सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा
सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा
जवळी मज करा
होवू निसंग
आता बाजूस करा हो कमरबंद ||धृ||
कितीक दिसानं येता आज घरा
डोळं लावूनी वाटं उभी अशृ नाही थारा
कसर काढा आता जल्माभरची
मी संगती असता करा लढाई बेधूंद
आता बाजूस करा हो कमरबंद ||१||
तुम्ही जरी शत्रू मारीले, धुळ चारीले
तुरे खोवीले, बिल्ले लाविले छातीवरी
काय कामाची अशी मुलूखगिरी
होईल सवत करील दोघात अंतर रूंद
आता बाजूस करा हो कमरबंद ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०५/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2007
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
दगडफोड्या
सख्या हो
टारझन भाऊ,
In reply to सख्या हो by टारझन
हाणतेज्या
खुपच वास्तवदर्शी कविता.......
काय ये की,
लय भारी लावनी हाय
क्या बात
In reply to लय भारी लावनी हाय by फटू
फोडॅक्स बगा येकदम!!!