अशी लाजू नको
लेखनविषय:
काव्यरस
अशी लाजू नको
अशी लाजू नको अशी मुरडू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ||
स्वप्नातले रुप आज सत्यात आले
हातात घेवून मी ते पारखले
सहवासात तुझ्या विसरलो जगा
अशा समयी वेळेची फिकीर नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१||
फुलापरी तुझा सुगंधीत गंध असे
तसाच गुलाबी रंग रूपास दिसे
रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके
दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०५/२०१०
वाचने
1697
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
>> दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना >>
हा हा सह्ही!!!! ;)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
दिवसाच्या ऊजेडाची काळ्जी स्\करू नको...पण तेन्व्हाच ती रात्रीच्या चान्द्ण्या सारखी वाट्ते...बाकी रोमान्चकारी आहे....
>>