पंजाबी समोसा

गणपा's picture
गणपा in पाककृती
20 Jan 2010 - 3:51 pm

चला मंडळी चहाची चेळ झालीये. वाफाळणार्‍या चहा सोबत मस्त गरमा गरम समोसे हाणु.

साहित्यः

३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन, थोडेसे कुस्करुन.
१/२ वाटी हिरवे वाटाणे /मटार. (जर हिरवे कडक वाटाणे असतील तर ते पण ऊकडुन घ्या.)

१ चमचा आल-लसणाची पेस्ट.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा धणे पुड.
१ चमचा जिरे पुड.
१ चमचा गरम मसाला.
१/२ चमचा हळद.
१ चमचा जिरं.
१ चमचा शहाजिरं.
१ चमचा धणे.
मीठ चवीनुसार.
१-२ वाट्या मैदा.
तळण्यासाठी तेल.
कृती:


एका भांड्यात २ चमचे तेल तापवुन त्यात जिर्‍याची फोडणी करावी.
कुस्करलेले बटाटे, वाटाणे आणि वरील सगळे मसाले टाकुन सारण परतुन घ्या.


एक वाफ काढुन सारण आचे वरुन उतरवा.


मैद्यात गरजे नुसार मोहन(तापवलेले तेल), मीठ, शहाजिरं,पाणी टाकुन पीठ मळुन घ्या. १५-२० मिनीट झाकुन ठेवा.


पिठाचा एक छोटा गोळा घेउन थोडी लंबगोलाकार पुरी लाटुन घ्या.
आणि सुरीने तिचे दोन भाग करा.


सर्व कडांना पाणी लावुन कोनच्या आकारात वाळुन घ्या.


आत सारण भरुन समोस्याच्या कडा पण पाणी लावुन सीलबंद करा.
कढईत समोसे बुडतील इतपत तेल घेउन मध्यम आचेवर खरपुस तळुन घ्या.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

20 Jan 2010 - 4:18 pm | चिरोटा

सहज सुंदर पाकृ !. सामोसे बनवणे बरेच किचकट असेल असे वाटले होते. मैदा वगळला तर बाकी सामान आहे. ह्या आठवड्यात प्रयत्न करतो.
हे पंजाबी सामोसे ना? मराठी सामोसे वेगळे बनवतात का? आतले सारण वेगळे असावे.
(सामोसा-पेप्सिकोला प्रिय)भेंडी
P = NP

आतले सारण वेगळे असावे ...
आधी हे तर बनव ... मग मराठी च्या मागे लाग ;)
~ वाहीदा

आतले सारण वेगळे असावे ...
आधी हे तर बनव ... मग मराठी च्या मागे लाग ;)
~ वाहीदा

निमीत्त मात्र's picture

21 Jan 2010 - 3:00 am | निमीत्त मात्र

मराठी सामोसे नसतात. त्याला बटाटे वडे म्हणतात.

चिरोटा's picture

21 Jan 2010 - 3:20 am | चिरोटा

सामोस्याचे आवरण/सारण बर्‍याच ठिकाणी पंजाबी सामोस्यापेक्षा वेगळे असते.सामोसा पाव (मराठी)गाड्यांवर मिळतो तो सामोसा पंजाबी नसतो.
भेंडी
P = NP

चिऊ's picture

20 Jan 2010 - 4:14 pm | चिऊ

खुप छान्. नक्कि करुन पहाणार्...छायाचित्र पाहुनच पाणी सुटले..पण आत्ता फक्त चहा वरच समाधान मानावे लागले :-(

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jan 2010 - 4:56 pm | बिपिन कार्यकर्ते

हा पण मेनू फिक्स बरं का. नाश्त्याला हेच कर म्हणतो. यावेळी पोहे नकोत.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

20 Jan 2010 - 5:38 pm | चतुरंग

एकतर तू काही करणार नाहीस आणि वर परत आमच्या गणपाला आर्डरी सोडतोस होय? ~X(
आम्ही काय कधी लागोसला जाऊ शकणार नाही असं वाटतंय का तुला? ;)

(सध्या ऐदी नसलेला)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2010 - 9:49 am | बिपिन कार्यकर्ते

मालक, लागोसला काय कोणीही जाऊ शकतो हो... पण गणपाच्या घरी मुक्काम करून मस्त जेवणखाण चापायला मात्र केवळ भाग्य लागतं... ते कुठून आणाल तुम्ही? ;)

बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र's picture

21 Jan 2010 - 8:29 pm | निमीत्त मात्र

अवांतर पुरे आता! दोन संपादकच अवांतर गप्पा मारू लागले की सदस्यांना मोकळे रानच मिळेल. अवांतर गप्पा मारण्यासाठी सध्या 'इतर' सोयी उपलब्ध आहेत, त्याचा का लाभ घेत नाही?

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jan 2010 - 3:42 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद. आपल्या कर्तव्य तत्परतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. असो.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2010 - 3:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि गणपाच्या पाकृ टाकून इतरांना खिजवण्याच्या/जळवण्याच्या तत्परतेबद्दल त्याला बोल लावावेत तेवढे कमीच आहेत. गणपाचा निषेध!

