Skip to main content

कवितेचा मार ! ! !

कवितेचा मार ! ! !

Published on गुरुवार, 01/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
कवितेचा मार ! ! ! जेष्ठ कवींचे संमेलन, भरले श्रोत्यांनी प्रांगण. कवींना चढे अगणित स्फुरण, श्रोत्यांची स्थिती दारूण. झडती कवितेच्या अगणित फैरी, ए के – 47 च्या माऱ्या परी. श्रोते जाहले सैरावैरा, धडकी भरे त्यांच्या उरी. आधीच समस्त श्रोते वेठीला, त्यात एक कवी अवतरला. छेडीला भीमपलास कवितेचा, उतावीळ श्रोते भैरवीला. . जाहले तास दोन तास, तरीही ना सरे त्याचा अट्टाहास. वदे एक श्रोता शेजारी स्त्रीस “ काही उपाय सुचवा हो “ ! वदली ती गौरांगना सत्वर, “ तुम्हीच काही सुचवा गुरुवर, सहते वीस वर्षे हा कवितेचा मार उपाय परी ना गवसला आजवर. “ निरंजन वहालेकर
लेखनविषय:

याद्या 1040
प्रतिक्रिया 1
काव्यरस

=)) झकास!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे