✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

द
देवदत्त यांनी
Sat, 12/12/2009 - 18:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3529 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

माहितीबद्दल आभार !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/12/2009 - 18:33 नवीन
नियम चांगले, फक्त ते कागदावर राहू नयेत. कार्यवाही व्हावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

विकास
Sat, 12/12/2009 - 18:47 नवीन
नियम चांगले, फक्त ते कागदावर राहू नयेत. कार्यवाही व्हावी. असेच म्हणतो. लोकशिक्षण म्हणून आणि काही अंशी (मराठीतील) शिक्षा म्हणून हे चांगले आहे. या वरून "उदर भरण नोहे" चर्चेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नियम पटतो

शैलेन्द्र
Sat, 12/12/2009 - 22:05 नवीन
नियम पटतो पण दुसरी बाजुही ध्यानात घ्यावी लागेल. जर समजा मी एकटाच हॉटेलात गेलो आणि मागवलेली भाजी जास्त प्रमाणात आली किंवा तीचा दर्जा चांगला नसला तरीही ती खावुन मी स्वत:वर अत्याचार का करु? अन्नाची नासाडी करु नये हे अगदी मान्य, पण हॉटेलसारख्या ठीकाणी जीथे काय, कीती आणी कसे येणार हे माहीत नसते तिथे सर्व्हींग पॅनमधील न ऊष्टावलेली ऊरलेली भाजी गोरगरीबांना दान करने हाच व्यवहार्य पर्याय आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

जय हो!

सुधीर काळे
Sun, 12/13/2009 - 01:25 नवीन
एकदम मान्य. जय हो! अन्न जास्त झाल्यास जरूर घरी न्यावे. तो गावठीपणा नव्हे. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

तरीही ती

JAGOMOHANPYARE
Sun, 12/13/2009 - 11:23 नवीन
तरीही ती खावुन मी स्वत:वर अत्याचार का करु? अगदीच न खाण्यायोग्य असेल, तर हे लागू होईल.. पण बर्‍याच वेळेला आवडत नाही, चव आवडली नाही, पदार्थ गरम नाही... अशी कारणे असतात.... अगदी योग्य निर्णय आहे... मुंबई हॉटेल्सचे अभिनंदन. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

कधी कधी

नीधप
Sun, 12/13/2009 - 11:40 नवीन
कधी कधी भाजी, चटणी आंबलेली असते. मसाला डोसा किंवा इतर डोश्यात अति प्रमाणात भाजी देतात. कमी घाला असं आधी सांगूनसुद्धा. त्याचं काय? सगळ्या हाटेलांनी बुफे किंवा वजनावर वस्तू देणं चालू करावं म्हणजे हवं तितकंच घेता येईल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

बुफे

अविनाशकुलकर्णी
Sun, 12/13/2009 - 12:16 नवीन
बुफे सिस्टीम ठेवावि...पाहिजे तितके घ्या व त्याचेच बिल द्या....
  • Log in or register to post comments

या बाबतचे

शाहरुख
Sun, 12/13/2009 - 12:34 नवीन
या बाबतचे लोकप्रबोधन समजू शकतो (जे अर्थातच योग्य आणि आवश्यक आहे) पण हा नियम म्हणजे कायदा असेल तर हास्यास्पद वाटतो.
  • Log in or register to post comments

अपव्यय

सहज
Sun, 12/13/2009 - 13:30 नवीन
अपव्यय होउ नये हा हेतू चांगला असला तरी अपव्यय होण्यामागची इतर कारणे लक्षात घेता दंड करणे पटत नाही. अन्न ताटात टाकले तरी त्या अन्नावर जगणारे अन्य जीव आहेत, खत बनवता येते. त्यामुळे अन्नाचा नक्की अपव्यय कसा म्हणायचा? साधे पाणी [फूकट] नाकारणे हे ज्या त्या हॉटेलच्या धोरणाचा भाग. ज्यांना ते पसंत नाही त्यांनी त्या हॉटेलमधे न जाणे हा एक सोपा व प्रभावी उपाय.
  • Log in or register to post comments

एवढ्या

देवदत्त
Mon, 12/14/2009 - 20:27 नवीन
एवढ्या प्रतिक्रिया.... धन्यवाद. :) त्या प्रतिक्रियांबाबत माझे मत नोंदवितो. हा नियम फक्त कागदावरच राहू नये असे मलाही वाटते. आणि मटामधील बातमीप्रमाणे अजून कोणावर दंड लावण्याची पाळी आली नव्हती. त्यामुळे सरकारी नियमाप्रमाणे हे फक्त कागदावरच राहणार नाही असे वाटते. मागवलेले पदार्थ आपल्याकरीता जास्त प्रमाणात असतील तरी मग ते बांधून घेऊ शकतो, मग ते घरी खावे किंवा एखाद्या गरजूला द्यावे. हो पण त्याचा दर्जा चांगला नसेल तर कितपत करावे हा प्रश्न आहे. अर्थात जर फक्त आपल्यालाच तो दर्जा आवडत नसेल तर कोणाला तरी देण्यात येऊ शकते. पण आंबलेली भाजी वगैरे प्रकार असतील तर मग त्या हॉटेलचीच तक्रार केली पाहिजे. आपण दंड भरणे सोडा. :) बुफे हा प्रकार मलाही आवडतो. समोर दिसते त्यातून आपण निवडू शकतो आणि पाहिजे त्या प्रमाणात (काही अपवाद सोडून) ताटात अन्न टाकले तरी मग हॉटेलवाले त्याचे काय करतात हे आपल्याला माहित होत नाही. ते फेकूनही देत असतील. त्यापेक्षा आपणच काय तो विचार करणे योग्य.
  • Log in or register to post comments