अदिती

झकासराव's picture

20 Jan 2010 - 5:30 pm | झकासराव

गणपा तु पुण्यात का जॉब करत नाहीस रे?????
तुझी भेट झाली असती सारखी आणि मग फर्माइश करता आली असती. :)

चतुरंग's picture

20 Jan 2010 - 5:41 pm | चतुरंग

माझा कॅलरीज आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न तू शेवटी सामोश्याला मिळवलास तर!! :S
आता शनिवारी मे हे ट्राय करणारच! =P~

(पंजाबी)चतुरंग

स्वाती२'s picture

20 Jan 2010 - 5:59 pm | स्वाती२

काय हे गणपा! माझा नव्या वर्षाचा संकल्प आणि आता हे सामोसे..
किती ठरवलं तरी तुम्ही पाकृ टाकली की बघितल्या शिवाय राहावतही नाही.

श्रीयुत संतोष जोशी's picture

20 Jan 2010 - 7:21 pm | श्रीयुत संतोष जोशी

एकदम मस्त.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्रभो's picture

20 Jan 2010 - 7:43 pm | प्रभो

चालू द्या गणपाशेठ...जास्त काही लिहीत नाही.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

प्राजु's picture

20 Jan 2010 - 8:31 pm | प्राजु

काय करावं बाई या गणपाला?
छळवाद आहे नुसता. ;)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

संदीप चित्रे's picture

20 Jan 2010 - 9:56 pm | संदीप चित्रे

अजून काय बोलणार !!

रेवती's picture

20 Jan 2010 - 10:05 pm | रेवती

मस्त पाकृ! तू कसला आहेस गणपा!
स्वातीताईनं मागच्या वर्षी दिलेली सामोश्यांची पाकृ आठवली.

रेवती

बट्ट्याबोळ's picture

20 Jan 2010 - 11:07 pm | बट्ट्याबोळ

तू कहर करतो राव!!

मला दत्तक घे :)

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Jan 2010 - 11:23 am | ब्रिटिश टिंग्या

लोल!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2010 - 12:29 pm | स्वाती दिनेश

समोसे मस्तच..
रेवती म्हणाली ते हे समोसे..:)
स्वाती

दिपाली पाटिल's picture

21 Jan 2010 - 12:48 pm | दिपाली पाटिल

मस्त दिसतायत समोसे...कधीतरी पट्टी समोश्याची पाकृपण टाका, मी बरीच शोधली पण मनासारखी नाही मिळाली आता तुम्हीच टाका...

दिपाली :)

गणपा's picture

21 Jan 2010 - 12:53 pm | गणपा

समस्त वाचक आणि प्रतिसादक मंडळींचे मनःपुर्वक आभार :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2010 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या गणपाचे खाते उडवा म्हणून अजुन किती बोंबा मारायच्या ??

काय रे ए गणपा ? अजुन किती दिवस इथेच राहणार आणी आमच्या डोक्यावर मिरे वाटणार ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आशिष सुर्वे's picture

21 Jan 2010 - 5:09 pm | आशिष सुर्वे

गणपा भाऊ,

एका गोष्टीचे कैतुक करावेसे वाटते..
एरवी करायला आणि दिसायलाही कठीण वाटणार्‍या पाककृती, तुझ्या हातून, तुझ्या लेखात इतक्या सोप्या होऊन जातात की मनाला वाटत रहाते.. अर्रेच्या, हा पदार्थ एव्वढा सोप्पा आहे!!
मानले ब्वा आपल्याला!!

एशे ओगा!!

-
कोकणी फणस

वाहीदा's picture

22 Jan 2010 - 1:33 pm | वाहीदा

एरवी करायला आणि दिसायलाही कठीण वाटणार्‍या पाककृती, तुझ्या हातून, तुझ्या लेखात इतक्या सोप्या होऊन जातात की मनाला वाटत रहाते.. अर्रेच्या, हा पदार्थ एव्वढा सोप्पा आहे!!

आता कुठली ही पाकृ कठीण वाटली की मग एकच सूर ... गणपासे पूछ् लूंगी ...
B)
अल द पाकृस आर सो डाम ईजी ... It's so coool !!

~ वाहीदा

मदनबाण's picture

21 Jan 2010 - 9:22 pm | मदनबाण

गणाभाऊ माझा हा लयं आवडता पदार्थ हाय... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

jaypal's picture

22 Jan 2010 - 6:23 pm | jaypal

नेहमी प्रमाणे कठीण पा.कृ. सोपी करुन सांगीतलीस आणि फोटोने नेत्रसुख मिळाले. मला समोसे तर आवडतातच पण रगडा किंवा छोले समोसा पण आवडतो.एके काळी (ठाण्यात) फक्त इंटर्व्हलच्या वेळेस समोसे खाण्यासाठी थेटरात जात असे (नंतर कळल कि ते सायन-गुरुकृपाचे समोसे असतात म्हणुन)
समोसापाल
समजोता समोसे करलो, समजोता समोसे करलो :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अविनाशकुलकर्णी's picture

22 Jan 2010 - 7:49 pm | अविनाशकुलकर्णी

समोसे मस्तच..

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 8:59 am | बंडू बावळट

फारच सुरेख!