Skip to main content

अशी लाजू नको

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 16/05/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
अशी लाजू नको
अशी लाजू नको अशी मुरडू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ|| स्वप्नातले रुप आज सत्यात आले हातात घेवून मी ते पारखले सहवासात तुझ्या विसरलो जगा अशा समयी वेळेची फिकीर नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१|| फुलापरी तुझा सुगंधीत गंध असे तसाच गुलाबी रंग रूपास दिसे रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०५/२०१०
काव्यरस

वाचने 1698
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

>> दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना >> हा हा सह्ही!!!! ;) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दिवसाच्या ऊजेडाची काळ्जी स्\करू नको...पण तेन्व्हाच ती रात्रीच्या चान्द्ण्या सारखी वाट्ते...बाकी रोमान्चकारी आहे....