आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो ...........
आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो
आता बोललो तर ती काय म्हणेल
नाही बोललो तर मित्र काय म्हणतील
म्हणून आज कॉलेज मधून मान खाली घालून घरी कटलो............
आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो
तिच्या मैत्रिणीशी ओळख काढायला गेलो
तिच्या आवडी बद्दल काही जाणायला गेलो
पण तिच्या मैत्रिणीच्याच आवडी निवडी ऐकून आलो.................
आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो
आज मनाशी एक प्रण केले होते
काही झाले तरी बोलायचेच हे ठरवले होते
तिच्या साठी माझी बाईक विकून एक गिफ्ट घेतले होते
मग आज पुन्हा शेवटचेच गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो....
आज निघालो तडक तिला भेटलो
तिला तुझ्या वर प्रेम आहे म्हणालो
"मुस्काटात खाल्ली जोरात", हातातले गिफ्ट खाली कोसळले
बॉय फ्रेंड आहे तिला समजताच रडू आवरले.....
मग नंतर काय झाले तुम्हाला माहीतच आहे
आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो
कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो
मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2035
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलेजचे दिवस
धन्यवाद.
In reply to कॉलेजचे दिवस by sur_nair
काही हरकत
वा वा वा !!
ह ह पु वा
अहो पण
धन्यवाद