काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते..अश्या वेळी तुम्ही काय खाता?
मी आधी फडताळातले डबे उचकतो..मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर..
मी बिस्कीटं ठेवते.
पण नंतर दात घासते - ५०% वेळाच
जेव्हा घासत नाही तेव्हा खूप गिल्टी वाटतं. :( :( :( :(
_________
जरा जास्तच माहीती झाली असो
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
>>काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते..
खरं आहे, लागते खरी.
मला तर रात्रीचे जेवण झाले नसले तरीही मध्यरात्री भुक लागते, आता बोला !
>>अश्या वेळी तुम्ही काय खाता?
जनरली 'स्टार्टर' म्हणुन रुम मेट्सचे डोके ...
नंतर मध्ये बरेच काही ...
अगदी शेवटची स्विट डिश म्हणुन असाच एखादा 'एक ओळीचा धागा' किंवा तत्सम लेख ;)
>>मी आधी फडताळातले डबे उचकतो..
च्चुक च्चुक च्चुक ...
अत्यंत वाईट सवय आहे बघा, असे अपरात्री डबे उचकणे बरोबर नाही.
मी नाही हे करत.
>>मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर..
फ्रीजमध्ये आणि दुध ?
हे राम ... !!!!
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
उशिरा पर्यंत एखादे पुस्तक वाचल्यावर रात्री जाम भूक लागते....... पोटात खड्डा पडतो तेव्हा काहीतरी खावेच लागेल नाहीतर झोप येणार नाही असे वाटते . म्हणून किचन मध्ये डब्बे शोधले जातात.
पोह्यांचा चिवडा असतो बर्याच वेळा नाही तर चीज ची स्लाईस नाहीतर बिस्कीट.ते पण नसेल तर पाणी पिते.....
माहेरी भाऊ पण असायचा डब्बे शोधायला.म्हणायचा भुर्जी कर नाहीतर मॅगी.मग काहीतरी पडायचे आणि आवाज झाल्यावर पप्पा ओरडायचे......!
मीली
मी बुन्दीचे रायते करुन खाते >>> दही घुस्ळुन त्यात हिन्ग ,मिठ ,साखर, लाल तिखट घालते. जास्तच उत्साह असेल तर कोथिम्बिर चिरुन घाल्ते मग त्यात बुन्दी घालते. 8}
चुचु
अरे वा सौदी अरेबियात दूध बनवतात का??
बरं ते दूध 'होमोजिनाईज्ड अॅण्ड पाश्चराईज्ड' असतं का कसं?
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मी रात्रीच पोटभर जेऊन घेते आणि घोटभर गार दुध पिते म्हणजे उगाच मध्यरात्री उठायला नको...(प्रेग्नंट असताना मात्र उठायचे :-) )...शतपावली घालून झोपी जायचे....
http://shilpasview.blogspot.com/
काही नाही, चमचाभर खोबरेल तेल पितो...तोंडाला इतकी घाणेरडी चव येते आणि तोंड एकदम बुळबुळीत होऊन जातं, की मग समोर पंचपक्वान्नं ठेवली तरी खावीशी वाटणार नाहीत :D
असो, आमच्या रात्रीच्या जेवणाच्या वे़ळा सर्वसाधारण माणसांच्या वेळेप्रमाणे जुळल्या आहेत असं फार क्वचितच घडतं...त्यामुळॅ आम्ही मुळात जेवतो तेच मध्यरात्री.....हां, पहाटे भुक लागली तर काय करायचं असा प्रश्न असता तर उत्तर दिलं असतं बुवा :D
बरोबर. तुमच्यासारखी भुतं ज्या वेळेस बाहेर पडतात त्याला सामान्यांच्या भाषेत मध्यरात्र म्हणतात :D
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
सामान्य म्हंजे.. तेच रे ज्यांना मध्यरात्री भुका लागतात.. :)
आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे?
असो. ज्यादा अवांतर नको. ;)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
प्रतिक्रिया
मी
जेवणात जसे
मी
सहमत आहे ...
भुक लागली की....
मी
दही सायीचं
इकडच्या
च्यायला...
अच्र्त
बरं. मग दही
गाईच मेड
अरे वा
_/\_
मी रात्रीच
एच प्लस +
मी
काही नाही,
मध्यरात्र
बरोबर.
सामान्य
सामान्य
तेच रे
मेघवेडा तुम्हि नागपुरचे का?