राम...
अताशा मनाच्या पसार्यात राम नाही,
बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही !
सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती,
मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही !
इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही,
फुलांच्या मनी राहिला आज राम नाही !
कशाला हवे चंद्र.., तार्यांचे चांदणेही,
अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही !
हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे,
उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही !
विशाल.
मस्तच ! ! !
आवडली. ~~~~~~~~~~~~
व्वा...!
धन्यवाद