Skip to main content

आस ! जन्मो जन्मीची ! !

आस ! जन्मो जन्मीची ! !

Published on सोमवार, 05/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आस ! जन्मो जन्मीची ! ! मस्तीत होतो मी बरा, का साद मजला घातली ? ना जंर होणार माझी का आस वृथा हि दाविली ? याद तव नाही असा, क्षण एकहि न पाहिला. वेदनांचा अधिकार मजला तोही तू ना ठेविला ! घेवूनी सल ही उरी, जन्म हा काढू कसा ? वेदनांचे शब्द हृदयी जपुनी मी ठेऊ कसा ? लागले नेत्र पैलतीरी अता, कुरवाळू कुठवर यातना. तोडून बंध सारे तू, ये मज आता भेटण्या ! ! ना जंर तू मज भेटली येईन परतुनी मी पुन्हा, घेउनिया जन्म दुसरा शोधित तव पाऊलखुणा ! ! ! निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

याद्या 1110
प्रतिक्रिया 1
काव्यरस

व्याकुळ करणार्‍या भावना. आयुष्याला वेढलेली अ-पू-र्ण-ता. कविता आवडली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ But the moon is death. Its cold rocks fill my belly as if I had swallowed song of birds and awakened in a tree.