ह्या पुस्तकाच्या प्रति त्यांनी येथील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात वाटल्या होत्या. मी गेलेलो नसल्याने माझ्याकडे नाही पण मित्राकडे पाहीले. खूपच सुंदर फोटो आहेत. पुस्तक संग्राह्य आहे. घरच्यांना घेऊन ठेवायला सांगितले आहे.
असे ही ऐकले की हेलीकॉप्टरमधे, उद्धव पट्टा न बांधता, उघड्या दरवाजातून छायाचित्रे काढत होते. इतके ऐकल्यावर मला त्यांच्यापेक्षा अधिक त्या पायलटचीच काळजी वाटली. ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मला वाटते कदाचीत त्या रजिस्ट्रेशनबरोबर, एका कुटूंबाला एक वगैरे पद्धतीने दिल्या असाव्यात. कारण माझ्या मित्राच्या चौघांच्या कुटूंबाकडे एकच पुस्तक होते. नाहीतर, बीएमएमला न जाता, आत्तापर्यंत माझ्याकडे देखील त्याची प्रत असती...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
ह्म्म्म...पुस्तक पहायला हवे...
जाता जाता :--- रक्ताची नाती यावर पीएचडी करता येईल का ? कारण...
http://bit.ly/9E7Iqt
मदनबाण.....
देशात जातीनिहाय जनगणना व्हावी -रामदास आठवले
http://bit.ly/aP8kZG
मला पडलेला प्रश्नः--- मुंबईत जर भय्या लोकांची संख्या जास्त आढळली तर मराठी लोकांना आरक्षण मिळणार का ?
नुकतेच हे पुस्तक मला माझ्या एका नाठाळ विद्यार्थ्याने भेट दिले. मान खाली घालून तो 'सॉरी सर' म्हणाला.
पुस्तक सुरेखच आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त हेच करत राहायला पाहिजे होते.
सन्जोप राव
'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे, आता पुस्तकाची यादीत भर घालतो.
छाताडात धडकी भरवणारा कोकण कडा, आव्हान देणारा तेलबैला, जहाजा सारखा आकार असलेला उंदेरी, लांबच लांब पसरलेली अजिंठ्याची लेणी, एकांडी उभी कुलाब्याची दांडी ह्यांचे खरेखुरे भव्य स्वरुप त्यातुन सार्थकपणे व्यक्त होत होते. महाराष्ट्राचे सौंदर्य नव्याने कळुन आले. त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे.
+१
>> त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. >>
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
प्रतिक्रिया
खरे आहे
अवांतर
मला वाटते...
सुंदर
उद्धव
उद्धव
ह्म्म्म...
किंमत
भेट
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१