पाणी न

रेवती
Mon, 12/14/2009 - 21:12 नवीन
पाणी न देणे जरा विचित्र वाटते. आपल्याकडे बाकी काही नाही तरी पाणी नक्कीच देतात.......म्हणजे द्यावं! बाकी पदार्थांबद्दल बोलायचे झाल्यास, चव नसलेले, आंबलेल्या पदार्थांचे पैसे आपणच देऊ नयेत. अगदी खूप फिरती असणार्‍या लोकांच्या बाबतीत हॉटेलची माहिती नसताना जावे लागणे हे नेहमीचेच! तरी सर्वसामान्यपणे आपल्या आवडीची रेस्टॉरंटस जवळजवळ ठरून गेलेली असतात..... अनेक कारणांनी! जसे, अंतरामुळे, मुलांच्या वयानुसार, बरोबर असलेल्या वयस्कर व्यक्तींच्या असण्याप्रमाणे वगैरे. अश्यावेळी आपले आवडीचे पदार्थ बर्‍याचवेळा घेऊन माहीत झालेले असतात व त्याप्रमाणे ते ऑर्डर करू शकतो. ओळखीचे झालेले हॉटेलमालक पॅकिंगची सोय नाकरत नाहीत (ओळखीमुळे;)). वाया घालवायचे नसेल व सोयीस्कर असेल (गावठी वाटत नसेल;)) तर आपला डबा जवळ बाळगावा.;) डोसा मागवल्यास अतोनात भाजी देतात हे खरेच! पूर्वी आम्ही एक मसाला डोसा व साधा डोसा घेत असू. आता ते हाटेल (त्यामुळेच कि काय?) बंद झालय. बुफे मला त्यामुळे बरं वाटतं पण जेवताना मधेच उठावं लागतं त्यामुळे गैरसोयीचं वाटतं विशेषत: लहान मुलांना एकटं बसल्या जागेवर सोडून गेलं की ती किरकिरत मागे येतात. आपल्याबरोबरच भोजनास आलेल्या लोकांबद्दल तर का बोलावं?;) खरकटे सांबार भाताचे हात तसेच घेऊन उजव्या हाताने वाढून घेणार्‍याला तिथल्यातिथे रागवावं इतकच नाही तर जेवण अर्धवट सोडून जावं असं वाटतं. काहीजण धुसखोरी करतात तर काहीजण बागेत फिरायला आल्यासारखे निवांतपणे पदार्थांचं निरिक्षण करत असतात. त्यापेक्षा पूर्वी आमटी,भाजी, कोशिंबीरीची चौपाळी घेऊन फिरणारे वाढपी बरे असं वाटतं की नाही? आपल्या ग्लासातलं पाणी संपल्यावर नको असेल तर आम्ही नको म्हणून नेहमीच सांगतो.....ग्लासावर हात ठेवून्......तरी कधी कधी तत्परतेनं वाढून जातातच त्यावेळी इलाज नसतो कारण बाहेर जेवायला जाणं म्हणजे सारखेसारखे फक्त 'नियम' पाळणे असं होऊ शकत नाही. रेवती
  • Log in or register to post comments

काहीच्या

शक्तिमान
Mon, 12/14/2009 - 23:18 नवीन
काहीच्या काही!... असले काय टुकार नियम काढतात काय माहीत.. अर्धवट राहिलेल्या पाण्याचा पुनर्वापर करा ना.. म्हणे पाणीच देणार नाही.. अन्नधान्य टंचाई आणि महागाईचा हॉटेलवाल्यांशी काय संबंध?? बरं आणि ५ रू.ने तरी कुठे नुकसान भरपाई होणार आहे? लोक १०० रू टीप देतात, ५ रू चे काय घेऊन बसला आहात.. उलट हॉटेलवाल्यांना खरकटी भांडी धुवायला सोपी जावीत म्हणून हा वर वर कल्याण्कारी वाट्णारा हास्यास्पद नियम बनवला आहे असे माझे मत आहे..
  • Log in or register to post comments

अश्या

निमीत्त मात्र
Mon, 12/14/2009 - 23:38 नवीन
अश्या नियमांमुळे लोक पोट भरल्यावरही (दंड भरावा लागू नये म्हणून) खाऊ लागले तर त्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही का? लागेल तितकेच मागवावे, तरीही उरल्यास बांधून घ्यावे हे सर्वात उत्तम. कारण बळजबरीने पोटात ढकलले काय आणि ताटात टाकले काय ते अन्न वायाच गेले की. ताटात टाकल्याने किमान प्रकृतीस तरी धोका नाही.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा