तरी लांबडी बाटली मामाला आणून द्यायचा आणि मामी चहाच्या डब्यातले सुट्टे रुपये सद्याला देता देता शिव्या घालायची. 'हितं पोटात गोळा झाला तर डाक्टरला दाखवायला पयसा न्हाई, आणि तू गाडवाचं मूत पी मुडद्या' असे काहीसे तिचे शब्द असायचे. आम्ही कॉलेजल्या गेल्यापासून तर सद्या मामाच्या नावाखाली त्याच्या बाबांकडून बाटली उचलायचा आणि होस्टेलवर स्वतःच पार्टी करायचा. असं पाचसहा महिने झालं तेंव्हा पैसे मागायला सद्याचे बाबा एकदा स्वतःच मामाच्या घरी आले. तेंव्हा या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला आणि सद्याच्या बाबांनी सद्याला (मिल्ट्रीच्या) बुटांनी तुडवला. हे सगळं चालू असताना मामा खाटेवर बसून छाती चोळत खोकत सगळ्या जगाला शिव्या घालत होता.
मग शेवटीशेवटी मामाकडे जाताना मीच ओल्ड मंकची हाफ घेऊन जायचो. मला बघताच मामाच्या पडक्या दातांच्या चेहर्यावर हसू उमटायचं. खोलीत एक कसला तरी कुंद, मळमळायला लावणारा दर्प साठलेला असायचा. 'गिल्लास घे, गिल्लास घे रे सायबा..' मामा खोकत म्हणे. मला नोकरी लागल्यापासून तो 'सायबा' म्हणायला लागला होता. ' अरे, जरा गंभीरपणे वागायला शीक, लोक साहेब म्हणून बघणार तुझ्याकडे..' असंच त्याला म्हणायचं असावं ( थ्यायुभा!) . मग मी त्याला आतल्या खोलीतला एखादा कळकट ग्लास आणून देत असे. मामा मग त्यात हावरेपणानं बाटलीतला एक मोठा पेग भरत असे आणि त्यात होय की नव्हे इतके पाणी घालून मोठा घोट घेऊन खोकत जगाला शिव्या देत छाती चोळत असे.
असा हा मॅकमामा शेवटी परवा गेला. आता कुणासाठी मी ओल्ड मंक विकत घेणार आणि कुणाला शेवचिवड्याची पुडी देणार? (माझा ब्रँड वेगळा आहे). देवानं आमची एवढीशी जीवनं समृद्ध करायला दिलेली ही माणसं. न मागता दिली होती, न सांगता परत नेली!
वाचने
8195
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेच
विनू
:)
In reply to विनू by शुचि
हेच
In reply to :) by टारझन
+१
In reply to :) by टारझन
डॉन्याशी बाडीस
In reply to +१ by छोटा डॉन
छान जमलंय.
'सारे प्रवासी घडीचे'
In reply to छान जमलंय. by अप्पा जोगळेकर
लिखाण ओघवत
नि...
हॅ हॅ हॅ..
हा आमचा .. ,
हॅ हॅ
आवडल....
छान लिहिलं
पाणीच पाणी....
वाचनास भाग पाडणारी लेखनशैली !
"अजून असेच
In reply to वाचनास भाग पाडणारी लेखनशैली ! by निरन्जन वहालेकर
सुसुभाय
In reply to वाचनास भाग पाडणारी लेखनशैली ! by निरन्जन वहालेकर
'हितं
उत्तम व्यक्तीचित्रण . .
नशीब मला
वावा..
मामा
अहो, त्या
In reply to मामा by नितिन थत्ते
पण निमित्त
In reply to अहो, त्या by बिपिन कार्यकर्ते
बाडिस.
In reply to पण निमित्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा
सन्जोपराव
अरे, आवरा रे
In reply to सन्जोपराव by शुचि
जीवन सुंदर करून जाणे...!!
कदी मोठे
हे वाक्य
In reply to कदी मोठे by प्रकाश घाटपांडे
भरलेले ताट
संजोपकाका...
सही विडंबन
प्रतिसाद
करेक्ट...!
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
उत्तम