काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते..अश्या वेळी तुम्ही काय खाता?
मी आधी फडताळातले डबे उचकतो..मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर..
वाचने
5314
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
एक दोन ओळींचे फुट्कळ धागे टाकून शांतपणे झोपी जातो. वाचकांचे डोके आपोआप खाल्ले जाते.
जेवणात जसे
जेवणात जसे चटणी .लोणचे असते तसे मी.पा वर १ ओळीचे फुटकळ हि धागे हवे..टेंशन नका घेवु..धाग्याची मजा लुटा.
मी
मी बिस्कीटं ठेवते.
पण नंतर दात घासते - ५०% वेळाच
जेव्हा घासत नाही तेव्हा खूप गिल्टी वाटतं. :( :( :( :(
_________
जरा जास्तच माहीती झाली असो
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
सहमत आहे ...
>>काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते..
खरं आहे, लागते खरी.
मला तर रात्रीचे जेवण झाले नसले तरीही मध्यरात्री भुक लागते, आता बोला !
>>अश्या वेळी तुम्ही काय खाता?
जनरली 'स्टार्टर' म्हणुन रुम मेट्सचे डोके ...
नंतर मध्ये बरेच काही ...
अगदी शेवटची स्विट डिश म्हणुन असाच एखादा 'एक ओळीचा धागा' किंवा तत्सम लेख ;)
>>मी आधी फडताळातले डबे उचकतो..
च्चुक च्चुक च्चुक ...
अत्यंत वाईट सवय आहे बघा, असे अपरात्री डबे उचकणे बरोबर नाही.
मी नाही हे करत.
>>मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर..
फ्रीजमध्ये आणि दुध ?
हे राम ... !!!!
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
भुक लागली की....
उशिरा पर्यंत एखादे पुस्तक वाचल्यावर रात्री जाम भूक लागते....... पोटात खड्डा पडतो तेव्हा काहीतरी खावेच लागेल नाहीतर झोप येणार नाही असे वाटते . म्हणून किचन मध्ये डब्बे शोधले जातात.
पोह्यांचा चिवडा असतो बर्याच वेळा नाही तर चीज ची स्लाईस नाहीतर बिस्कीट.ते पण नसेल तर पाणी पिते.....
माहेरी भाऊ पण असायचा डब्बे शोधायला.म्हणायचा भुर्जी कर नाहीतर मॅगी.मग काहीतरी पडायचे आणि आवाज झाल्यावर पप्पा ओरडायचे......!
मीली
मी
मी बुन्दीचे रायते करुन खाते >>> दही घुस्ळुन त्यात हिन्ग ,मिठ ,साखर, लाल तिखट घालते. जास्तच उत्साह असेल तर कोथिम्बिर चिरुन घाल्ते मग त्यात बुन्दी घालते. 8}
चुचु
दही सायीचं
In reply to मी by पर्नल नेने मराठे
दही सायीचं घालतेस का बिनसायीचं?
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
इकडच्या
In reply to दही सायीचं by मेघवेडा
इकडच्या दुधाला साय येत नाही. सो सायीचे दही नाही, साधेच घेते. :(
चुचु
च्यायला...
In reply to इकडच्या by पर्नल नेने मराठे
असं का?
तिकडच्या गायी-म्हशी काय डाएटिंग करतात काय? :?
अच्र्त
In reply to च्यायला... by धमाल मुलगा
अच्र्त =))
चुचु
बरं. मग दही
In reply to इकडच्या by पर्नल नेने मराठे
बरं. मग दही गायीच्या दुधाचं का बकरीच्या का सांडणीच्या??
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
गाईच मेड
In reply to बरं. मग दही by मेघवेडा
गाईच :D मेड इन सौदी अरेबिया
चुचु
अरे वा
In reply to गाईच मेड by पर्नल नेने मराठे
अरे वा सौदी अरेबियात दूध बनवतात का??
बरं ते दूध 'होमोजिनाईज्ड अॅण्ड पाश्चराईज्ड' असतं का कसं?
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
_/\_
In reply to मी by पर्नल नेने मराठे
हे सगळं मध्यरात्री?????
आणि भांड्यांची खुडबुड ऐकुन काकांची झोपमोड झाल्यावर ते ओरडत नाहीत? :?
मी रात्रीच
मी रात्रीच पोटभर जेऊन घेते आणि घोटभर गार दुध पिते म्हणजे उगाच मध्यरात्री उठायला नको...(प्रेग्नंट असताना मात्र उठायचे :-) )...शतपावली घालून झोपी जायचे....
https://shilpasview.blogspot.com/
एच प्लस +
एच प्लस + ओएच मायनस = एच2ओ हे रसायन पितो...सर्वांनी हेच करत जा
मी
मी कोणालातरी जागे करून किंवा फोन करून त्याचे डोके खातो ;)

काही नाही,
काही नाही, चमचाभर खोबरेल तेल पितो...तोंडाला इतकी घाणेरडी चव येते आणि तोंड एकदम बुळबुळीत होऊन जातं, की मग समोर पंचपक्वान्नं ठेवली तरी खावीशी वाटणार नाहीत :D
असो, आमच्या रात्रीच्या जेवणाच्या वे़ळा सर्वसाधारण माणसांच्या वेळेप्रमाणे जुळल्या आहेत असं फार क्वचितच घडतं...त्यामुळॅ आम्ही मुळात जेवतो तेच मध्यरात्री.....हां, पहाटे भुक लागली तर काय करायचं असा प्रश्न असता तर उत्तर दिलं असतं बुवा :D
मध्यरात्र
मध्यरात्र म्हणजे नक्की कधी? आमचा दिवसच मुळात.. असो.
-Nile
बरोबर.
In reply to मध्यरात्र by Nile
बरोबर. तुमच्यासारखी भुतं ज्या वेळेस बाहेर पडतात त्याला सामान्यांच्या भाषेत मध्यरात्र म्हणतात :D
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
सामान्य
In reply to बरोबर. by मेघवेडा
सामान्य म्हणजे कोण रे भाउ?
घाबरु नकोस, आम्ही फक्त माणसांना त्रास देतो राक्षसांना नाही! ;)
-Nile
सामान्य
In reply to सामान्य by Nile
सामान्य म्हंजे.. तेच रे ज्यांना मध्यरात्री भुका लागतात.. :)
आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे?
असो. ज्यादा अवांतर नको. ;)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
तेच रे
In reply to सामान्य by मेघवेडा
(तुझ्यासारख्या) राक्षसांना मध्यरात्री भुका लागत नाहीत का? ;) भुतांना तर लागतात ब्वॉ!
मला वाटलं तु घाबरला भुताला. ;)
काय ज्यादा अन काय कमी? धागाच जर अवांतर तर प्रतिसादास काय कमी?
-Nile
मेघवेडा तुम्हि नागपुरचे का?
In reply to सामान्य by मेघवेडा
आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे?
असा "बे" दुसर्या कुणाला जमत नाय ! :)
गारुडी,
काम करायचा क॑टाळा ... म्हणून ऑफिसला येतो ...