Skip to main content

आज अचानक उदास का वाटे

आज अचानक उदास का वाटे

Published on बुधवार, 05/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आज अचानक उदास का वाटे आज अचानक उदास का वाटे न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ|| ईकडे पाहून तिकडे पाहून वेळ घालवू किती कसे कोण जाणे कितीक वेळ माझी जाते आज अचानक उदास का वाटे ||१|| किती मी चेहर्‍यांना वाचू किती अनूभव लेखू आवाज जवळी नसतांना साथीचे शब्दही पडत आहे थिटे आज अचानक उदास का वाटे ||२|| दुर अंतरावरी असता तू कसा निरोप देवू येथला निरोपही घेण्या मन माझे आक्रंदूनी उठे आज अचानक उदास का वाटे ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०५/२०१०

याद्या 2886
प्रतिक्रिया 10
काव्यरस

:? काय सायबा? आल इज वेल ना?

In reply to by धमाल मुलगा

काय होतेय तेच तर वर सांगितले ना! आज उदास उदास वाटतेय, अगदी पंकज उदास झालाय माझा! :-) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

मला पहिली २ कडवी आवडली. `मोबाइल` शब्दा मुळे त्यात भावना असली तरी कविता तिरपी गेल्यासारखी वाटली. मीनल. http://myurmee.blogspot.com/

टण,टण टण टण, डीपि डीपि ढीपाण्ग, डीपि डीपि ढीपान्ग!! वाटल बर? L) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

उदास का होता पाषाणभाउ? वीकांताला आता फक्त दीड दिवसच उरला आहे! (मनहर)भेंडी P = NP

हा धागा वाच बरे... मस्त वाटेल तुला ..खरंच http://www.misalpav.com/node/12208 दुर अंतरावरी असता तू कसा निरोप देवू कोणाला निरोप देतो आहेस भाऊ ?? त्याला सांग ना 'तुसी ना जाओ ':-) ~ वाहीदा

आयच्यान, कायतरी बिघडलय तुमचं देवा ;-) पन कव्ता येकदम झ्याक बर्का, आवाडली :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाभे आज वाटतय का ठीक? जरा फिरून या झपझप. मस्त वाटेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

तिस-या कडव्याचा बदल आवडला. मीनल. http://myurmee.blogspot.com/