Skip to main content

नकोस माझी आठवण काढू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस माझी आठवण काढू नकोस माझी आठवण काढू नकोस मजला मोही पाडू भोगले क्षण ते ओले नकोच त्यांना आता कुरवाळू || ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते शब्दही त्यातून नच फुटी ते कढ दु:खाचे बाहेर काढण्या हुंदकाही नकोच सांडू || उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात लाव्ह्यापरी जाळे तो मनास काय राहीली शेवटली बाकी गणितही त्याचे नकोच करू || - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०५/२०१०
काव्यरस

वाचने 1112
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया